फोटो सौजन्य - सोशल मिडिया
दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये झालेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेमध्ये इंग्लंडच्या संघाला पराभवाचा सामना या मालिकेत करावा लागला आहे पण झालेल्या या शेवटच्या सामन्यांमध्ये इंग्लंडच्या संघाने दोन्ही सामन्यांमध्ये झालेल्या पराभवाचा बदला शेवटचा सामन्यात घेतला. शेवटच्या सामन्यांमध्ये इंग्लंडच्या संघाने दक्षिण आफ्रिकेला 342 धावांनी पराभूत केले. इंग्लंडच्या फलंदाजांनी शेवटच्या सामन्यांमध्ये दोन शतके तर दोन अर्धशतके झळकावली. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ही मालिका २–१ ने जिंकली आहे.
या मालिकेमध्ये दोन्ही संघांची कामगिरी कशी राहिली यासंदर्भात सविस्तर जाणून घ्या. या सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता इंग्लंडच्या संघाने पहिले फलंदाजी आव्हान स्वीकारत दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धू धू धुतलं. इंग्लंडच्या संघाने पहिले फलंदाजी करत पाच विकेट्स कमावून 414 धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेच्या संघाला इंग्लिश संघाने 72 धावांवर गुंडाळले.
दक्षिण आफ्रिकेचा खेळ 21 ओव्हरच्या आधीच संपला. इंग्लंडच्या फलंदाजी बद्दल सांगायचे झाले तर जेमी स्मिथ याने 62 धावांची खेळी खेळली. तर बेन डकेट याने 36 धावा केल्या, इंग्लंडचा दिग्गज ऑल राऊंडर जो रूट याने शतक झळकावले. जो रूट याने 96 चेंडूमध्ये 100 धावा केल्या यामध्ये त्यांनी सहा चौकार मारले. इंग्लंडचा युवा फलंदाज जेकब बेथल याने देखील शतकीय खेळी खेळली. त्याने 82 चेंडू मध्ये 110 धावा केल्या, या त्याने तीन षटकार आणि तेरा चौकार मारले.
Bethell & Root ton up 🏏
Jofra Archer on 🔥
342 run victory margin 👏
Full 3rd ODI highlights 👇— England Cricket (@englandcricket) September 7, 2025
इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रुक याने फार काही चांगली कामगिरी केली नाही तर स्वस्तात बाद झाला. जॉस बटलर याने नाबाद 62 धावा केल्या तर विल जॅक्स याने 19 धावा केल्या. कालच्या सामन्यांमध्ये जोफ्रा आर्चर याने कहर केला. जोफ्रा आर्चरला त्याच्या शानदार गोलंदाजीसाठी ‘प्लेअर ऑफ द मॅच’ आणि मालिकेत १७५ धावा करणाऱ्या जो रूटला ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ पुरस्कार देण्यात आला. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरने नऊ षटकांत १८ धावा देत चार विकेट घेतल्या. आदिल रशीदने ३.५ षटकांत १३ धावा देत तीन विकेट घेतल्या. ब्रायडन कार्सला दोन विकेट मिळाल्या.