
T20 World Cup 2026 मध्ये Romario Shepherd ने रचला इतिहास (Photo Credit- X)
अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात ३१ वर्षीय शेफर्डने कठीण प्रसंगी फलंदाजीची धुरा सांभाळली. वेस्ट इंडिजची अवस्था ८३ धावांवर ७ बाद अशी दयनीय असताना शेफर्ड मैदानात उतरला. त्याने अवघ्या ३७ चेंडूंमध्ये ५२ धावांची नाबाद खेळी केली. या खेळीत त्याने ४ उत्तुंग षटकार आणि ३ चौकार लगावले. डावाच्या शेवटच्या चेंडूवर कॉर्बिन बॉशला चौकार मारत त्याने आपले ऐतिहासिक अर्धशतक पूर्ण केले.
Romario Shepherd is the first player to score a fifty batting at No. 9 at the #T20WorldCup 💪 pic.twitter.com/29DYj6sxMG — ESPNcricinfo (@ESPNcricinfo) February 26, 2026
शेफर्डने या खेळीसह अफगाणिस्तानच्या शफिकुल्लाहचा विक्रम मोडीत काढला आहे. २०१६ च्या विश्वचषकात दिल्लीत इंग्लंडविरुद्ध खेळताना शफिकुल्लाहने ९ व्या क्रमांकावर ३५ धावांची खेळी केली होती. तब्बल १० वर्षांनंतर शेफर्डने हा विक्रम मोडीत काढून नवा मैलाचा दगड प्रस्थापित केला.
IND vs ZIM : भारत-झिम्बाब्वे सामना तुम्ही कधी, कुठे आणि कसा मोफत पाहू शकता? जाणून घ्या सर्व तपशील
| खेळाडू | संघ | धावा | चेंडू | चौकार/षटकार | स्ट्राईक रेट | विरुद्ध | स्थळ | तारीख |
| रोमारियो शेफर्ड | वेस्ट इंडिज | ५२* | ३७ | ३/४ | १४०.५४ | दक्षिण आफ्रिका | अहमदाबाद | २६ फेब्रु, २०२६ |
| शफिकुल्लाह | अफगाणिस्तान | ३५* | २० | ४/२ | १७५.०० | इंग्लंड | दिल्ली | २३ मार्च, २०१६ |
| ग्रॅमी स्वान | इंग्लंड | ३४ | २० | ४/१ | १७०.०० | श्रीलंका | पल्लेकले | १ ऑक्टो, २०१२ |
| उमर गुल | पाकिस्तान | ३२ | १७ | २/३ | १८८.२३ | दक्षिण आफ्रिका | कोलंबो | २८ सप्टें, २०१२ |
| नइम इस्लाम | बांगलादेश | २८ | १७ | ०/३ | १६४.७० | भारत | नॉटिंघम | ६ जून, २००९ |
दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. विंडीजची सुरुवात अत्यंत खराब झाली असून पॉवरप्लेमध्येच त्यांनी ४ विकेट्स गमावल्या होत्या. सलामीवीर ब्रँडन किंग (२१) आणि शाई होप (१६) स्वस्त पाठी फिरले. एका टप्प्याला विंडीजची अवस्था ७ बाद ८३ अशी होती. येथून अनुभवी जेसन होल्डर आणि रोमारियो शेफर्ड यांनी डावाची सूत्रे हाती घेतली. या जोडीने ८ व्या विकेटसाठी ८९ धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. होल्डरने ३१ चेंडूत ४९ धावा केल्या, मात्र तो दुर्दैवीरीत्या धावबाद झाला. या दोघांच्या फटकेबाजीमुळे वेस्ट इंडिजने २० षटकांत ८ बाद १७६ धावांपर्यंत मजल मारली आणि दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी १७७ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य ठेवले.