फोटो सौजन्य - Rajasthan Royals सोशल मिडीया
राजस्थान रॉयल्स जर्सी : इंडियन प्रीमियर लीग २०२५ च्या ५० व्या सामन्यात आज राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये सामना सुरु झाला आहे. सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात राजस्थान बदललेल्या शैलीत दिसत आहे. आतापर्यत सर्व सामन्यांमध्ये राजस्थान रॉयल्सच्या संघाने निळ्या आणि गुलाबी जर्सीमध्ये पाहायला मिळाले आहेत. पण राजस्थान रॉयल्सचे सर्व खेळाडू गुलाबी जर्सी घालून मैदानात उतरले. अशा परिस्थितीत, राजस्थानने जर्सी का बदलली असा प्रश्न पडणे साहजिक आहे. राजस्थान रॉयल्सच्या संघाने आज गुलाबी जर्सी का घातली होती यासंदर्भात आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत.
राजस्थान रॉयल्सच्या संघाने ही जर्सी फ्रँचायझीच्या पिंक प्रॉमिस मोहिमेचा एक भाग आहे ज्याचा उद्देश ग्रामीण भारतातील महिलांना सक्षम बनवणे आहे. या मोहिमेला अधिकृतपणे पिंकप्रॉमिस असे म्हणतात. त्यानुसार, संघ राजस्थानमधील महिलांच्या नेतृत्वाखालील ग्रामीण परिवर्तनासाठी खरेदी केलेल्या प्रत्येक सामन्याच्या तिकिटातून १०० रुपये दान करणार आहे. आजच्या सामन्यात टॉसच्या आधी राजस्थान रॉयल्सच्या जर्सीबद्दल सांगण्यात आले होते.
याव्यतिरिक्त, सर्व रॉयल्स गुलाबी जर्सीच्या विक्रीतून मिळणारे सर्व पैसे त्यांच्या सामाजिक समानता शाखेला, रॉयल राजस्थान फाउंडेशन (RRF) दिले जातील. एवढेच नाही तर सामन्यात दोन्ही संघांनी मारलेल्या प्रत्येक षटकारासाठी, राजस्थान रॉयल्स आणि आरआरएफ सांभर परिसरातील सहा घरांना सौरऊर्जेने प्रकाशित करतील.
In support of @rajasthanroyals‘ #PinkPromise initiative for the women of Rajasthan. 💙🩷
Every six hit tonight will light up six homes with solar energy 😇#MumbaiIndians #PlayLikeMumbai pic.twitter.com/D7QwuKCq8p
— Mumbai Indians (@mipaltan) May 1, 2025
राजस्थान रॉयल्सने १८ व्या हंगामात आजपर्यंत १० सामने खेळले आहेत. या सीझनमध्ये संघाने फक्त ३ सामने जिंकले आहेत. राजस्थानला ७ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. ६ गुणांसह, राजस्थान सध्या पॉइंट्स टेबलमध्ये ८ व्या स्थानावर आहे. आणखी एका पराभवामुळे राजस्थान प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडेल. अशा परिस्थितीत, जर राजस्थानला अंतिम ४ च्या शर्यतीत राहायचे असेल, तर त्यांना आज कोणत्याही किंमतीत मुंबईला हरवावे लागेल.
राजस्थान रॉयल्सच्या संघाने झालेला गुजरात टायटन्सविरुद्ध सामन्यात संघाने कमालीची कामगिरी केली होती. यामध्ये आयपीएलच्या इतिहासातील सर्वात युवा खेळाडूने संघासाठी शतक झळकावले होते. त्याचबरोबर सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वाल संघासाठी सातत्याने कमालीची कामगिरी करत आहेत. आज त्या दोघांच्या फलंदाजीवर चाहत्यांचे लक्ष असणार आहे.