Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

SA vs BAN: बांग्लादेशविरुद्ध दक्षिण आफ्रिकेने जाहीर केले ODI -T20 संघ! केशव महाराज कर्णधारपदी; ३ वर्षांनंतर स्टार गोलंदाजाचे कमबॅक

SA announced Squad For ODI t20 Against Bangladesh: दक्षिण आफ्रिकेने बांग्लादेशविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-२० मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. यावेळी अनुभवी गोलंदाजांचे संघात पुनरागमन झाले आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 20, 2026 | 06:36 PM
SA announced Squad For ODI t20

SA announced Squad For ODI t20

Follow Us
Follow Us:
  • ODI-T20 मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेची घोषणा
  • दक्षिण आफ्रिकेच्या वनडे संघाला नवा कर्णधार
  • नॉर्खिया आणि एनगिडीचे संघात पुनरागमन
SA vs BAN: दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने पुढील महिन्यात बांग्लादेशविरुद्ध होणाऱ्या तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेसाठी संघांची घोषणा केली आहे. ही एकदिवसीय मालिका १ ते ७ डिसेंबर दरम्यान खेळली जाणार आहे. तर टी-२० मालिका १० ते १३ डिसेंबर दरम्यान खेळवली जाईल. ब्योर्न फॉर्च्युनची टी-२० संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर एकदिवसीय संघाची कमान केशव महाराजकडे सोपवण्यात आली आहे.

IND vs PAK: पुन्हा एकदा क्रिकेटचा महासंग्राम! भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार रंगणार; कधी अन् कुठे पाहाल महामुकाबला ?

एन्गिडा आणि नॉर्खियाची संघात कमबॅक

एकदिवसीय संघातील सर्वात महत्त्वाचे नाव लुंगी एनगिडी हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळलेला नाही. आता पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यामुळे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे. याशिवाय, त्याला एनरिक नॉर्खिया देखील संघात पुनरागमन करत आहे. नॉर्खियाने आपला शेवटचा एकदिवसीय सामना सप्टेंबर २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. तेव्हापासून तो या फॉरमॅटपासून दूर आहे. नॉर्खियाच्या पुनरागमनामुळे दक्षिण अफ्रिकेला गोलंदाजी विभागात फायदा होईल.

टेंबा बावुमा पोटरीच्या स्नायूच्या दुखापतीतून सावरत आहे, त्यामुळे तो एकदिवसीय मालिकेत खेळू शकणार नाही. त्याच्या जागी केशव महाराज संघाचे नेतृत्व करेल. बांग्लादेशविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेतील पहिल्या कसोटीदरम्यान महाराजला कसोटी संघातून वगळण्यात आले होते. तो दुसऱ्या कसोटीतही खेळणार नाही. त्याच्या जागी सेनुरन मुथुसामीचा कसोटी संघात समावेश करण्यात आला असून, सेंचुरियन येथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत एडन मार्कराम संघाचे नेतृत्व करेल.

अनेक मोठ्या खेळाडूंना दिली विश्रांती

दक्षिण आफ्रिकेने एकदिवसीय मालिकेसाठी आपल्या कसोटी संघातील बहुतांश खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. बावुमा व्यतिरिक्त, एडन मार्कराम, मॅथ्यू ब्रीट्झके, रायन रिकेल्टन, कागिसो रबाडा आणि मार्को जॅनसेन यांचाही एकदिवसीय संघात समावेश नसेल. दक्षिण आफ्रिकेला या हंगामात इंग्लंडविरुद्ध आणखी तीन कसोटी सामने खेळायचे आहेत, त्यामुळे या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. डेव्हिड मिलरलाही एकदिवसीय आणि टी-२० दोन्ही संघांमध्ये स्थान मिळालेले नाही. तो सध्या नेपाळ प्रीमियर लीगमध्ये खेळत आहे. एकदिवसीय संघात फलंदाजीची जबाबदारी क्विंटन डी कॉक, लुआन-ड्रे प्रिटोरियस आणि ट्रिस्टन स्टब्स यांच्यावर असेल. दरम्यान, देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सिनेटिंबा केसिलेचाही संघात समावेश करण्यात आला आहे.

टी२० आंतरराष्ट्रीय संघात युवा खेळाडूंना संधी

दक्षिण आफ्रिकेने टी२० मालिकेसाठी एक युवा संघ निवडला आहे. नियमित कर्णधार एडन मार्करामला विश्रांती देण्यात आली असून, ब्योर्न फॉर्च्युनला कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीतून सावरलेला युवा वेगवान गोलंदाज क्वेना म्फाका याचेही संघात पुनरागमन झाले आहे.

एकदिवसीय मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ: केशव महाराज (कर्णधार), डेवाल्ड ब्रेविस, कॉर्बिन बॉश, गेराल्ड कोएत्झी, क्विंटन डी कॉक, टोनी डी झोर्झी, ब्योर्न फॉर्च्युन, जॉर्डन हर्मन, ड्वेन यॅनसन, न्कोबानी मोकोएना, लुआन-ड्रे प्रिटोरियस, एनरिक नॉर्खिया, लुंगी एनगिडी, सिनेतिम्बा केशिल आणि ट्रिस्टन स्टब्स.

टी-20 मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ: ब्योर्न फॉर्च्युइन (कर्णधार), डेवाल्ड ब्रेविस, गेराल्ड कोएत्झी, कॉनर एस्टरहुइझेन, डोनोव्हन फेरेरा, जॉर्डन हरमन, डुआन यान्सन, क्वेना मफाका, न्गोबानी मोकोएना, न्काबा पीटर्स, लुआन-द्रे प्रिटोरियस, सिनेतिम्बा केशिले, ट्रिस्टन स्टब्स, प्रेनेलन सुब्रायन.

IND vs NZ: किवींचं कंबरड मोडत राहुल-जैस्वालने ३२ वर्षांचा दुष्काळ संपवला; केला ‘हा’ भलामोठा रेकॉर्ड

Web Title: Sa vs ban south africa odi t20 squad keshav maharaj captain nortje comeback pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2026 | 06:36 PM

Topics:  

  • ODI Series
  • SA vs BAN

संबंधित बातम्या

SA vs BAN: WTC गुणतालिकेत मोठी उलथापालथ! बांग्लादेशला लोळवत दक्षिण आफ्रिकेची अव्वलस्थानी झेप; टीम इंडिया कितव्या स्थानावर?
1

SA vs BAN: WTC गुणतालिकेत मोठी उलथापालथ! बांग्लादेशला लोळवत दक्षिण आफ्रिकेची अव्वलस्थानी झेप; टीम इंडिया कितव्या स्थानावर?

ENG vs AUS: कांगारूंना घरच्या मैदानावर लोळवलं! इंग्लंडचा ऑस्ट्रेलियाला दणका; मालिका जिंकत वनडे रँकिंगमध्ये मोठी झेप
2

ENG vs AUS: कांगारूंना घरच्या मैदानावर लोळवलं! इंग्लंडचा ऑस्ट्रेलियाला दणका; मालिका जिंकत वनडे रँकिंगमध्ये मोठी झेप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.