Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shafali Verma : …तेव्हापासून माझी झोप उडालेली! ‘त्या’ दिवसाचा शेफालीकडून धक्कादायक खुलासा

Shafali Verma : शेफाली वर्मा पहिल्या टी-२० सामन्यात ४ धावांवर बाद झाल्यानंतर रात्रभर झोपू शकली नव्हती. दुसऱ्या सामन्यात २५ चेंडूंत ५५ धावा करत भारताला विजय मिळवून दिला.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 19, 2026 | 04:56 PM
Shafali Verma : ...तेव्हापासून माझी झोप उडालेली! 'त्या' दिवसाचा शेफालीकडून धक्कादायक खुलासा

Shafali Verma : ...तेव्हापासून माझी झोप उडालेली! 'त्या' दिवसाचा शेफालीकडून धक्कादायक खुलासा

Follow Us
Follow Us:
  • दुसऱ्या सामन्यात शेफालीची धुंवाधार फलंदाजी
  • कटु अनुभवाचा शेफालीकडून खुलासा
  • सातत्यासाठी ऑस्ट्रेलियन फलंदाजांच्या खेळीचे विश्लेषण
 

भारतीय महिला क्रिकेट संघाची नवनियुक्त उपकर्णधार शेफाली वर्माने (Shafali Verma) झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात वादळी फलंदाजी करत भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. तिने अवघ्या 25 चेंडूंत 4 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने 55 धावा केल्या. या शानदार कामगिरीसाठी तिला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. मात्र, या खेळीमागे पहिल्या सामन्यातील निराशा आणि त्यातून सावरण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची कहाणी आहे.

पहिल्या टी-20 सामन्यात ऑफस्पिनर न्याशा ग्वांझुराच्या गोलंदाजीवर शेफाली अवघ्या 4 धावांवर बाद झाली होती. गोलंदाजाने स्वतःच झेल टिपत तिला माघारी धाडले होते. या पद्धतीने बाद झाल्याची खंत शेफालीच्या मनात इतकी होती की, त्या रात्री तिला झोपही लागली नाही.

दुसऱ्या सामन्यातील विजयानंतर शेफालीने आपली भावना व्यक्त केली. ती म्हणाली, मागील सामन्यात मी ज्या पद्धतीने बाद झाले, त्यानंतर मला रात्रभर झोपही लागली नाही. मात्र, मी स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न केला. पुढच्या दिवशी मला काय करायचे आहे, याचा विचार केला आणि त्याची अंमलबजावणी मैदानात करण्यावर लक्ष केंद्रित केले.

त्याच गोलंदाजाविरुद्ध शेफालीचा पलटवार

दुसऱ्या सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करताना शेफालीने पहिल्याच षटकात न्याशा ग्वांझुराविरुद्ध चौकार आणि षटकार ठोकत आपला इरादा स्पष्ट केला. तिने अवघ्या 24 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. तिच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर भारताने 104 धावांचे लक्ष्य केवळ 8.5 षटकांत एका विकेटच्या मोबदल्यात गाठले आणि मालिकेत विजयी आघाडी मिळवली.

फिरकी गोलंदाजीविरुद्धच्या रणनीतीबाबत बोलताना शेफालीने आपल्या फलंदाजीतील बदलांचाही उल्लेख केला. ती म्हणाली की, आता ती थोडे झुकून खेळण्यास आणि चेंडूवर योग्य टायमिंग साधण्यास प्राधान्य देते. चौकार-षटकार मिळत नसतील, तर एकेरी धावा काढून धावफलक हलता ठेवण्याचा प्रयत्न करते. आपल्या योजना सोप्या ठेवून त्यांची मैदानात अंमलबजावणी करण्यावर तिचा भर आहे.

Nagpur News : विदर्भाच्या गोलंदाजांचा जम्मू-काश्मीरला दणका; २६० धावांत डाव संपुष्टात, कवलप्रीतचे शतक हुकले

सातत्यासाठी ऑस्ट्रेलियन फलंदाजांचा अभ्यास

शेफालीला 2025 मध्ये भारतीय महिला एकदिवसीय संघातून वगळण्यात आले होते. त्या काळात तिने आपल्या फलंदाजीतील उणिवा शोधून त्यावर काम केले. विशेषतः सातत्याने धावा कशा करायच्या, यावर तिने लक्ष केंद्रित केले.

याबाबत शेफाली म्हणाली, 2025 मध्ये मी घरी असताना माझ्या खेळात कोणत्या गोष्टी सुधारता येतील, याचा विचार केला. सर्वप्रथम माझ्या मनात सातत्याचा मुद्दा आला. संघासाठी सातत्याने धावा करणे महत्त्वाचे आहे. मी ऑस्ट्रेलियन फलंदाजांच्या खेळाचे विश्लेषण केले आणि त्या कशा फलंदाजी करतात, हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. आता संघासाठी जास्तीत जास्त धावा करून विजय मिळवून देण्याचा माझा प्रयत्न आहे.

शेफालीच्या या खेळीने तिचा आत्मविश्वास पुन्हा उंचावला असून, भारतीय संघासाठी सातत्यपूर्ण योगदान देण्याचा तिचा निर्धारही स्पष्ट झाला आहे.

IND vs NZ: सॅमसनच्या कमबॅकने वैभव सूर्यवंशीचे टेन्शन वाढलं; न्यूझीलंड दौऱ्यावरही संधी मिळणार नाही? श्रेयस अय्यरने दिले संकेत

💡

Frequently Asked Questions

  • Que: शेफाली वर्मा दुसऱ्या टी-२० सामन्यात किती धावा केल्या?

    Ans: शेफालीने २५ चेंडूंत ४ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने ५५ धावा केल्या.

  • Que: . पहिल्या सामन्यात शेफाली कशी बाद झाली होती?

    Ans: न्याशा ग्वांझुराच्या गोलंदाजीवर शेफाली अवघ्या ४ धावांवर बाद झाली. गोलंदाजाने स्वतःच तिचा झेल घेतला होता.

  • Que: शेफालीला रात्रभर झोप का लागली नव्हती?

    Ans: पहिल्या सामन्यात ज्या पद्धतीने ती बाद झाली, त्याची खंत तिला होती. त्यामुळे ती रात्रभर झोपू शकली नाही.

Web Title: Shafali verma could not sleep after dismissal zimbabwe t20 rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2026 | 04:56 PM

Topics:  

  • Indian Women Cricket Team
  • Shefali Verma
  • Zimbabwe

संबंधित बातम्या

IND Vs ZIM: क्लीन स्वीप देण्यासाठी Team India च्या वाघिणी सज्ज; तिसरा सामना कुठे आणि कधी?
1

IND Vs ZIM: क्लीन स्वीप देण्यासाठी Team India च्या वाघिणी सज्ज; तिसरा सामना कुठे आणि कधी?

IND Vs ZIM: नंदिनी शर्माने झिम्बाब्वेला रोखले! भारताला विजयासाठी केवळ 115 रन्सची गरज
2

IND Vs ZIM: नंदिनी शर्माने झिम्बाब्वेला रोखले! भारताला विजयासाठी केवळ 115 रन्सची गरज

भारतीय महिला क्रिकेटला मोठा धक्का! स्टार सलामीवीर Poonam Raut ची निवृत्ती
3

भारतीय महिला क्रिकेटला मोठा धक्का! स्टार सलामीवीर Poonam Raut ची निवृत्ती

IND Vs ZIM: आता कसोटी स्मृतीच्या नेतृत्वाची; झिम्बाब्वेविरुद्ध कर्णधार म्हणून खेळणार पहिलाच सामना
4

IND Vs ZIM: आता कसोटी स्मृतीच्या नेतृत्वाची; झिम्बाब्वेविरुद्ध कर्णधार म्हणून खेळणार पहिलाच सामना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.