राहुल द्रविड आणि वैभव सूर्यवंशी(फोटो-सोशल मीडिया)
RR vs PBKS : आयपीएल २०२५ च्या ५९ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सला सुरवात चांगली झाली असताना पंजाब किंग्जकडून १० धावांनी पराभव पत्करावा लागला आहे. आयपीएल २०२५ राजस्थान रॉयल्ससाठी चांगले राहिलेले नाही. आयपीएल २०२५ या पराभवानंतर, संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याने आशा व्यक्त केली आहे की, राजस्थान रॉयल्स पुढील वर्षी जोरदार पुनरागमन करणार आहे.
राजस्थान रॉयल्सच्या सलग पाचव्या पराभवानंतर देखील राहुल द्रविडला अपेक्षा आहे की, संघातील तरुण भारतीय खेळाडूंना लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायची संधी मिळणार आहे. ज्यामुळे त्याच्या संघाला पुढच्या वर्षी स्पर्धेत परतणे सोपे होईल.
हेही वाचा : LSG vs SRH : प्लेऑफच्या प्रवेशासाठी LSG ला ‘करो या मरो’, आज सनरायझर्स हैदराबादविरुद्ध लखनौचा लागणार कस…
सामन्यानंतर पत्रकार परिषदेत राहुल द्रविड म्हणाला की, आमच्याकडे बरेच तरुण भारतीय फलंदाज आहेत. आजही, जयस्वाल, वैभव आणि ध्रुव जुरेल यांनी ज्या पद्धतीने फलंदाजी केली. संजू आणि रियानने दाखवलेली क्षमता लक्षात घेता, ते एका वर्षात आणखी चांगली कामगिरी करतील. त्यानंतर द्रविडने रॉयल्सचे तरुण खेळाडू एका वर्षानंतर कसे चांगले प्रदर्शन करू शकतात हे देखील स्पष्ट केले आहे.
राहूळ पुढे म्हणाला की, वैभव भारतासाठी अंडर-१९ आणि इतर स्पर्धांप्रमाणे भरपूर क्रिकेट खेळणार आहे. तसेच, रियान परागला अजूनही खूप क्रिकेट खेळायचे आहे. म्हणून मला वाटते की, हे सर्व खेळाडू वर्षभर भारतासाठी भरपूर क्रिकेट खेळणार आहेत. जे कठीण क्रिकेट असणार आहे, आंतरराष्ट्रीय क्रिकेट असेल. त्यामुळे आशा आहे की, पुढच्या वर्षी जेव्हा परत येणार तेव्हा ते अधिक अनुभवी असणार आहेत. हे खूप प्रतिभावान खेळाडू असल्याचे राहुलने म्हटले आहे.
राहुल द्रविडला वाटले की, राजस्थानचे गोलंदाज आणि फलंदाज सामन्यात ‘फिनिशिंग टच’ देण्यात अपयशी ठरलेय आहेत. ज्यामुळे या हंगामात संघाची कामगिरी खराब राहिली आहे. राहूळ म्हणाला की आम्ही जवळ पोहचलो पण आम्हाला काम पूर्ण करू शकलो नाही. हा असा एक हंगाम राहीला आहे, जिथे तुम्हाला नेहमीच असे वाटते की आम्ही चेंडूने १५-२० धावा जास्त दिल्या आणि फलंदाजीने चांगल्या स्थितीत आल्यानंतर देखील खालच्या मधल्या फळीसह चांगली कामगिरी करता आली नाही आणि आम्हाला आवश्यक असलेले मोठे फटके मारता आले नाही.
राजस्थान रॉयल्सने या हंगामात १३ सामन्यांत फक्त तीन विजय मिळवता आले आहेत. राजस्थान रॉयल्सला १३ पैकी फक्त ३ सामने जिंकता आले. तर १० सामने गमावावे लागले आहेत.