फोटो सौजन्य - बांग्लादेश क्रिकेट सोशल मीडिया
भारत विरुद्ध बांग्लादेश : भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये दुसऱ्या कसोटी मालिकेला उद्यापासून २७ सप्टेंबरपासून दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. या सामन्याचे आयोजन कानपूरमध्ये करण्यात आले आहे. भारताच्या संघाने पहिल्या कसोटी सामन्यात २८० धावांनी विजय मिळवला आहे, त्यामुळे टीम इंडियाकडे १-० अशी आघाडी आहे. आता भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्या सामन्याआधी एक मोठी बातमी समोर आली आहे. या मालिकेमध्ये खेळणाऱ्या एका खेळाडूंवर चक्क ५० लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. फक्त त्याच खेळाडूवर नसून त्याच्या आणखी सहा जणांवर हा दंड ठोठावला आहे. यामागचं कारण काय? यासंदर्भात सविस्तर वाचा.
शाकिब अल हसन या खेळाडूंवर ५० लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे, असे म्हंटले जात आहे की, शेअर मार्केटमध्ये फेरफार करुन ठराविक कंपनीच्या शेअर्सची किंमत वाढवल्याचा ठपका ठेवण्यात आला असून याच प्रकरणात हा एवढा मोठा दंड ठोठावला गेला आहे. बांग्लादेशचा अष्टपैलू शाकिब अल हसन त्याचबरोबर त्यांच्यासोबतच्या सहा व्यक्तीवर कंपनीच्या मदतीने पॅरामाऊंट इन्शोरन्स कंपनी लिमिटेडच्या शेअर्सचे दर वाढवल्याचा आरोप केला आला आहे. या प्रकरणात बांग्लादेशी चलनानुसार १.६३ कोटी आणि भारतीय रुपयानुसार ५० लाख रुपयांचा ठोठावला आहे. यासंदर्भात तीन कंपन्या असल्याचं निष्पन्न झालं आहे.
शाकिबबरोबरच अन्य तीन कंपन्या असल्याचं बांग्लादेश स्क्योरिटीज अॅण्ड एक्सचेंज कमिशनने मंगळवारी जारी केलेल्या पत्रकात म्हटलं असून अन्य सहाजणही या प्रकरणात दोषी आहेत असे स्पष्ट केलं आहे. शाकिब अल हसन हा कायमचा वादात सापडला आहे. सध्या बांग्लादेशमध्ये सुरु असलेल्या हिंदू मुस्लिम वादामध्ये सुद्धा त्याचे नाव बांग्लादेशच्या पंतप्रधानांशी जोडले जात होते त्याच्यामुळे त्याच्यावर केस देखील करण्याचं आली होती असे वृत्त समोर आले होते.
भारताविरुद्ध बांग्लादेशचा संघ
नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), खालेद अहमद, तस्किन अहमद, जाकेर अली, शाकिब अल हसन, लिटन दास (विकेटकीपर), झाकीर हसन (विकेटकीपर), नईम हसन, महमुदुल हसन जॉय, मेहिदी हसन मिराझ, मोमिनुल हक, शादमान इस्लाम, तैजुल इस्लाम, हसन महमूद, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), नाहिद राणा