Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sarfaraz Khan: टीम इंडियात दमदार कमबॅक, सरफराज खानचं शेवटपर्यंत पक्कं नव्हतं नाव; Inside Story

Sarfaraz Khan: सरफराज खान भारतीय संघात परतला. काहींच्या मते १७ किलो वजन कमी करणे फायदेशीर ठरले. तर काहींनी त्याला साई सुदर्शनचा योग्य पर्याय म्हटले. पण खरी कहाणी काय आहे जाणून घ्या

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 11, 2026 | 10:27 AM
सरफराज खानची टीम इंडियात वर्णी (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

सरफराज खानची टीम इंडियात वर्णी (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • सरफराज खानची भारतीय टेस्ट टीममध्ये वर्णी 
  • शेवटपर्यंत नावाची चर्चाही नसताना कशी झाली निवड 
  • काय आहे आतली बातमी 
Sarfaraz Khan: दोन वर्षे टीम इंडियाच्या बाहेर राहिल्यानंतर सरफराज खानच्या पुनरागमनाची कहाणी एखाद्या चित्रपटाच्या पटकथेपेक्षा कमी नाही. लोकांना वाटत असेल की रणजी ट्रॉफीमधील द्विशतक आणि १५-१७ किलो वजन कमी केल्यामुळे त्याला श्रीलंका दौऱ्यावर स्थान मिळाले. पण चित्र दिसते तितके स्पष्ट नाही. 

श्रीलंकेत पोहचेपर्यंतही भारतीय संघात सरफराज खानचा समावेश नव्हता. मग नक्की काय घडलं आणि कशी झाली सरफराज खानची निवड? गेल्या दोन वर्षांपासून सरफराज टीममध्ये नसतानाही त्याचं नाव नक्की कसं पुढे आलं? याचीच इनसाईड स्टोरी आज आपण या लेखातून जाणून घेऊया. 

Sarfaraz Khanचं टीम इंडियात कमबॅक; प्लेइंग-11 मध्ये संधी मिळणार? देवदत्त पडिक्कलच्या शतकाने बदलले समीकरण

सरफराज खानची दोन खेळाडूंशी स्पर्धा

खरं तर, सरफराज खानचे टीम इंडियामधील पुनरागमन केवळ त्याच्या मेहनतीवरच नाही, तर नशिबावरही अवलंबून होते. अखेरीस, या उजव्या हाताच्या फलंदाजाचे नशीब त्याच्या बाजूने उभे राहिले. जेव्हा साई सुदर्शन निर्धारित वेळेत उजव्या पायाच्या बोटाच्या दुखापतीतून सावरू शकला नाही, तेव्हा निवड समितीकडे त्याची जागा भरण्यासाठी तीन पर्याय होते. सध्याच्या संघात, कर्णधार शुभमन गिल आणि ऋषभ पंत यांच्या व्यतिरिक्त, ऋतुराज गायकवाड, शेख रशीद आणि सरफराज खान हे फिरकी गोलंदाजांविरुद्ध खेळण्यात सर्वात पारंगत आहेत. मात्र टीममध्ये सरफराज खानची वर्णी लागली. 

सरफराजच्या पुनरागमनात जुरेलची कमजोरी एक घटक आहे का?

ध्रुव जुरेल गेल्या काही काळापासून फिरकी गोलंदाजांविरुद्ध चांगली कामगिरी करत नाहीये, त्यामुळे १५ ऑगस्टला गॉल येथे सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीत या उत्तर प्रदेशच्या यष्टीरक्षक-फलंदाजाला एक शुद्ध फलंदाज म्हणून संधी दिली जाईल की नाही, हे अनिश्चित आहे. जुरेलने गेल्या महिन्यात भारत ‘अ’ संघाचा कर्णधार म्हणून श्रीलंकेचा दौरा केला होता आणि दोन ‘अ’ कसोटी सामन्यांमध्ये एक शतक व एक अर्धशतक झळकावले होते.

IND vs SL : श्रीलंका मालिकेआधी टीम इंडियात मोठा बदल! साई सुदर्शन OUT, ‘या’ स्टार खेळाडूची संघात एन्ट्री

सरफराजला अंतिम ११ मध्ये स्थान मिळेल का?

रविवारी संपलेल्या सराव सामन्यात ऑफ-स्पिनर्सविरुद्धची त्याची कमजोरी पुन्हा एकदा उघड झाली. त्यामुळे, पहिल्या कसोटीसाठी सरफराजला अंतिम ११ मध्ये स्थान मिळू शकते, कारण त्याच्याकडे पारंपरिक आणि रिव्हर्स स्वीपसह विविध प्रकारचे फटके आहेत. कोणत्या सामन्यात सरफराज हुकमी एक्का म्हणून नेहमीच समोर आला आहे. त्यामुळे भारतीय टीम आणि कर्णधार सरफराजला योग्यरित्या वापरून घेतील आणि खेळवतील अशीच आता चाहत्यांना अपेक्षा आहे. 

भारताचा कसोटी संघ: शुभमन गिल (कर्णधार), केएल राहुल, यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मानव सुथार, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार, देवदत्त पडिक्कल, सारांश जैन, आकिब नबी आणि सरफराज खान 

Web Title: Sarfaraz khan comeback in indian test team inside story

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2026 | 10:27 AM

Topics:  

  • IND vs SL
  • India vs Sri Lanka
  • Sarfaraz Khan
  • Test cricket

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.