T20 World Cup पूर्वी आफ्रिदीचा भारतावर हल्लाबोल(फोटो-सोशल मीडिया)
PAK VS IND, T20 World Cup : टी२० विश्वचषकासाठी अवघा एक महिना बाकी आहे. या स्पर्धेसाठी क्रिकेट संघ तयारी करताना दिसत आहे. काही संघाकडून आपले संघ देखील जाहीर केले गेले आहे. दरम्यान पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीन आफ्रिदीने मागील वर्षी झालेल्या आशिया कपबाबत वादग्रस्त विधान केले असून ते चांगलेच चर्चेत आले आहे. आफ्रिदीने पत्रकार परिषदेमध्ये म्हटले आहे की, “सीमेपलीकडील लोकांकडून खेळाच्या भावनेचे उल्लंघन करण्यात आले आहे. आमचे काम क्रिकेट खेळणे आहे आणि आमचे पूर्ण लक्ष त्यावर केंद्रित आहे. आम्ही मैदानावर प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करणार.”
हेही वाचा : रोहित शर्माच्या फिटनेसची चलती! विराट कोहलीलाही टाकले मागे? ‘हिटमॅन’चा सुपर अवतार पाहिलात का? पहा VIDEO
आफ्रिदी केलेल्या विधानावर आता सोशल मीडियावर जोरदार टीका होताना दिसत आहे. एका वापरकर्त्याने लिहिले आहे की, “रिकाम्या शिट्ट्या जास्त आवाज करत असतात,” तर दुसऱ्या एकाने लिहिले आहे की, “तुम्ही प्रतिसाद देण्याइतकेही तंदुरुस्त आहात का?” दुसऱ्या भारतीय चाहत्याने आफ्रिदीची खिल्ली उडवली असून म्हटले की, “मला आयुष्यात असा आत्मविश्वास हवा आहे. मी तुम्हाला फक्त मैदानावर पाहतो.”
सप्टेंबर २०२५ मध्ये खेळवण्यात आलेला आशिया कप भारताने पाकिस्तानला हरवत जिंकला आहे. या आशिया कप ट्रॉफी वादाच्या आठवणी अजून देखील ताज्याच असल्याचे दिसून येत आहे. भारतीय संघाला आशिया कप जेतेपदाची ट्रॉफी अद्याप मिळालेली नाही. स्पर्धेतील विजेता सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला ट्रॉफी देण्यात आलेली नाही. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे (एसीसी) अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्या सहभागामुळे हा वाद निर्माण झाला आहे.
पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी ट्रॉफी त्यांच्यासोबत घेऊन गेल्याचे दिसून आले होते. भारतीय खेळाडूंनी मोहसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दर्शवला होता. २०२५ च्या आशिया कप फायनलपूर्वीच वातावरण अधिकच तणावपूर्ण झालेले दिसून आले होते, कारण भारतीय खेळाडूंनी त्यांच्या पाकिस्तानी समकक्षांशी हस्तांदोलन करण्यास देखील नकार दिला होता. कारण, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील दरी ऑपरेशन सिंदूरनंतर जास्त वाढली होती. त्यामुळे दोन्ही देशांमधील तणावानंतर भारतीय जनतेच्या भावना समोर ठेवत भारतीय संघाकडून हा निर्णय घेण्यात आला होता.
हेही वाचा : “हे सगळं काय आहे भाऊ..? Vaibhav Suryavanshi चा धुमाकूळ पाहून रविचंद्रन अश्विनही झाला अवाक






