फोटो सौजन्य - सोशल मिडीया
अनुष्का शर्माच्या वाढदिवशी विराट कोहलीची पोस्ट : सध्या भारतीय क्रिकेट खेळाडू इंडियन प्रीमियर लीगच्या या १८ व्या सीझनमध्ये व्यस्त आहेत. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात आयपीएलची चर्चा सुरु आहे. या सीझनमध्ये इंडियन प्रीमियर लीगचे जेतेपद कोणाच्या हाती लागणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. यामध्ये असे अनेक नवे कर्णधार आहेत त्यांच्या कॅप्टन्सीचे मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात आहे. यामध्ये गुजरात टायटन्सचे नेतृत्व शुभमन गिल करत आहे तर दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व अक्षर पटेलने चांगले केले आहे. या सीझनमध्ये आरसीबीचे कर्णधार पद रजत पाटीदारला देण्यात आले आहे त्यामुळे सर्वानाच धक्का बसला पण सध्या त्याने त्याच्या कामगिरीने क्रिकेट चाहत्यांना सिद्ध केले आहे.
आरसीबीचा संघ सध्या पॉईंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर आहे. संघाचे सध्या १४ गुण आहेत. यामध्ये आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहली दमदार फॉर्ममध्ये आहे. त्याने सातत्याने संघासाठी दमदार खेळी खेळल्या आहेत. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात त्यांचे कौतुक केले जात आहे. आज विराट कोहलीसाठी खास दिवस आहे कारण त्यांच्या पत्नीचा आज वाढदिवस आहे त्याने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे आणि फक्त १५ मिनिटांमध्ये २ कोटींहून अधिक लोकांनी त्याची पोस्ट लाईक केली आहे. सोशल मीडियावर त्याने त्याच्या पत्नीसाठी खास कॅप्शन देखील लिहिले आहे.
अद्भुत खेळी, दुसऱ्याची हॅटट्रिक; श्रेयस आणि चहल यांनी एकमेकांची घेतली मजेदार मुलाखत; पहा Video
विराट कोहलीने त्याच्या पत्नीसोबत फोटो शेअर करून लिहिले आहे की, माझ्या जिवलग मित्राला, माझ्या जीवनसाथीला, माझ्या सुरक्षित जागेला, माझ्या बेस्ट हाफला, माझ्या सर्वस्वाला. तू आमच्या सर्वांच्या आयुष्याचा मार्गदर्शक आहेस. आम्ही तुला दररोज खूप जास्त प्रेम करतो. वाढदिवसाच्या शुभेच्छा माय लव्ह. या पोस्टखाली अनेक विराट कोहली आणि अनुष्काच्या या पोस्टला सोशल मीडियावर कॉमेंट केल्या आहेत.
आयपीएल २०२५ मधील रजत पाटीदारच्या संघाने म्हणजेच आरसीबीच्या कामगिरीबद्दल सांगायचे झाले तर संघाने या हंगामामध्ये कमालीची खेळी दाखवली आहे. ते सध्या पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहेत. आरसीबीच्या संघाने आतापर्यत या सीझनमध्ये १० सामने खेळले आहेत त्यामधील त्यांनी ७ सामन्यात विजय मिळवला आहे तर ३ सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. सध्या आरसीबीचे १४ गुण आहेत. त्यांचा पुढील सामना ३ मे रोजी चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध खेळवला जाणार आहे.