Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

RR vs RCB : आरआर पराभवाचा वचपा काढण्यास सज्ज, आज आरसीबीशी करणार दोन हात; दोन्ही संघांचे संभाव्य प्लेइंग ११, जाणून घ्या

आजच्या ४२ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने भिडणार आहेत.  हा सामना आज २४ एप्रिल रोजी संध्याकाळी ७.३० वाजता बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Apr 24, 2025 | 02:11 PM
RR vs RCB: RR ready to bounce back from defeat, will face RCB today; Know the probable playing 11 of both teams

RR vs RCB: RR ready to bounce back from defeat, will face RCB today; Know the probable playing 11 of both teams

Follow Us
Close
Follow Us:

RR vs RCB : आयपीएल २०२५ चा १८ वा हंगाम सुरू असून आतापर्यंत ४१ सामने खेळवण्यात आले आहेत. गुणतालिकेत देखील आता मोठे उलटफेर बघायला मिळत आहेत. आजच्या ४२ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने असणार आहे.  हा सामना आज २४ एप्रिल रोजी संध्याकाळी ७.३० वाजता बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. दोन्ही संघ शेवटच्या वेळी आमनेसामने अआले होते तेव्हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सामना जिंकला होता. आता राजस्थान रॉयल्स या सामन्यात आपल्या पराभवाचा बदला काढण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. आपल्या घरच्या मैदानावर आरसीबीचा रेकॉर्ड आतापर्यंत काही  चांगला राहिलेला नाही. त्यामुळे चांगली कामगिरी करण्यास आरसीबी सज्ज असणार आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ८ सामन्यांमध्ये ५ सामन्यात विजय मिळवत पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानावर विराजमान आहे. त्याच वेळी, राजस्थान रॉयल्सचा संघ मात्र ८ सामन्यांमध्ये २ विजयांसह आठव्या स्थानावर तळाशी आहे.  प्लेऑफमध्ये राहण्यासाठी राजस्थान रॉयल्सला हा सामना जिंकावा लागणार आहे. त्याच वेळी, आरसीबी या विजयासह प्लेऑफमध्ये जाण्यासाठी आपला दावा अधिक मजबूत करू शकते.

हेही वाचा : PSL 2025 : आधी निष्काळजीपणा, नंतर आरडाओरड, PSL चा सामना क्षणामध्ये राड्यात बदलला; VIDEO VIRAL

खेळपट्टी अहवाल

चिन्नास्वामी स्टेडियमची खेळपट्टी नेहमीच फलंदाजांसाठी  फायदेशीर ठरली आहे. ही खेळपट्टी सपाट आहे आणि मैदानाच्या सीमा देखील लहान आहेत, ज्यामुळे मोठे शॉट्स सहज खेळताना दिसतात. या हंगामात आतापर्यंत येथे खेळल्या गेलेल्या सर्व सामन्यांमध्ये, गोलंदाज संघाला सुरुवातीला काही स्विंग मिळते, परंतु सामना जसजसा पुढे सरकतो तसतसे गोलंदाजांना बचाव करणे अधिक कठीण होते. तथापि, या हंगामात चिन्नास्वामी खेळपट्टी वेगळी दिसत आहे. येथे गोलंदाजांना मदत मिळत असल्याचे दिसत आहे.

हवामान अंदाज काय म्हणतो?

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २५ एप्रिलपर्यंत बेंगळुरू आणि दक्षिण कर्नाटकच्या इतर भागांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या काळात शहरात हलका ते मध्यम पाऊस आणि गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाच्या अहवालानुसार, बेंगळुरूमध्ये कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २२ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची अपेक्षा आहे.

हेही वाचा : MI vs SRH : Ishan Kishan चा प्रामाणिकपणा SRH च्या अंगलट! बाद न होताच धरला तंबूचा रस्ता, अंपायरही गोंधळात..पहा व्हिडिओ 

हेड टू हेड रेकॉर्ड..

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आतापर्यंत एकूण ३० सामने खेळवण्यात आले आहेत.  आरसीबीने १६ सामने जिंकले आहेत. तर राजस्थानने १४ सामने आपल्या नावे केले आहेत. आज राजस्थान रॉयल्स हा सामना जिंकून पराभवाचे अंतर कमी करू शकते.

बंगळुरू आणि राजस्थानचे संभाव्य  ११

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : फिल साल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रोमारियो शेफर्ड, टिम डेव्हिड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, यश दयाल, जोश हेझलवुड.

राजस्थान रॉयल्स :  यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी, रियान पराग (क), नितीश राणा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), शिमरोन हेटमायर, वानिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, महेश थेक्षाना/क्वेना मफाका, संदीप शर्मा, तुषार दे.

Web Title: Rr vs rcb rr ready to avenge defeat will face rcb today

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2025 | 02:11 PM

Topics:  

  • IPL 2025
  • RR vs RCB
  • Sanju Samson
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

IND vs AUS : भारताचा नवा कर्णधार! शुभमन गिल सांभाळणार टीम इंडियाची कमान, रोहित विराटचे पुनरागमन
1

IND vs AUS : भारताचा नवा कर्णधार! शुभमन गिल सांभाळणार टीम इंडियाची कमान, रोहित विराटचे पुनरागमन

India Squad Announcement : आज होणार ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी घोषणा! रोहित-विराटचे पुनरागमन जवळजवळ निश्चित
2

India Squad Announcement : आज होणार ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी घोषणा! रोहित-विराटचे पुनरागमन जवळजवळ निश्चित

क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी! Rohit-Virat चे टीम इंडियात पुनरागमन निश्चित! ‘या’ दिवशी होणार मोठी घोषणा
3

क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी! Rohit-Virat चे टीम इंडियात पुनरागमन निश्चित! ‘या’ दिवशी होणार मोठी घोषणा

RCB ला नवा मालक मिळाला? अदर पूनावालाचे नाव समोर; एक्सवरील ‘त्या’ पोस्टने उडाला गोंधळ 
4

RCB ला नवा मालक मिळाला? अदर पूनावालाचे नाव समोर; एक्सवरील ‘त्या’ पोस्टने उडाला गोंधळ 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.