फोटो सौजन्य - सोशल मीडिया
शाकिब अल हसनवर मर्डर केस : बांग्लादेशचा माजी कर्णधार शाकिब अल हसन त्याच्या गोलंदाजीने आणि फलंदाजीने प्रेक्षकांना प्रभावित करत असतो. त्याचबरोबर त्याच्या तपाट अंदाजानेच तो मैदानामध्ये खेळत असतो. काही दिवसांपूर्वी शाकिब अल हसनने बांग्लादेश क्रिकेट बोर्डवर अनेक आरोप केले होते. आता बांग्लादेशचा अष्टपैलू शाकिब अल हसन अडचणींमध्ये वाढ झाली आहे. मीडियाच्या माहितीनुसार असे सांगण्यात येत आहे की, शाकिब अल हसनने त्याच्या तापट स्वभावामुळे गुन्ह्याचा बळी ठरला आहे. आता शाकिब अल हसनवर थेट मर्डर केस दाखल झाली आहे ही बातमी ऐकून सगळेच चकित झाले आहेत. अष्टपैलू खेळाडूवर रफिक इल्साम या इसमाने हत्त्येच्या आरोपाखाली तक्रार दाखल केल्याचे वृत्त Dhaka Tribune ने दिले आहे.
बांग्लादेशमध्ये सध्या वातावरण अत्यंत दूषित झाले आहे, दिवसेंदिवस तेथील परिस्थिती देखील चिघळत चालली आहे. बांग्लादेशमध्ये सध्या आंदोलन सुरु आहे, या आंदोलनामध्ये ७ ऑगस्ट रोजी इस्लाम यांचा ७ वर्षांचा मुलगा रुबेल याचा मृत्यु झाला. अदाबोर येथील रिंग रोडवर निघालेल्या रॅलीमध्ये रुबेल सहभागी झाली होता आणि आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून झालेल्या गोळीबारात रुबेलचा मृत्यु झाला अशी मीडियाची माहिती आहे. या घटनेनंतर या प्रकरणात शाकिब, बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना आणि बांग्लादेश क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष नजमुल हसन यांच्यासह एकूण १५६ जणांवर त्या व्यक्तिने तक्रार दाखल केली आहे.
या घडलेल्या प्रकरणाची तक्रार ढाकाच्या अदाबोर पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. यामध्ये शाकिब अल हसन त्याचबरोबर बांग्लादेशचा अभिनेता फर्दोस अहमदचाही समावेश आहे. या दोघांचं नातं हे बांग्लादेश सरकारशी आहे, म्हणजेच हे दोघेही शाकिब आणि फर्दोस हे दोघंही आवामी लीगचे माजी खासदार आहेत. सध्या शाकिब अल हसन हा बांग्लादेश क्रिकेट संघासोबत पाकिस्तान दौऱ्यावर आहे. जिथे तो दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.