Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vijay hazare trophy 2025-026 : सरफराज खानने घडवला इतिहास! 51वर्षांनंतर केला ‘हा’ कारनामा; ठरला पहिलाच फलंदाज

विजय हजारे ट्रॉफी २०२५-२०२६ च्या सातव्या फेरीत गुरुवारी सरफराज खानने पंजाब संघाविरुद्ध खेळताना फक्त १५ चेंडूत अर्धशतक झळकावले आहे. यासह सरफराज खानने इतिहास घडवला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jan 08, 2026 | 09:32 PM
Vijay Hazare Trophy 2025-26: Sarfaraz Khan creates history! Achieves 'this' feat after 51 years; becomes the first batsman to do so.

Vijay Hazare Trophy 2025-26: Sarfaraz Khan creates history! Achieves 'this' feat after 51 years; becomes the first batsman to do so.

Follow Us
Close
Follow Us:

Sarfaraz Khan has made history ! विजय हजारे ट्रॉफी २०२५-२०२६ च्या सातव्या फेरीत गुरुवारी सरफराज खानने इतिहास रचला आहे.पंजाबसारख्या बलाढ्य संघाविरुद्ध खेळताना सर्फराजने फक्त १५ चेंडूचा सामना करत अर्धशतक झळकावले आहे, लिस्ट ए क्रिकेट इतिहासात त्याच्या आधी कोणत्याही भारतीय फलंदाजाला हा पराक्रम करता आलेला नाही.भारताने १३ जुलै १९७४ रोजी हेडिंग्ले येथे इंग्लंडविरुद्ध पहिला लिस्ट ए सामना खेळला. हा पहिलाच एकदिवसीय सामना होता. ५१ वर्षांत कोणत्याही भारतीय फलंदाजाने हा पराक्रम करता आलेला नाही.

हेही वाचा : PAK VS IND : “सीमेपलीकडील लोकांनी…,” T20 World Cup पूर्वी आफ्रिदीचा भारतावर हल्लाबोल; चाहत्यांचाही जोरदार पलटवार

सरफराजची वादळी खेळी

जयपूरमधील जयपुरिया विद्यालय मैदानावर २१७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना, मुंबईने शानदार सुरुवात केली. मुशीर खान आणि अंगकृष रघुवंशी यांनी ८.२ षटकांमध्ये पहिल्या विकेटसाठी ५७ धावांची भागीदारी रचली. त्याचा भाऊ मुशीर माघारी परतल्यावर, एका षटकात तीन षटकार आणि तीन चौकार लगावले. त्यानंतर त्याने डावखुरा फिरकीपटू हरप्रीत ब्रारला फटकावून पाच चेंडूत १९ धावा चोपल्या.  सरफराज खान अखेर २० चेंडूत ६२ धावांवर मयंक मार्कंडेने त्याला एलबीडब्ल्यू केले. त्याने आपल्या खेळीत ७ चौकार आणि ५ षटकार लगावले. उपलब्ध माहितीनुसार, लिस्ट ए क्रिकेटमधील हे चौथे सर्वात जलद अर्धशतक ठरले आहे. या फॉरमॅटमध्ये सर्वात जलद अर्धशतक श्रीलंकेच्या कौशल्या वीररत्नेने झळकवले होते. त्याने २००५-०६ च्या हंगामात एका घरगुती सामन्यात फक्त १२ चेंडूत अर्धशतक लगावले होते.

अभिजित काळेचा विक्रम काढला मोडीत

सरफराजने महाराष्ट्राच्या अभिजित काळे आणि बडोद्याचा अष्टपैलू खेळाडू अतित शेठ यांचे विक्रम मोडीत काढले आहे.  काळेने १९९५ मध्ये बडोद्याविरुद्ध १६ चेंडूत अर्धशतक झळकावले होते, तर शेठने २०२१ मध्ये छत्तीसगडविरुद्ध १६ चेंडूत अर्धशतक ठोकण्याचा विक्रम केला केला होता. तथापि, सरफराजच्या या ऐतिहासिक खेळीनंतरही मुंबईने सामना गमावला.

सरफराज हा मुंबईचा सर्वोत्तम धावा करणारा फलंदाज

सरफराज खान सध्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबईचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज असून त्याने सहा डावांमध्ये ७५.७५ च्या सरासरीने आणि १९०.५६ च्या स्ट्राईक रेटने ३०३ धावा फटकावल्या आहेत. त्याने ३१ डिसेंबर रोजी गोवाविरुद्ध १५७ धावा केल्या आणि त्यापूर्वी उत्तराखंडविरुद्धही अर्धशतक लगावले होते. मुंबईने या स्पर्धेच्या बाद फेरीसाठी आधीच पात्रता निश्चित केली आहे.

हेही वाचा : रोहित शर्माच्या फिटनेसची चलती! विराट कोहलीलाही टाकले मागे? ‘हिटमॅन’चा सुपर अवतार पाहिलात का? पहा VIDEO

मुंबईच्या पदरात पराभव

मुंबईच्या सामन्याबद्दल बोलायच झालं तर, १८ व्या षटकात १६९/३ वर मजबूत स्थितीत असून देखील, सूर्यकुमार यादव बाद झाल्यानंतर शिवम दुबे आणि कर्णधार श्रेयस अय्यर बाद माघारी गेले. यामुळे संघ अचानक कोसळला. चार विकेट्स शिल्लक असताना विजयासाठी १६ धावांची गरज असताना, मुंबईला हा सामना एका धावेने गमवावा लागला.

Web Title: Sarfaraz khan scored a rapid half century in the vijay hazare trophy 2025 26

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 08, 2026 | 09:32 PM

Topics:  

  • Record
  • Sarfaraz Khan
  • vijay hazare trophy 2025

संबंधित बातम्या

जखमी उपकर्णधाराची डरकाळी! श्रेयस अय्यरने केली 82 धावांची खेळी; मुंबई संघाचा 7 धावांनी विजयी 
1

जखमी उपकर्णधाराची डरकाळी! श्रेयस अय्यरने केली 82 धावांची खेळी; मुंबई संघाचा 7 धावांनी विजयी 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.