फोटो सौजन्य - ICC सोशल मीडिया
भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये शेवटचा चॅम्पियन ट्रॉफीचा सामना खेळवला जाणार आहे. भारताच्या संघाने दोन सामन्यांमध्ये विजय मिळवून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे, तर न्यूझीलंड संघ देखील अजुनपर्यत स्पर्धेमध्ये अपराजित राहिला आहे. त्यामुळे आता ग्रुप अ मधील दोन अपराजित संघ एकमेकांशी दुबई क्रिकेट स्टेडियम २ मार्च रोजी भिडणार आहेत. चॅम्पियन ट्रॉफीआधी न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर होता यावेळी किवी संघाने टीम इंडियाला वाईट वॉश केले होते. आता भारताचा संघ शेवटच्या साखळी सामन्यांमध्ये बदला घेण्याच्या उद्देशाने मैदानामध्ये उतरेल.
न्यूझीलंड आणि भारत हे दोन्ही संघ गट अ मध्ये आहेत यामध्ये सध्या न्यूझीलंड आणि टीम इंडियाचे ४ गुण आहेत पण गट अ टेबलमध्ये किवी संघ अव्वल स्थानावर आहे, तर टीम इंडिया ४ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे आणि नेट रन रेटच्या आधारावर आहे. आता जर टीम इंडियाला गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवायचे असेल तर त्यांना कोणत्याही परिस्थितीत न्यूझीलंडला हरवावे लागेल. अशा परिस्थितीत, तुम्हाला माहिती आहे का की चाहते भारत आणि न्यूझीलंडमधील लाईव्ह सामना कधी, कुठे आणि कसा पाहू शकतात?
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफी ग्रुप-अ सामना २ मार्च रोजी दुपारी २:३० वाजता भारतीय वेळेनुसार होईल. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफी ग्रुप-अ सामना दुबई स्टेडियमवर खेळला जाईल. भारत विरुद्ध न्यूझीलंड चॅम्पियन्स ट्रॉफी ग्रुप-अ सामन्याचे थेट प्रक्षेपण तुम्ही स्टार स्पोर्ट्स २ आणि स्पोर्ट्स १८-१ वर पाहू शकता. तुम्ही या सामन्याची लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ हॉटस्टार अॅप आणि वेबसाइटवर मोफत पाहू शकतात.
रोहित शर्मा, शुभमन गिल, केएल राहुल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, मोहम्मद शामी.
शुभमन गिल, केएल राहुल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, हर्षित राणा.