RR vs PBKS: 10 years of wait paid off! Punjab Kings qualify for the playoffs, captain Shreyas Iyer did a great feat..
RR vs PBKS : रविवार १८ मे रोजी आयपीएल २०२५ च्या ५९ व्या सामन्यात मध्ये डबल हेडर सामना खेळवण्यात आला होता. ज्यामध्ये संध्याकाळी गुजरात टायटन्सने दिल्ली कॅपिटल्सला पराभूत केले आणि आरसीबी आणि पंजाब किंग्जसह प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवला. पहिल्या सामन्यात, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालीळ पंजाब संघाने राजस्थान रॉयल्सचा पराभव करून प्लेऑफसाठी स्वतःचे स्थान मजबूत केले. नंतर, गुजरातने उर्वरित काम पूर्ण करून टाकले आणि पंजाबचा १० वर्षांचा दुष्काळ संपुष्टात आला.
आयपीएल२०२५ च्या ५९ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज सामना रंगला होता. यामध्ये पंजाबने प्रथम फलंदाजी करत २१९ धावा केल्या होत्या. प्रतिउत्तरात राजस्थान रॉयल्सचा संघ २०९ धावांचा करू शकला आणि परिणामी त्या संघाला पंजाबकडून १० धावांनी पराभव पत्करावा लगाला. या विजयाने पंजाब किंग्ज प्लेऑफच्या खूप जवळ पोहोचले. यानंतर, गुजरात टायटन्सने दिल्लीला हरवताच, पंजाबला प्लेऑफमध्ये प्रवेश मिळाला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली चमकदार कामगिरी करत पंजाब संघाने १० वर्षांनंतर आयपीएल प्लेऑफमध्ये स्थान पटकावले आहे. पंजाबच्या संघाने २००८ मध्ये पहिल्यांदाच प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवला होता.
पंजाब किंग्ज प्लेऑफमध्ये पोहोचताच कर्णधार श्रेयस अय्यरने कर्णधारपदात एक अनोखा विक्रम केला आहे. प्लेऑफमध्ये तीन वेगवेगळ्या संघांचे नेतृत्व करणारा अय्यर पहिला कर्णधार ठरला आहे. याआधी कोणत्याही कर्णधाराला आयपीएलमध्ये अशी मोठी कामगिरी करता आलेली नाही. पंजाबपूर्वी, अय्यरने दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्सनाही प्लेऑफमध्ये पोहोचवले होते.
LADIES AND GENTLEMAN – MEET SHREYAS IYER, THE FIRST CAPTAIN IN HISTORY TO TAKE 3 DIFFERENT TEAMS TO PLAYOFFS. 🥶 pic.twitter.com/NJKlgCP3F4
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 18, 2025
अय्यरने कर्णधार असताना दिल्ली कॅपिटल्सला आयपीएल २०२० च्या अंतिम फेरीत नेले होते, तेव्हा संघ विजेतेपद जिंकण्यात अपयशी ठरला होता. गेल्या हंगामात, त्याच्या नेतृत्वाखाली, कोलकाता संघाने केवळ प्लेऑफमध्ये प्रवेश केला नाही तर आयपीएलचे जेतेपद देखील आपल्या नावे केले होते. आता अय्यरकडे पंजाबला चॅम्पियन बनवण्याची उत्तम संधी चालून आली आहे.
हेही वाचा : DC vs GT : आयपीएलचा इतिहासात पहिल्यांदाच! गुजरात टायटनच्या संघाने दिल्ली कॅपिटल्सला 10 विकेट्सने केले पराभूत
आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामात पंजाब किंग्जचे आता लीग टप्प्यात २ सामने शिल्लक आहेत. संघ २४ मे रोजी दिल्ली कॅपिटल्स आणि त्यानंतर २६ मे रोजी मुंबई इंडियन्सशी सामना करणारा आहे. या दोन्ही सामन्यांमध्ये, पंजाब जिंकून पॉइंट टेबलमध्ये टॉप-२ मध्ये स्थान मिळवण्याचा प्रयत्न करताना दिसून येणार आहे.