Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 19 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ENG vs AUS: कांगारूंना घरच्या मैदानावर लोळवलं! इंग्लंडचा ऑस्ट्रेलियाला दणका; मालिका जिंकत वनडे रँकिंगमध्ये मोठी झेप

Eng Beat Aus by 2-1 In ODI Series Jump on ICC ODI ranking: इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील तिसरा एकदिवसीय सामना ९७ धावांनी जिंकून मालिका २-१ ने आपल्या नावावर केली. यामुळे त्यांना आयसीसी एकदिवसीय संघ क्रमवारीतही फायदा झाला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 19, 2026 | 04:49 PM
Eng Beat Aus by 2-1 In ODI Series

Eng Beat Aus by 2-1 In ODI Series

Follow Us
Follow Us:
  • इंग्लंडचा मालिका विजय ठरला गेमचेंजर
  • ऑस्ट्रेलियाला घरच्या मैदानावर नमवलं
  • ICC वनडे क्रमवारीत बदलले चित्र
ENG beat AUS by 2-1: इंग्लंड क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर शानदार कामगिरी करत तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली. बुधवार, १८ नोव्हेंबर रोजी होबार्ट येथील निंजा स्टेडियमवर तिसरा आणि अंतिम सामना खेळला गेला. या सामन्यात, इंग्लंडने यजमान ऑस्ट्रेलियाचा ९७ धावांनी पराभव केला.

या विजयासह इंग्लंडने मालिकाही २-१ ने खिशात घातली. मालिका विजयामुळे इंग्लंडने आयसीसी क्रमवारीतही सुधारणा केली. या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडला ७ विकेट्स राखून एकतर्फी पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर त्यांनी पुढील दोन सामन्यांमध्ये शानदार कामगिरी केली.

Rising Stars Asia Cup 2026 साठी टीम इंडियाची युवा ब्रिगेड सज्ज! तिलक वर्माच्या हाती संघाची धुरा; भारताचा पहिला सामना कधी?

इंग्लंड संघ सहाव्या स्थानावर पोहोचला

ऑस्ट्रेलियाविरुद्धची एकदिवसीय मालिका सुरू होण्यापूर्वी, इंग्लंड आयसीसी एकदिवसीय संघ क्रमवारीत श्रीलंका आणि अफगाणिस्तानच्या खाली, आठव्या स्थानावर घसरला होता. मालिका जिंकल्यामुळे, इंग्लंडने आता एक स्थान वर झेप घेतली आहे. इंग्लंड आता एकूण ९५ रेटिंग गुणांसह सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. त्यामुळे अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांनी प्रत्येकी एक स्थान घसरले असून, ते आता अनुक्रमे ७व्या आणि ८व्या स्थानावर पोहोचले आहेत. अफगाणिस्तान आणि श्रीलंका या दोघांचेही प्रत्येकी ९४ रेटिंग गुण आहेत.

आयसीसी एकदिवसीय संघ क्रमवारीत भारतीय संघ एकूण ११६ रेटिंग गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. न्यूझीलंड १०७ रेटिंग गुणांसह दुसऱ्या, तर दक्षिण आफ्रिका १०४ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. या एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलियाच्या पराभवामुळे त्यांच्या रेटिंग गुणांमध्ये घट झाली असून, त्यांचे रेटिंग १०२ वरून १०० वर आले आहे.

बेन डकेटला सामनावीर, तर टॉम बँटनला मालिकावीर

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातील १३३ धावांच्या शानदार खेळीबद्दल बेन डकेटला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. संपूर्ण मालिकेत प्रभावी फलंदाजी करत तीन सामन्यांत एकूण १९० धावा करणाऱ्या टॉम बँटनला मालिकावीर म्हणून गौरविण्यात आले.

आता दोन्ही संघ पाच सामन्यांची टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका खेळतील. पहिला सामना २१ नोव्हेंबर रोजी मेलबर्नमध्ये खेळला जाईल. एकदिवसीय मालिकेत पराभव पत्करल्यानंतर ऑस्ट्रेलिया टी-२० मालिकेत पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असेल, तर इंग्लंड आपली विजयी मालिका कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल.

IND vs NZ: अंपायरच्या निर्णयावर कर्णधार गिलचा पारा चढला! DRS वरून मैदानात हायव्होल्टेज ड्रामा, VIDEO व्हायरल

💡

Frequently Asked Questions

  • Que: इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरुद्धची वनडे मालिका किती फरकाने जिंकली?

    Ans: इंग्लंडने तीन सामन्यांची मालिका २-१ ने जिंकली.

  • Que: ICC वनडे क्रमवारीत इंग्लंड कोणत्या स्थानावर पोहोचला?

    Ans: इंग्लंड ९५ रेटिंग गुणांसह सहाव्या स्थानावर पोहोचला.

  • Que: ICC वनडे क्रमवारीत अव्वल स्थानावर कोणता संघ आहे?

    Ans: भारतीय संघ ११६ रेटिंग गुणांसह पहिल्या स्थानावर आहे.

Web Title: England beat australia 2 1 odi series climb 6th in icc odi rankings pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2026 | 04:49 PM

Topics:  

  • AUS vs ENG
  • Ben Duckett
  • Eng vs aus
  • ODI Series

संबंधित बातम्या

Ben Duckett: बदला! काही तासांपूर्वीच IPL मधून काढलं, पठ्ठ्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ठोकले शतक
1

Ben Duckett: बदला! काही तासांपूर्वीच IPL मधून काढलं, पठ्ठ्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ठोकले शतक

IND vs NZ: लाजच काढली! आधी फलंदाजांनी धुतलं मग गोलंदाजांनी रडवलं; Matt Henry च्या वादळात टीम इंडिया ८९ धावांत गारद
2

IND vs NZ: लाजच काढली! आधी फलंदाजांनी धुतलं मग गोलंदाजांनी रडवलं; Matt Henry च्या वादळात टीम इंडिया ८९ धावांत गारद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.