Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 19 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

SA vs BAN: WTC गुणतालिकेत मोठी उलथापालथ! बांग्लादेशला लोळवत दक्षिण आफ्रिकेची अव्वलस्थानी झेप; टीम इंडिया कितव्या स्थानावर?

SA Beat Bangladesh in 1st test WTC Points Table updated: दक्षिण आफ्रिकेने पहिल्या कसोटीत बांग्लादेशचा ९ विकेट्सने पराभव केला. या विजयानंतर, डब्ल्यूटीसी गुणतालिकेत मोठा बदल झाला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 19, 2026 | 06:39 PM
SA Beat Bangladesh in 1st test WTC Points Table updated:

SA Beat Bangladesh in 1st test WTC Points Table updated:

Follow Us
Follow Us:
  • दक्षिण आफ्रिकेने एका विजयाने समीकरणच बदललं
  • WTC गुणतालिकेत अव्वल स्थानावर कब्जा
  • टीम इंडिया कितव्या क्रमांकावर?
WTC 2025-2027 Points Table Updated: दक्षिण अफ्रिका आणि बांग्लादेश यांच्यात दोन सामन्यांती कसोटी मालिका खेळली जात आहे. जोहान्सबर्ग येथे झालेल्या पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने बांग्लादेशचा ९ विकेट्सने धु्व्वा उडवला. नाणेफेक जिंकून बांग्लादेशने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

बांग्लादेशने पहिल्या डावात ४०० धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने ५५७ धावा करून १५७ धावांची आघाडी घेतली. पाचव्या दिवशी दुसऱ्या डावात बांगलादेशचा संघ अवघ्या १६८ धावांवर सर्वबाद झाला, त्यामुळे दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी केवळ १२ धावांचे लक्ष्य होते, जे यजमानांनी सहज गाठले. दक्षिण आफ्रिकेच्या या विजयामुळे आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (WTC) २०२५-२७ च्या गुणतालिकेत मोठा बदल झाला आहे.

ENG vs AUS: कांगारूंना घरच्या मैदानावर लोळवलं! इंग्लंडचा ऑस्ट्रेलियाला दणका; मालिका जिंकत वनडे रँकिंगमध्ये मोठी झेप

WTC गुणतालिकेत दक्षिण आफ्रिका अव्वल क्रमांकावर

जोहान्सबर्ग येथे झालेल्या पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने बांग्लादेशला पराभूत करून जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (WTC) गुणतालिकेत एक मोठी उलथापालथ घडवली. गतविजेत्या दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडला मागे टाकत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. टेंबा बावुमाच्या नेतृत्वाखालील संघाचा सध्याच्या डब्ल्यूटीसी चक्रातील आठ सामन्यांमधील हा सहावा विजय आहे. या विजयामुळे प्रोटीज संघाची गुण टक्केवारी (PCT) ७५ पर्यंत वाढली असून, ते अव्वल संघ बनले आहेत.

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेच्या विजयामुळे न्यूझीलंडला मोठा धक्का बसला असून, ७२.२२ च्या PCT सह ते दुसऱ्या स्थानावर घसरले आहेत. त्यांच्यापाठोपाठ ऑस्ट्रेलिया ६९.२३ PCT सह तिसऱ्या स्थानावर, तर भारत ५१.५२ PCT सह चौथ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, या पराभवामुळे बांग्लादेशला मोठे नुकसान झाले आहे. त्यांचा पीसीटी ४०.७४ पर्यंत घसरला असला तरी, संघ पाचव्या स्थानावर कायम आहे. इंग्लंड त्यांच्यापेक्षा किंचित मागे सहाव्या स्थानावर आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामनाही वेलिंग्टनमध्ये खेळला जात आहे. त्यामुळे, काही दिवसांत डब्ल्यूटीसी गुणतालिकेत आणखी एक मोठा बदल दिसू शकतो.

दक्षिण आफ्रिकेने पहिला कसोटी सामना ९ विकेट्सने जिंकला

जोहान्सबर्ग येथील वॉन्डरर्स स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने बांग्लादेशचा ९ विकेट्स राखून पराभव केला. दुसऱ्या डावात फिरकी गोलंदाज सायमन हार्मर दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचा नायक ठरला. त्याने ५१ धावांत ६ विकेट्स घेतले. सामन्याच्या पाचव्या दिवशी, बांग्लादेशने आपला दुसरा डाव ५ बाद १०० धावा या स्थितीत सुरू केला.

मात्र, बांग्लादेशला जास्त धावा जोडता आल्या नाहीत आणि संपूर्ण संघ १६८ धावांवर सर्वबाद झाला. यामुळे दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी केवळ १२ धावांचे लक्ष्य होते. जे त्यांनी केवळ १.३ षटकांत एक विकेट गमावून पूर्ण केले. या विजयासह, दक्षिण आफ्रिकेने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरी कसोटी आता २३ नोव्हेंबरपासून सेंचुरियन स्टेडियमवर खेळवली जाईल.

Rising Stars Asia Cup 2026 साठी टीम इंडियाची युवा ब्रिगेड सज्ज! तिलक वर्माच्या हाती संघाची धुरा; भारताचा पहिला सामना कधी?

💡

Frequently Asked Questions

  • Que: दक्षिण आफ्रिकेने बांग्लादेशविरुद्ध पहिली कसोटी किती विकेट्सने जिंकली?

    Ans: दक्षिण आफ्रिकेने पहिली कसोटी ९ विकेट्सने जिंकली.

  • Que: दक्षिण आफ्रिका WTC गुणतालिकेत कितव्या स्थानावर पोहोचली?

    Ans: दक्षिण आफ्रिका ७५ टक्के गुणांसह पहिल्या स्थानावर पोहोचली.

  • Que: WTC २०२५-२७ गुणतालिकेत भारत कितव्या क्रमांकावर आहे?

    Ans: भारतीय संघ ५१.५२ टक्के गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.

Web Title: Wtc points table 2025 27 south africa beat bangladesh india ranking pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2026 | 06:39 PM

Topics:  

  • Test Series
  • WTC 2027
  • WTC Points Table

संबंधित बातम्या

IND vs NZ: अंपायरच्या निर्णयावर कर्णधार गिलचा पारा चढला! DRS वरून मैदानात हायव्होल्टेज ड्रामा, VIDEO व्हायरल
1

IND vs NZ: अंपायरच्या निर्णयावर कर्णधार गिलचा पारा चढला! DRS वरून मैदानात हायव्होल्टेज ड्रामा, VIDEO व्हायरल

IND Vs NZ: वेगवान वारे, 15 मिलीमीटर हिरवे गवत अन्…; वेलिंगटनमध्ये Team India ची खडतर परीक्षा
2

IND Vs NZ: वेगवान वारे, 15 मिलीमीटर हिरवे गवत अन्…; वेलिंगटनमध्ये Team India ची खडतर परीक्षा

IND Vs NZ: मोठा हादरा, मोठं नुकसान; टेस्ट सिरीज सुरू होण्याअगोदरच ‘हा’ खेळाडू झाला बाहेर, आता…
3

IND Vs NZ: मोठा हादरा, मोठं नुकसान; टेस्ट सिरीज सुरू होण्याअगोदरच ‘हा’ खेळाडू झाला बाहेर, आता…

IND vs NZ: वनडे-T20 चा थरार संपला, आता टीम इंडियाची ‘कसोटी’ परीक्षा! भारत-न्यूझीलंड पहिला सामना कधी अन् कुठे?
4

IND vs NZ: वनडे-T20 चा थरार संपला, आता टीम इंडियाची ‘कसोटी’ परीक्षा! भारत-न्यूझीलंड पहिला सामना कधी अन् कुठे?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.