
आरसीबीचा गुजरातवर 5 विकेट्सने पराभव
साई सुदर्शनने लगावलेले वादळी शतक
विराट कोहलीने एकहाती फिरवला सामना
RC Vs GT IPL 2026: आयपीएलच्या हंगामात काल झालेल्या गुजरात टायटन्स अन् रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात गुजरात टायटन्सकडून डावखुरा फलंदाज साई सुदर्शनने शतकी खेळी केली. त्याने ख्रिस गेलसारख्या दिग्गजाचा विक्रम मोडीत काढत अनेक नवीन विक्रम प्रस्थापित केले आहेत. दरम्यान साई सुदर्शनने क्रिस गेलचे कोणकोणते रेकॉर्ड मोडले ते जाणून घेऊयात.
साई सुदर्शनने गेलला टाकले मागे
आरसीबीविरुद्ध साई सुदर्शनने 57 बॉल्समध्ये शतकी खेळी केली. त्यानंतर त्याने अनेक नवे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. साई सुदर्शनने या खेळीदरम्यान आयपीएलमधील आपल्या 2000 रन्स पूर्ण केल्या. 47 डावांमध्ये त्याने हा विक्रम केला आहे. याआधी हा विक्रम दिग्गज ख्रिस गेलच्या नावावर होता. सुदर्शन आता आयपीएलच्या इतिहासात सर्वात वेगाने २००० धावा पूर्ण करणारा फलंदाज ठरला आहे.
आरसीबीविरुद्ध साई सुदर्शन आणि कर्णधार शुभमन गिलने दुसऱ्या विकेटसाठी 128 रन्सची भागीदारी केली. गुजरात टायटन्सने इतिहासात आरसीबीविरुद्ध कोणत्याही विकेटसाठी केलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी भागीदारी ठरली आहे. या भागीदारीमुळे गुजरातला 200 धावांचा टप्पा ओलांडणे शक्य झाले. साई सुदर्शनने या भागीदारीत आक्रमक भूमिका बजावत ५८ चेंडूत नाबाद १०० धावा कुटल्या, तर शुभमन गिलने ३२ धावांचे योगदान दिले. या खेळीमुळे आयपीएलच्या इतिहासात साई सुदर्शनने आपले नाव कोरले आहे.
GT Vs RCB Live: गुजरातवर धडकलं Virat Kohli चं वादळ! शेवटच्या क्षणी फिरवला सामना; 5 विकेट्सने पराभव
गुजरातवर धडकलं Virat Kohli चं वादळ!
आरसीबीने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि गुजरातला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले. दरम्यान कर्णधार शुभमन गिल आणि साई सुदर्शनने गुजरात टायटन्सला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी गुजरातकडून सलामीवीर म्हणून 125 रन्स पेक्षा जास्त रन्सची भागीदारी केली. शुभमन गिल 32 रन्स करून आउट झाला.
DC Vs PBKS Live: अखेर 7 व्या सामन्यात अक्षरने बदलला निर्णय; टॉस जिंकून घेतला ‘हा’ निर्णय
आयपीएलचा थरार सुरू होऊन एक महिना होत आला आहे. दोन युवा कर्णधार आमनेसामने आले होते. बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात सामना खेळवला गेला. या सामन्यात चाहत्यांना मोठ्या धावसंख्या पाहायला मिळाल्या. गुजरातने प्रथम फलंदाजी करून आरसीबीला 206 रन्सचे टार्गेट दिले होते. अखेर या सामन्यात आरसीबीने गुजरात टायटन्सवर 5 विकेट्सने विजय मिळवला आहे. गुजरातकडून साई सुदर्शनने केलेली शतकी खेळी व्यर्थ गेली.