Rohit Sharma
Rohit Sharma Named Captain of ICC T20I Team of The Year : रोहित शर्माने त्याच्या नेतृत्वाखाली २०२४ मध्ये भारताला टी२० विश्वचषक जिंकून दिला. ICC ने त्याला वर्षातील पुरुष टी-२० संघाचा कर्णधार म्हणून घोषित केले आहे. गेल्या वर्षी भारतीय संघाने या फॉरमॅटमध्ये शानदार कामगिरी केली होती. जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि हार्दिक पंड्या या वेगवान गोलंदाजांनाही संघात स्थान मिळाले आहे.
टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार आणि फलंदाज म्हणून सर्वोत्तम
गेल्या वर्षी म्हणजेच २०२४ हे वर्ष रोहित शर्मासाठी टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार आणि फलंदाज म्हणून सर्वोत्तम होते. ICC नेही हिटमॅनच्या कर्णधारपदाची ताकद मान्य केली आहे. ICCने रोहितला २०२४ च्या ‘टी-२० टीम ऑफ द इयर’चा कर्णधार बनवले आहे. ICC ने निवडलेल्या संघात रोहित, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि हार्दिक पंड्यासह चार भारतीय खेळाडूंचा समावेश आहे.
टी-२० विश्वचषकात टीम इंडियाची शानदार कामगिरी
गेल्या वर्षी, त्याच्या नेतृत्वाखाली भारताने टी-२० विश्वचषक जिंकला. गेल्या वर्षी झालेल्या टी-२० विश्वचषकात टीम इंडियाने शानदार कामगिरी केली आणि दुसऱ्यांदा ही प्रतिष्ठित ट्रॉफी जिंकली. गेल्या वर्षी त्याने ११ सामन्यांमध्ये ३७८ धावा केल्या होत्या. या काळात त्याची फलंदाजीची सरासरी ४२ होती. गेल्या वर्षी हिटमनने १६० च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. ज्यामध्ये ३ अर्धशतकांचा समावेश होता. रोहितचा सर्वोत्तम खेळ हा त्याने विश्वचषकाच्या सुपर ८ टप्प्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेल्या ९२ धावांचा होता.
रोहित शर्माला मिळाला ICC T20I Team of the year चा सन्मान
Congratulations to the elite players selected for the ICC Men’s T20I Team of the Year 2024 🙌 pic.twitter.com/VaPaV6m1bT
— ICC (@ICC) January 25, 2025
अर्शदीपने वर्षभर वेगवान गोलंदाजीत घातला धुमाकूळ
डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने गेल्या वर्षी टी-२० मध्ये शानदार कामगिरी केली. २०२४ मध्ये तो भारतीय संघासाठी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होता. या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने १८ सामन्यांमध्ये ३६ विकेट्स घेतल्या. पॉवरप्लेमध्ये चेंडू स्विंग करणे हे अर्शदीपचे वैशिष्ट्य आहे. त्याच्या धोकादायक यॉर्करवर फलंदाज पाणी मागताना दिसत आहेत. अर्शदीपने टी-२० विश्वचषकात अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात ९ धावा देत ४ विकेट्स घेतल्या, जो २०२४ मध्ये या फॉरमॅटमधील त्याचा सर्वोत्तम स्पेल होता.
हार्दिक पांड्या स्टार झाला
टी-२० मध्ये उत्कृष्ट फलंदाजी आणि गोलंदाजी
हार्दिक पांड्याने गेल्या वर्षी टी-२० मध्ये उत्कृष्ट फलंदाजी आणि गोलंदाजी केली. १७ सामन्यांमध्ये १६ विकेट्स घेण्याव्यतिरिक्त, त्याने ३५२ धावाही केल्या. तो अनेक वेळा संघाचा तारणहार बनला. टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पंड्याने शानदार गोलंदाजी केली. तो एक हिरो म्हणून उदयास आला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात त्याने १६ धावांचा उत्कृष्ट बचाव केला आणि भारताला विश्वचषक जिंकून दिला. अंतिम सामन्यात पंड्याने २० धावा देऊन ३ विकेट्स घेतल्या.
जसप्रीत बुमराहने टी-२० मध्ये शानदार पुनरागमन
जसप्रीत बुमराहने टी-२० विश्वचषकात शानदार कामगिरी केली होती. उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाने ८ सामन्यात १५ विकेट्स घेतल्या. बुमराहच्या धोकादायक यॉर्करचा सामना करणे कोणालाही सोपे नाही. गेल्या वर्षी त्याने सातत्याने चांगली कामगिरी केली. बुमराहला त्याच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी सर गारफील्ड सोबर्स ट्रॉफी आयसीसी पुरुष क्रिकेटर ऑफ द इयरसाठी नामांकन मिळाले आहे.
आयसीसी पुरुष टी-२० संघ २०२४ चा संघ खालीलप्रमाणे आहे: रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग (सर्व भारतीय), ट्रॅव्हिस हेड (ऑस्ट्रेलिया), फिल साल्ट (इंग्लंड), बाबर आझम (पाकिस्तान) , निकोलस पूरन (यष्टीरक्षक; वेस्ट इंडिज), सिकंदर रझा (झिम्बाब्वे), रशीद खान (अफगाणिस्तान) आणि वानिन्दु हसरंगा (श्रीलंका).