Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sarfaraz Khanचं टीम इंडियात कमबॅक; प्लेइंग-11 मध्ये संधी मिळणार? देवदत्त पडिक्कलच्या शतकाने बदलले समीकरण

Sarfaraz khan Replaced sai sudharsan ind vs sl Test: दुखापतग्रस्त साई सुदर्शनच्या जागी सरफराज खानचा संघात समावेश करण्यात आला आहे. परंतु, सरफराजला प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळणार का हे पाहणे महत्तवाचे ठरेल.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 10, 2026 | 09:46 AM
Sarfaraz Khanचं टीम इंडियात कमबॅक; प्लेइंग-11 मध्ये संधी मिळणार? देवदत्त पडिक्कलच्या शतकाने बदलले समीकरण
Follow Us
Follow Us:
  • सरफराज खानचा टीम इंडियात कमबॅक
  • सरफराजसमोर देवदत्त पडिक्कलकचे आव्हान
  • मैदानात उतरण्याची संधी मिळणार का?

श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेआधी भारतीय क्रिकेट संघात आणखी एक मोठा बदल झाला आहे. जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीनंतर, साई सुदर्शनलाही या दौऱ्यातून वगळण्यात आले आहे. वृत्तानुसार, सुदर्शन दुखापतीतून पूर्णपणे बरा न झाल्यामुळे या मालिकेत खेळू शकणार नाही. बीसीसीआयने त्याच्या जागी सरफराज खानची निवड केली आहे. तो लवकरच कोलंबो येथे भारतीय संघात सामील होईल. एकीकडे देवदत्त पडिक्कलने शतक ठोकून आपली दावेदारी मजबूत केली तर सरफराजच्या समावेशामुळे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यासमोर गॉल कसोटीसाठी अंतिम अकरा खेळाडू निवडण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

6,6,6… मियाँ मॅजिक! चेंडूने नाही, बॅटने केला कहर; Mohammed Siraj ची तुफानी फटकेबाजी, VIDEO व्हायरल

सरफराज खानचा टीम इंडियात कमबॅक

रविवारी, ९ ऑगस्ट रोजी भारत आणि श्रीलंका क्रिकेट इलेव्हन यांच्यातील सराव सामना संपल्यानंतर लगेचच बीसीसीआयने या बदली खेळाडूची घोषणा केली. बीसीसीआयने म्हटले आहे की, सुदर्शनला उजव्या पायाला स्ट्रेस फ्रॅक्चर झाला असून तो दुखापतीतून पूर्णपणे बरा झालेला नाही. सध्या बंगळूरु येथील सेंटर ऑफ एक्सलन्स (CoE) मध्ये वैद्यकीय पथकाकडून त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले जात आहे. मंडळाने स्पष्ट केले की, प्रकृतीत सुधारणा होऊनही सुदर्शन कसोटी मालिकेत सहभागी होऊ शकणार नाही आणि म्हणूनच निवड समितीने सरफराज खानची निवड केली आहे.

सरफराज मधल्या फळीतील फलंदाज

सरफराजने भारतासाठी खेळलेल्या सहा कसोटी सामन्यांमध्ये प्रामुख्याने पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. काहीवेळा त्याला चौथ्या क्रमांकावरही पाठवण्यात आले होते. तेव्हा त्याने बंगळूरुमध्ये न्यूझीलंडविरुद्ध आपले पहिले कसोटी शतक झळकावले. त्यामुळे, गॉलमधील पहिल्या सामन्यासाठी भारतीय फलंदाजीच्या क्रमात बदल होण्याची शक्यता आहे.

सरफराजसमोर देवदत्त पडिक्कलकचे आव्हान

साई सुदर्शन संघाबाहेर असल्याने, सर्वात मोठा प्रश्न तिसऱ्या क्रमांकावर कोण फलंदाजी करणार, मात्र, सरफराजला ही जबाबदारी मिळण्याची शक्यता कमी आहे. प्रशिक्षक गंभीर कर्णधार शुभमन गिलला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवू शकतात किंवा सराव सामन्यात शानदार शतक झळकावणाऱ्या देवदत्त पडिक्कलला संधी मिळू शकते. सराव सामन्याच्या पहिल्या डावात पडिक्कल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता, तर दुसऱ्या डावात त्या स्थानावर ऋषभ पंतला संधी देण्यात आली होती.

शेवटचा सामना २०२४ मध्ये खेळला

सरफराज खान जानेवारी २०२५ पासून भारतीय संघाबाहेर आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तो एकही सामना खेळला नाही. तो शेवटचा नोव्हेंबर २०२४ मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात खेळला होता. मात्र, तेव्हापासून संघातून त्याच्या अनुपस्थितीमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्याच्याकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याबद्दल निवड समिती आणि संघ व्यवस्थापनावरही टीका झाली आहे. मात्र, आता त्याचे संघात पुनरागमन झाले आहे.

कोणत्या खेळाडूंना संधी मिळू शकते?

सलामीसाठी, यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल डावाची सुरुवात करतील हे जवळपास निश्चित मानले जात आहे. त्यानंतर देवदत्त पडिक्कल आणि कर्णधार शुभमन गिल वरच्या फळीतील फलंदाजीची धुरा सांभाळतील . ऋषभ पंत किंवा ध्रुव जुरेल पाचव्या क्रमांकावर, तसेच यष्टीरक्षकाच्या भूमिकेसाठी उपलब्ध असण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, रवींद्र जडेजा सहाव्या क्रमांकावर अष्टपैलू खेळाडू म्हणून खेळू शकतो.

IND vs SL : श्रीलंका मालिकेआधी टीम इंडियात मोठा बदल! साई सुदर्शन OUT, ‘या’ स्टार खेळाडूची संघात एन्ट्री

Web Title: Sarfaraz khan play in first test against sri lanka or devdutt padikkal headache for gautam gambhir

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2026 | 09:46 AM

Topics:  

  • Devdutt Padikkal
  • IND vs SL
  • Sarfaraz Khan
  • Test Series

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.