फोटो सौजन्य - Gujarat Titans
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामन्याचा अहवाल : गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना पार पडला हा सामना गुजरात टायटन्सच्या संघाने जिंकला आहे आणि या विजयासह गुजरातच्या संघाने प्लेऑफमध्ये स्थान पक्के केले आहे. आजच्या सामनात गुजरात टायटनचा संघाने दिल्ली कॅपिटल्सला त्यांच्या घरच्या मैदानावर दहा विकेट्सने पराभूत केले आहे. या विजयाचा फक्त गुजरातचाच संघ नाहीत तर बंगळुरू आणि पंजाबच्या संघाने देखील प्लेऑफमध्ये स्थान पक्के केले आहे. या सामन्यात साई सुदर्शनने अर्धशतक झळकावले त्याचबरोबर कॅप्टन शुभमन गिलने आणि देखील अर्धशतकीय खेळी खेळली.
आजचा सामन्यात दोन्ही संघांचे कामगिरी कशी राहिली यावर एकदा नजर टाका. आजच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा सामना गुजरात टायटन्स यांच्यामध्ये पार पडला. या सामन्यात पहिल्या डावामध्ये दिल्लीच्या संघाने फलंदाजी करुन 199 धावा केल्या होत्या. यामध्ये केएल राहुल क्रिकेट चाहत्यांचे लक्ष वेधले. राहुनने आजच्या सामन्यात 60 चेंडूमध्ये 102 धावा केल्या. त्याच्या या खेळीने सोशल मिडीयावर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.
𝗡𝗲𝘅𝘁 𝗦𝘁𝗼𝗽: 𝗣𝗹𝗮𝘆𝗼𝗳𝗳𝘀 📍
Led by Shubman Gill, the 𝙂𝙪𝙟𝙖𝙧𝙖𝙩 𝙏𝙞𝙩𝙖𝙣𝙨 have made it to their third Top 4️⃣ finish in four years 🔥#GT fans, 2️⃣nd title loading? 🤔#TATAIPL | #DCvGT | @gujarat_titans pic.twitter.com/uJSCIFt9ub
— IndianPremierLeague (@IPL) May 18, 2025
गुजरातचे दोन्ही सलामीवीर फलंदाज साई सुदर्शन आणि शुभमन गिल यांनी संघाला दमदार सुरुवात करून दिली होती. आजच्या सामन्यांमध्ये एकही विकेट्स न गमावून गुजरात टायटनच्या संघाने सामना एकतर्फी जिंकला आहे. यामध्ये दोन्ही सलामीवीर फलंदाजांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. आजच्या सामन्यात साई सुदर्शनने 61 चेंडूंमध्ये 108 धावा केल्या. तर संघाचा कर्णधार शुभमन गिलने 53 चेंडूंमध्ये 93 धावा केल्या यामध्ये त्याने सात षटकार आणि तीन चौकार मारले.
DC vs GT : ‘दोनो भाई दोनो तबाही’साई सुदर्शन आणि शुभमन गिलच्या जोडीचा अरुण जेटली मैदानावर कहर
आजच्या विजयाचा गुजरात टायटनच्या संघाने गुणतालिकेमध्ये अव्वल स्थान गाठले आहे. त्याचबरोबर गुजरातचा संघ हा प्लेऑफमध्ये जाणारा पहिला संघ ठरला. त्याचबरोबर रॉयल चॅलेंजेस बंगरूळच्या संघाने देखील प्लेऑफमध्ये स्थान पक्के केले आहे. त्याचबरोबर तिसऱ्या क्रमांकावर असलेली पंजाब किंगच्या संघाने देखील प्लेऑफमध्ये उडी मारली आहे. प्लेऑफचे तीन संघ हे पक्के झाले आहेत. आता मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन संघांमध्ये चौथ्या स्थानासाठी लढत होईल.