Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Asha Bhosale |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kerala Cricket League 2025 : एका चेंडूवर 13 धावांचा थरार! संजू सॅमसनचा धुमाकूळ सुरूच; आशिया कपपुर्वी ठोकली दावेदारी 

केरळ क्रिकेट लीग स्पर्धेत भारताचा स्टार फलंदाज संजू सॅमसन आपल्या बॅटने धावांचा पाऊस पाडत आहे. संजू सॅमसनने थ्रिसूर टायटन्स संघाविरुद्ध संजू सॅमसनने 46 चेंडूत 89 धावांची स्फोटक खेळी केली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Aug 26, 2025 | 08:02 PM
Kerala Cricket League 2025: 13 runs off one ball! Sanju Samson's brilliance continues; Claims ahead of Asia Cup

Kerala Cricket League 2025: 13 runs off one ball! Sanju Samson's brilliance continues; Claims ahead of Asia Cup

Follow Us
Close
Follow Us:

Kerala Cricket League 2025 : आशिया कप 2025 स्पर्धा अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर होऊन एक आठवडा उलटला आहे. तरी अद्याप आशिया कपसाठी  अंतिम ११ मध्ये कोण असणार? याबाबत मात्र अजून प्रश्नचिन्ह आहेत. अशातच भारतीय संघाचा स्टार विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसनने पुन्हा एकदा आपण लयीत आला आहे. केरळ क्रिकेट लीग स्पर्धेत कोच्चि ब्लू टायगर्स संघाकडून खेळताना संजू सॅमसनने थ्रिसूर टायटन्स संघाच्या गोलंदाजांचा समाचार घेतला आहे. त्याने वादळी खेळी खेळून सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले आहे. यामुळे आता आशिया कपसाठी अंतिम 11 साठी आपली दावेदारी पक्की केली आहे.

केरळ क्रिकेट लीग स्पर्धेत संजू सॅमसनने थ्रिसूर टायटन्स संघाविरुद्ध संजू सॅमसनने 46 चेंडूत 89 धावांची स्फोटक खेळी खेळली आहे. या खेळीत त्याने 9 षटकार आणि 4 चौकारांची आतिषबाजी केली आहे. या दरम्यान त्याने एका चेंडूवर तब्बल 13 धावा काढल्या आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे कस शक्य झालं असावं?  या धावा एक नो बॉल आणि फ्रीट हिटमुळे आल्या आहेत. गोलंदाजाने पहिला चेंडू नो टाकला, संजूने या चेंडूवर षटकार लगावला. त्यानंतर फ्री हीटवर देखील त्याने षटकार खेचला. त्यामुळे एकाच चेंडूवर 13 धावा काढता आल्या. सिजोमन जोसेफला या षटकात संजुने चांगलाच धुतला. संजू सॅमसनला या खेळीमुळे आशिया कप स्पर्धेतील अंतिम ११ मध्ये स्थान मिळण्याची शक्यता बळावली आहे.

हेही वाचा : आशिया कप २०२५ पूर्वी प्रशिक्षक गौतम गंभीरच्या अडचणीत वाढ! दिल्ली उच्च न्यायालयाने लावले बोल; नेमकं प्रकरण काय?

गौतम गंभीर आणि सूर्यकुमार यादवच्या चिंतेत भर

वृत्तानुसार, भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि आशिया कप टी 20  संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव संजू सॅमसन ऐवजी शुबमन गिलला सलामीला पाठवणार असल्याची माहीती आहे.  याबाबत सूर्यकुमार यादवने देखील पत्रकार परिषदेत खुलासा दिला आहे.   त्यामुळे संजू सॅमसनला अंतिम ११ च्या बाहेर बसावं लागणार असल्याचे मानले जात आहे. पण संजू सॅमसनच्या आताच्या कांगिरीकडे पाहून  हे दिसत असल्याचे दिसत नाही. उलट जितेश शर्मा आणि शुभमन गिलची जागा धोक्यात आल्याचे बोलले जात आहे. आता सलामीला शुभमन गिलला संधी मिळते की संजू सॅमसनला? हे पाहणे रंजक ठरणार आहे.

केरळ क्रिकेट लीगमध्ये मागील सामन्यात देखील संजू सॅमसनने 51 चेंडूत 121 धावांची स्फोटक खेळी खेळली होती. या खेळीत त्याने 14 चौकार आणि 7 षटकार लगावले होते. त्यानंतर पुढच्याच सामन्यात संजू सॅमसनने 46 चेंडूत 89 धावांची खेळी साकारली आहे. संजू सॅमसन हा केरळ क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. त्याने या स्पर्धेत 74 च्या सरासरीने 223 धावा फटकावल्या आहेत.

हेही वाचा : Buchi Babu Competition : सरफराज एक्सप्रेस सुसाट! बीसीसीआयला दिला शतकी इशारा..

Web Title: Sanju samsons dominance continues in the kerala cricket league 2025 tournament

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2025 | 08:02 PM

Topics:  

  • Asia cup 2025
  • Sanju Samson

संबंधित बातम्या

CSK is Back! संजूच्या वादळी खेळीसमोर DC हतबल; चेन्नईचा IPL मधला पहिला ‘सुपर’ विजय
1

CSK is Back! संजूच्या वादळी खेळीसमोर DC हतबल; चेन्नईचा IPL मधला पहिला ‘सुपर’ विजय

CSK vs DC: 53 चेंडूत Sanju Samson चे तडाखेबंद शतक; दिल्लीचे ‘कॅपिटल’ राहणार की बुडणार? उभा केला 211 धावांचा डोंगर
2

CSK vs DC: 53 चेंडूत Sanju Samson चे तडाखेबंद शतक; दिल्लीचे ‘कॅपिटल’ राहणार की बुडणार? उभा केला 211 धावांचा डोंगर

CSK vs DC: मराठमोळ्या आयुष म्हात्रेची हाफसेंच्युरी, तर सॅमसनची शतकी खेळी; अखेर चेन्नईने फोडली डरकाळी
3

CSK vs DC: मराठमोळ्या आयुष म्हात्रेची हाफसेंच्युरी, तर सॅमसनची शतकी खेळी; अखेर चेन्नईने फोडली डरकाळी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.