National Squash Championship : दोन गेम गमावले, तरी हार मानली नाही! अर्पितचा सनसनाटी विजय
National Squash Championship : एचसीएल 82व्या राष्ट्रीय स्क्वॉश स्पर्धेत अर्पित चोटालियाने शानदार खेळाचे प्रदर्शन करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सुरुवातीचे दोन गेम गमावल्यानंतरही हार न मानता अर्पितने जोरदार पुनरागमन केले आणि सदाशिव शिंगवाचा 3-2 असा पराभव करत पुरुष एकेरीच्या अंतिम 16 खेळाडूंमध्ये स्थान मिळवले. वांद्रे येथील ओटर्स क्लबच्या ग्लास-बॅक कोर्टवर ही स्पर्धा सुरू आहे.
स्क्वॉश रॅकेट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SRFI) आयोजित या स्पर्धेत अर्पित आणि सदाशिव यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. सुरुवातीचे दोन गेम अर्पितने 8-11, 9-11 अशा फरकाने गमावले. मात्र, त्यानंतर त्याने खेळाची लय बदलत तिसऱ्या गेममध्ये 11-3 असा मोठा विजय मिळवला. चौथ्या गेममध्येही 11-4 अशी बाजी मारत त्याने सामना 2-2 असा बरोबरीत आणला. निर्णायक पाचव्या गेममध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये जोरदार चुरस रंगली. अखेर अर्पितने 12-10 असा गेम जिंकत सामना आपल्या नावावर केला.
पुरुष गटातील अन्य सामन्यात रणजित सिंगने आदर्श बनोधाचा 11-6, 4-11, 14-12, 2-11, 11-6 असा पराभव केला. गोव्याच्या यश फडतेनेही उत्कृष्ट फॉर्म कायम राखत गुरवीर सिंगला 13-11, 11-9, 11-9 असे सरळ तीन गेममध्ये हरवले. अभय एस. वासुदेवने ध्रुव गंगाशेट्टीवर 11-3, 11-2, 11-7 असा विजय मिळवला. श्रेयांश झाने कान्हव नानावटीला 11-6, 7-11, 11-9, 11-6 असे पराभूत केले.
IPL 2027 Auction: कोण होणार मालामाल? कधी कुठे अन् किती वाजता होणार लिलाव? BCCI चा ‘हा’ मोठा निर्णय
महिला एकेरीच्या राऊंड ऑफ 32 फेरीत आर्या द्विवेदीने के. तमन्नावर 11-2, 11-2, 11-4 असा एकतर्फी विजय मिळवला. दिवा शाहने सुकीर्ती अरोराला, आशी शाहने बिजली दरवडाला, तर सुभद्रा के. सोनीने झायशा हडवानीला पराभूत केले. आकांक्षा साळुंखे आणि आकांक्षा गुप्ता यांनीही आपापल्या सामन्यांत विजय मिळवत पुढील फेरीत प्रवेश केला. स्पर्धेतील या सामन्यांमुळे पुरुष आणि महिला गटातील पुढील फेऱ्यांची उत्सुकता वाढली आहे.
IPL 2027 : ट्रेविस हेडला SRH ने रिलीज का केले? हेड कोच डॅनियल व्हेटोरी यांनी सांगितले कारण…
Ans: ही स्पर्धा मुंबईतील वांद्रे येथील ओटर्स क्लबच्या ग्लास-बॅक कोर्टवर सुरू आहे.
Ans: रणजित सिंग, यश फडते, अभय एस. वासुदेव आणि श्रेयांश झा यांनी आपापल्या सामन्यांत विजय मिळवला.
Ans: आर्या द्विवेदी, दिवा शाह, आशी शाह, सुभद्रा के. सोनी, आकांक्षा साळुंखे आणि आकांक्षा गुप्ता यांनी विजय मिळवला.






