फोटो सौजन्य - ICC सोशल मीडिया
दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड : आज चॅम्पियन ट्रॉफीमध्ये इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका आमनेसामने असणार आहेत. इंग्लंडच्या संघाचा आजचा चॅम्पियन ट्रॉफीचा शेवटचा सामना असणार आहे, त्याचबरोबर इंग्लिश संघाचा कर्णधार जोस बटलर आज इंग्लंडचे शेवटच्या सामन्यात नेतृत्व करताना दिसणार आहे. तर दक्षिण आफ्रिकेसाठी आजचा सामना महत्वाचा असणार आहे. इंग्लंड संघाची ही स्पर्धा फारच खराब राहिली आहे. त्यामुळे आज ते या स्पर्धेमध्ये विजय मिळवण्याच्या उद्देशाने मैदानात उतरतील. दक्षिण आफ्रिकेला आजच्या सामन्यांमध्ये विजय मिळवणे किंवा सामना कमी रन रेटने जिंकणे अनिवार्य आहे तरच ते सेमीफायनलमध्ये प्रवेश करणार आहेत.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सामना कराचीमधील नॅशनल बँक स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने झालेल्या दोन सामन्यांमध्ये पहिल्या सामन्यात त्यांनी अफगाणिस्तानला १०१ धावांनी पराभूत करून त्यांचा रन रेट मजबूत केला होता, तर ऑस्ट्रेलिया विरुद्ध सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. ऑस्ट्रेलियाचे दोन सामाने पावसामुळे रद्द करण्यात आले होते तर इंग्लंडविरुद्ध सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलिया दमदार फलंदाजीने सामना जिंकला होता.
South Africa are raring to seal their spot in the semi-finals, while England will play for pride! 🔥
Who do you think will come up on top? 🤔#ChampionsTrophyOnJioStar 👉 #SAvENG | TODAY, 1:30 PM on Star Sports 2 & Sports18-1
📺📱 Start Watching FREE on JioHotstar pic.twitter.com/P1IOx3iwMp
— Star Sports (@StarSportsIndia) March 1, 2025
कराची नॅशनल बँक स्टेडियमवर आज चॅम्पियन ट्रॉफीचा ११ वा सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड यांच्यात आज भारतीय वेळेनुसार २.३० वाजता सुरु होणार आहे. या सामन्याचे नाणेफेक सामान्यांच्या अर्ध्यातासाआधी म्हणजेच २ वाजता होणार आहे. मागील तीन दिवसांपासून पाकिस्तानमध्ये खराब वातावरण आहे त्यामुळे मागील तीन सामने पावसामुळे रद्द करण्यात आले आहेत.
दोन्ही संघाच्या आकडेवारीबद्दल बोलायचं झालं तर दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड हे दोन्ही संघ आतापर्यत चार वेळा एकमेकांसोबत भिडले आहेत. यामध्ये २ सामन्यांमध्ये साऊथ आफ्रिकेच्या संघाने विजय मिळवला आहे तर दोन सामन्यांमध्ये इंग्लिश संघाने विजय मिळवला आहे. आतापर्यत दोन्ही संघामध्ये ७० वनडे सामने झाले आहेत. यामध्ये इंग्लंडने ३४ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे तर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ३० सामने जिंकले आहेत. या स्पर्धेत ५ सामान्यांचा निकाल अनिर्णयीत राहिला आहे, तर एक सामना ड्रॉ झाला आहे.
टेम्बा बावुमा (कर्णधार), रायन रिकेल्टन, टोनी डी जॉर्गी, रॅसी व्हॅन डर ड्यूसेन, एडेन मार्कराम, डेव्हिड मिलर, वेन मुल्डर, मार्को जानसेन, कागिसो रबाडा, केशव महाराज आणि लुंगी एनगिडी.
जोस बटलर (कर्णधार), फिल साल्ट (विकेटकिपर), बेन डकेट, जेमी स्मिथ, जो रूट, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेमी ओव्हरटन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि मार्क वूड.