Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चिनी भिंत भेदली! अखेर Satwik-Chirag ने China Masters 2026 चा किताब पटकावला; जी टिंग-रेन शियांग यूचा दारुण पराभव

satwik - chirag win China Masters 2026: भारतीय बॅडमिंटनपटू जोडी सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी दमदार कामगिरी करत चायना मास्टर्स २०२६ चे विजेतेपद पटकावले आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 07, 2026 | 02:02 PM
satwik - chirag win China Masters 2026

satwik - chirag win China Masters 2026

Follow Us
Follow Us:
  • सात्विक-चिरागचा ऐतिहासिक पराक्रम
  • अंतिम सामन्यात चिनी जोडीचा पराभव करत
  • चायना मास्टर्सचा किताब पटकावला
भारताची स्टार बॅडमिंटन जोडी सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी चायना मास्टर्सचे विजेतेपद पटकावून इतिहास रचला. अंतिम सामन्यात त्यांनी चिनी जोडी हे जी टिंग आणि रेन शियांग यू यांचा ११-२१, २१-१३, २१-१७ असा पराभव केला. पहिला सेट गमावल्यानंतर, भारतीय जोडीने शानदार कमबॅक करत पुढील दोन सेट जिंकून सामना आपल्या नावावर केला. या विजयासह, या भारतीय जोडीने या स्पर्धेतील मागील दोन अंतिम सामन्यांमधील निराशाही मागे टाकली. यापूर्वी सात्विक-चिराग यांनी उपांत्य फेरीत मलेशियाची जोडी नूर मोहम्मद अझरीन अयुब आणि टॅन वी किओंग यांचा पराभव केला होता.

Duleep Trophy 2026: ईशान किशनची बॅट तळपली! फायनलमध्ये ठोकले खणखणीत शतक; पहिल्या दिवशी ईस्ट झोन मजबूत स्थितीत

पहिल्या हाफमध्ये चिनी जोडीचा आक्रमक खेळ

अंतिम सामन्याच्या सुरुवातीला, हे जी टिंग आणि रेन शियांग यू या चिनी जोडीने आक्रमक खेळ केला. त्यांनी सात्विक आणि चिराग यांना कोणतीही संधी न देता पहिला सेट २१-११ ने सहज जिंकला. मात्र, पहिला सेट गमावल्यानंतरही भारतीय जोडीने हार मानली नाही. दुसऱ्या सेटमध्ये, सात्विक आणि चिराग यांनी उत्कृष्ट कौशल्य आणि बुद्धिमत्तेने खेळ करत प्रतिस्पर्ध्यांवर दबाव आणला. यामुळे, त्यांनी दुसरा सेट २१-१३ ने जिंकून सामना १-१ असा बरोबरीत आणला.

तिसऱ्या सेटमध्ये चिराग- सात्विक यांची दमदार कामगिरी

तिसऱ्या आणि अंतिम सेटमध्ये दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली. परंतु भारतीय जोडीने निर्णायक क्षणी आपला संयम राखला. सात्विक आणि चिराग यांनी सामन्याचा दबाव हाताळत २१-१७ ने सेट जिंकला. या विजयासोबतच त्यांनी चायना मास्टर्स ट्रॉफीही आपल्या नावावर केली. या विजयामुळे, २०२३ आणि २०२५ च्या अंतिम सामन्यांमधील पराभवाची निराशाही मागे टाकून सात्विक आणि चिराग यांनी अखेर विजेतेपदाची ट्रॉफी उंचावली.

सात्विक-चिराग २०२३ आणि २०२५ मध्येही गाठली अंतिम फेरी

चायना मास्टर्स ही स्पर्धा सात्विक आणि चिरागसाठी नेहमीच एक आव्हानात्मक स्पर्धा राहिली आहे. या भारतीय जोडीने यापूर्वी २०२३ आणि २०२५ मध्ये अंतिम फेरी गाठली होती. परंतु दोन्ही वेळा त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. यावेळीही, अंतिम फेरीत त्यांचा सामना यजमान चिनी जोडीशी झाला, परंतु सात्विक आणि चिरागने दबावाखाली शानदार पुनरागमन करत विजेतेपद पटकावले. चिनी भूमीवरील हा विजय या भारतीय जोडीसाठी ऐतिहासिक ठरला आहे.

Women’s Asia cup 2026: पाकिस्तानचा खेळ खल्लास! आता कोणाचा गेम करणार? सेमीफायनलमध्ये भारताचा ‘या’ संघाशी होणार महामुकाबला

Web Title: Satwiksairaj rankireddy chirag shetty win china masters 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2026 | 02:01 PM

Topics:  

  • Badminton
  • China
  • Chirag Shetty
  • Satwiksairaj Rankireddy

संबंधित बातम्या

Satwik-Chirag चा दमदार ‘स्मॅश’! China Masters मध्ये भारतीय जोडीची विजयी घोडदौड; मलेशियाला धूळ चारत फायनलमध्ये धडक
1

Satwik-Chirag चा दमदार ‘स्मॅश’! China Masters मध्ये भारतीय जोडीची विजयी घोडदौड; मलेशियाला धूळ चारत फायनलमध्ये धडक

Unique Business Idea : अजब कल्पना अन् गजब कमाई! लोकांची खाज घालवून ‘हा’ तरुण कमावतोय महिन्याला 1400000 रुपये!
2

Unique Business Idea : अजब कल्पना अन् गजब कमाई! लोकांची खाज घालवून ‘हा’ तरुण कमावतोय महिन्याला 1400000 रुपये!

Badminton: पुण्यात बॅडमिंटनचा थरार रंगणार! १० संघ, १७८ खेळाडू; टाय सामन्यात केवळ…
3

Badminton: पुण्यात बॅडमिंटनचा थरार रंगणार! १० संघ, १७८ खेळाडू; टाय सामन्यात केवळ…

China Masters मध्ये श्रीकांतची कमाल! चुरशीच्या लढतीत व्हिक्टर लाईला चारली धूळ; शानदार विजयासह क्वार्टर फायनलमध्ये धडक
4

China Masters मध्ये श्रीकांतची कमाल! चुरशीच्या लढतीत व्हिक्टर लाईला चारली धूळ; शानदार विजयासह क्वार्टर फायनलमध्ये धडक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.