"Yes, I will be in the 2027 World Cup...", 'Hitman' Rohit Sharma's 'special' answer to a young fan; You will get emotional after hearing the words; Watch VIDEO
Rohit Sharma’s commentary on the 2027 World Cup : भारत आणि ऑस्ट्रेलिया(IND VS AUS )यांच्यात १९ ऑक्टोबरपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मलिका खेळली जाणार आहे, भारतीय संघ शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियामध्ये पोहचले आहेत. अशात आता रोहित शर्मा आणि विराट कोहली मोठ्या कालावधीनंतर पुनरागमन करत आहेत. त्यामुळे या अनुभवी खेळाडूंची सध्या जोरात चर्चा आहे. तसेच रोहित शर्माने त्याच्या एकदिवसीय क्रिकेटमधील भविष्याविषयीच्या सर्व अटकळींना पूर्णविराम दिला आहे. रोहित शर्माने स्पष्ट केले की त्याला २०२७ चा एकदिवसीय विश्वचषक खेळायचा असून त्यासाठी तो पूर्णपणे सज्ज आहे. त्याने एका कार्यक्रमादरम्यान त्याच्या तरुण चाहत्याला उत्तर देताना हे विधान केले आहे. त्याच्या विधानाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
रोहितने मेक-अ-विश फाउंडेशनमधील मुलांना भेट दिली होती. त्यावेळी त्याने एक वचन दिले आहे. भेटीदरम्यान, एका तरुण चाहत्याने त्याला विचारले की तो पुढील विश्वचषक खेळणार आही का? तेव्हा हसत हसत रोहितने यावर उत्तर दिले की, “हो, नक्कीच! मी भारताला ट्रॉफी आणण्यासाठी कठोर परिश्रम करत आहे.” व्हायरल झालेला हा व्हिडिओ सप्टेंबरमधील असून त्यावेळी रोहित शर्मा मुंबईत फाउंडेशनच्या मुलांशी भेटला होता. त्यावेळी, त्याने मुलांशी खेळकर पद्धतीने संवाद साधला आणि त्यांच्या प्रश्नांची मनापासून उत्तरे दिली होती.
रोहित आणि विराट कोहली ही भारताची अनुभवी जोडी चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर त्यांची पहिली एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी सज्ज झाली आहेत. ही तीन सामन्यांची मालिका २०२७ च्या विश्वचषकाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल असणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियन फलंदाज ट्रॅव्हिस हेडने देखील असे म्हटले आहे की रोहित आणि विराट दोघेही २०२७ च्या विश्वचषकापर्यंत भारतीय संघाचा भाग राहणार आहेत.
भारतीय निवड समितीने शुभमन गिलकडे एकदिवसीय कर्णधारपद सोपवले आहे. परंतु रोहित आणि विराटचा अनुभव अजूनही संघाचा कणा मानला जात आहेत. असे मानले जाते की दोन्ही वरिष्ठ खेळाडू परदेशी दौऱ्यांवर तरुण संघाला बळकटी देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील असे बोलले जात आहे.
हेही वाचा : Pak Afghan War : PCB ने निर्लज्जपणाचा गाठला कळस; अफगानी खेळाडूंच्या मृत्यूनंतर म्हणाले, “बदलीचा विचार करत…”