रणजी ट्रॉफीमध्ये ऋतुराज गायकवाडचे वादळी अर्धशतक, महाराष्ट्राचा संघाची 275 धावांची आघाडी
Ranji Trophy 2025 : सध्या रणजी ट्रॉफीचे सामने सुरू आहेत. यामध्ये महाराष्ट्राचा पहिला सामना बडोद्या विरुद्ध सुरु आहे. कर्णधार ऋतुराज गायकवाडने शानदार खेळीचे प्रदर्शन करीत वादळी अर्धशतक ठोकत महाराष्ट्र संघाला चांगल्या स्थितीत नेऊन ठेवले आहे. पहिल्या इनिंगमध्ये महाराष्ट्र संघाने चांगला खेळ करीत 297 धावा केल्या. त्यानंतर बडोद्याचा संघ 145 धावांमध्येच गारद झाला. यामुळे महाराष्ट्र संघाला चांगली आघाडी मिळाली.
दुसऱ्या इनिंगमध्ये महाराष्ट्राची सुरुवात काहीशी अडखळतच झाली परंतु त्यानंतर कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि सिद्धेश वीरच्या संयमी खेळीने महाराष्ट्र संघाला आकार दिला. यामध्ये ऋतुराज गायकवाडचे वादळी अर्धशतक मोलाचे आहे. पहिल्या इनिंगमध्ये महाराष्ट्राकड़ून गोलंदाजी करताना रजनीश बुर्बानी, मुकेश चौधरी, रामकृष्ण घोष, हितेश वाळुंज, सिद्धेश वीर यांनी भेदक गोलंदाजीच्या जोरावर बडोद्याला अडकवून ठेवले.
रजनीशने 2, मुकेश चौधरी, 3, हितेश वाळुंज आणि सिद्धेश वीरने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली. तर रामकृष्ण घोषने 2 विकेट घेतल्या. दुसऱ्या इनिंगमध्ये ऋतुराजने शानदार खेळीच प्रदर्शन करीत 54 चेंडूत 66 धावा केल्या तर सिद्धेश वीरने 83 चेंडूत 37 धावा केल्या.