संदीप लामिछाने : 2 जून पासून T-20 विश्वचषक सुरु होणार आहे. संपूर्ण जग T-20 विश्वचषकाची आतुरतेने वाट पाहत आहे. परंतु याआधी नेपाळमध्ये T-20 विश्वचषकासंदर्भात मोठा राडा पाहायला मिळत आहे. विश्वचषक सुरू होण्यापूर्वी नेपाळ क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. असे म्हंटले जात आहे की, संघातील प्रमुख खेळाडूंपैकी एक संदीप लामिछाने विश्वचषक स्पर्धेला मुकण्याची शक्यता आहे. कारण त्याला अमेरिकेचा व्हिसा मिळू शकला नाही, अमेरिकेला त्याचा व्हिसा नाकारला आहे. 23 वर्षीय संदीपचा संघात समावेश करण्यासाठी नेपाळ क्रिकेट बोर्ड सर्वतोपरी प्रयत्न करत होते, परंतु यूएस दूतावासाने दुसऱ्यांदा त्याचा व्हिसा अर्ज नाकारला आहे.
[read_also content=”टीम इंडियाचा संघ नव्या वेषात आणि जोषात खेळणार T-20 विश्वचषक https://www.navarashtra.com/photos/t-20-world-cup-team-india-jersey-team-india-will-play-with-new-guise-and-enthusiasm-540519.html”]
संदीप लामिछाने हा नेपाळ संघाचा माजी कर्णधार होता, मात्र आता रोहित पौडेल आगामी विश्वचषक 2024 मध्ये संघाचे नेतृत्व करताना दिसेल. नेपाळ क्रिकेट बोर्डाने 2024 च्या T20 विश्वचषकासाठी 15 ऐवजी केवळ 14 खेळाडूंचा संघ जाहीर केला होता. यासंदर्भात निवड समितीचे सदस्य दीपेंद्र चौधरी यांनी सांगितले की, त्यांनी विश्वचषकासाठी केवळ 14 खेळाडूंचा संघ जाहीर केला होता आणि आयसीसीनेही संदीप लामिछानेची प्रतीक्षा करण्याचे मान्य केले होते. मात्र, सध्या लामिछनाच्या सर्व आशा संपुष्टात आल्या आहेत.
संदीप लामिछाने याला 18 वर्षाच्या युवतीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. परंतु काही दिवसांपूर्वीच संदीप लामिछाने याला बलात्कार प्रकरणात कोर्टातून क्लीन चिट मिळाली होती.
T-20 विश्वचषक 2024 साठी नेपाळचा संघ:
रोहित पौडेल (कर्णधार), आसिफ शेख, अनिल कुमार शाह, कुशल भुर्तेल, कुशल मल्ला, दीपेंद्र सिंग, ललित राजबंशी, करण केसी, गुलशन झा, सोमपाल कामी, प्रतिश जीसी, संदीप जोरा, अविनाश बोहरा , सागर ढकल, कमल सिंग.






