फोटो सौजन्य - सोशल मीडिया
Rohit Sharma – Sofia Hayat Relationship : आयपीएल २०२५ चा अठरावा सीजन सुरू आहे. क्रिकेटचा या नव्या सिझनमध्ये धुव्वादार सामने पाहायला मिळत आहेत. स्पर्धेमध्ये सहभागी झालेले खेळाडू चाहत्यांचे भरपूर मनोरंजन करताना दिसत आहेत. आयपीएल २०२५ चा २० वा सामना आज रंगणार आहे. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळूर विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये खेळवला जाणार आहे. त्यामुळे क्रिकेट चाहते या सामन्यासाठी प्रचंड उत्सुक आहेत. या सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली आमने-सामने असणार आहे. या सामन्याआधी रोहित शर्माच्या वैयक्तिक जीवनाबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे.
रोहित शर्माचे चाहते फक्त भारतातच नाही तर जगभरामध्ये आहेत. भारताचा कर्णधार नेहमीच त्याच्या खेळामुळे त्याचबरोबर त्याच्या कर्णधार पदामुळे आणि त्याच्या वैयक्तिक जीवनामुळे देखील चर्चेत राहिला आहे. नुकताच तीन महिन्यापूर्वी तो दुसऱ्यांदा बाबा झाला आहे त्याला पहिल्या मुलीनंतर आता दुसऱ्यांदा त्याला मुलगा झाला आहे. रोहित शर्माचं नाव अभिनेत्री सोफिया हयात हिच्या सोबत जोडले गेले होते ते दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते असा दावा अभिनेत्रीने केला होता.
रोहित शर्मा आणि सोफीया हयात यांच्या कहाणीबद्दल मोठा खुलासा झाला आहे की रोहित शर्मा आणि सोफिया हे दोघेही लंडनमधील एका क्लबमध्ये पहिल्यांदा त्यांची भेट झाली होती आणि पहिल्याच भेटीमध्ये रोहित शर्माने सोफियाला किस केल्याचे अभिनेत्रीने खुलासा केला होता. एवढेच नव्हे तर अभिनेत्रीने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की रोहित आणि तिच्या नात्याबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. रोहित शर्मा आणि तिचा ब्रेकअप का झालं याबाबत हे तिने स्पष्टपणे सांगितले होते. या मुलाखतीमध्ये अभिनेत्रीने सांगितले होते की रोहित शर्मा तिला खूप आवडायचा आणि ते एकमेकांच्या खूप जवळही होते असे अभिनेत्रीने सांगितले.
एवढेच नव्हे तर अभिनेत्रीने सांगितले होते की आमच्या दोघांमध्ये सगळ्या नीट सुरू होते पण जेव्हा माध्यमांशी रोहित शर्मा बोलायचा तेव्हा तो त्याची ओळख करून देताना ती त्याची फक्त एक फॅन होती असं त्याने सांगितले होते. अशा बोलल्याने अभिनेत्री सोफिया दुखावली आणि तेव्हापासून त्यांच्या नात्यांमध्ये दुरावा निर्माण झाला होता.
पुढे अभिनेत्रीने सांगितले की, अशा घटनेनंतर मी त्याच्यापासून संपर्क ठेवला नाही आणि त्याचा नंबरही माझ्या मोबाईल मधून डिलीट केला पण सोफिया सोबतच्या नात्याबद्दल रोहितने कधीही स्पष्टपणे सांगितले नाही. त्याचबरोबर रोहितने मीडियासमोरही कधीच खुलासा गेला नाही. सोफिया हयात हिने २०१७ मध्ये तिच्याहून दहा वर्षांनी लहान असलेल्या डिझायनर व्लॉड स्टॅनेस्कुशी लग्न केले होते त्यानंतर तिच्या आणि रोहित शर्माच्या नातामध्ये दुरावा आला.