
फोटो सौजन्य - सोशल मिडिया
काल भारतीय संघाची टी20 मालिका दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पार पडली यामध्ये भारताच्या संघाने 3-1 अशी जिंकली. भारताचे दोन दिग्गज विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांनी टी20 क्रिकेटमधून निवृतीची घोषणा केली होती. त्यानंतर या दोघांनी कसोटी क्रिकेटमधून देखील अलविदा केला आहे. आता रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघे फक्त एकदिवसीय मालिका खेळताना दिसत आहेत. आता भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघे आगामी विजय हजारे ट्राॅफीचे सामने खेळताना दिसणार आहेत.
बीसीसीआयने त्यांच्या सर्व खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळावे लागेल असे निर्देश दिले आहेत. या कारणास्तव, रोहितने मुंबई क्रिकेट असोसिएशनला कळवले होते की तो विजय हजारे ट्रॉफी खेळेल. तथापि, रोहित शर्मासह काही मोठे मुंबई खेळाडू व्हीएचटीच्या संघाचा भाग नाहीत, जे आश्चर्यकारक आहे. यामुळे आता रोहित विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळणार आहे, मुंबई क्रिकेट असोसिएशनने संघाची घोषणा केली आहे यामध्ये तो खेळताना दिसणार आहे.
आज होणार T20 World cup 2026 साठी भारतीय संघाची घोषणा, वाचा कधी आणि कुठे पाहता येणार Live Streaming
आगामी विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबईचे कर्णधारपद शार्दुल ठाकुरकडे असणार आहे. रोहित शर्मा विजय हजारे ट्रॉफीचे दोन सामने खेळताना दिसणार आहे. यासाठी संघाची घोषणा झाली आहे. तुषार देशपांडे, मुशीर खान, आंगकृष्ण रघुवंशी, सरफराज खान यांसारख्या स्टार खेळाडूंचा मुंबईच्या संघामध्ये समावेश करण्यात आला आहे. रोहित शर्मा या स्पर्धेचे दोन सामने खेळणार आहे. यासंदर्भात आधीच माहिती देण्यात आली आहे. या स्पर्धेला सुरुवात 24 डिसेंबरपासून होणार आहे.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी दरम्यान पोटाच्या समस्येमुळे यशस्वी जयस्वालला पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. संजय पाटील यांनी आता त्याच्या पुनरागमनाबाबत एक महत्त्वाची माहिती दिली आहे, ते म्हणाले की, “वैद्यकीय पथकाकडून परवानगी मिळाल्यानंतर तो मुंबई संघात सामील होईल.” जयस्वाल चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि विजय हजारे ट्रॉफी त्याच्यासाठी महत्त्वाची असेल. तेथे चांगली कामगिरी करून तो टीम इंडियाच्या एकदिवसीय संघात आपले स्थान टिकवून ठेवण्याचे ध्येय ठेवेल.
Mumbai & Delhi announce their squads for the Vijay Hazare Trophy 2025–26! 🏆 With @ImRo45 & @imVkohli returning, all eyes are on the tournament starting 24 December 💥 pic.twitter.com/jtdZOXOLoN — Star Sports (@StarSportsIndia) December 19, 2025
शार्दुल ठाकूर (कर्णधार), तुषार देशपांडे, रोहित शर्मा (2 सामने), ओंकार तरमाले, इशान मुलचंदानी, सिल्व्हेस्टर डसूझा, मुशीर खान, साईराज पाटील, आंगकृष्ण रघुवंशी, सरफराज खान, सुयश शेंडगे, सिद्धेश लाड, चिन्मय सुतार, आकाश आनंद (विकेटकिपर), हार्दिक तामोरे (विकेटकिपर), शम्स मुलाणी, तनुष कोटियन