फोटो सौजन्य - MCA
शरद पवार – देवेंद्र फडणवीस : भारताचा खेळाडू रोहित शर्माने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यानंतर विराट कोहलीने देखील कसोटी क्रिकेटला अलविदा केला आहे. आयपीएल सुरू झाले तेव्हा मुंबईमधील ऐतिहासिक वानखेडे मैदानावर रोहित शर्माच्या नावाचे स्टँड बनवण्यात आले आहे. आज मुंबईच्या वानखेडेवर मैदानावर या स्टॅन्डचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनाच्या वेळी रोहित शर्माच्या घरातील आई-वडील भाऊ पत्नी त्याचबरोबर रोहित शर्माची पत्नी रितिका देखील ते उपस्थित होते. रोहित शर्माच्या आई-वडिलांनी त्याच्या स्टॅन्डचे आज उद्घाटन केले. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.
आज रोहित शर्मा आणि त्याच्या भाषणामध्ये त्याच्या कुटुंबाचे आभार मानले त्याचबरोबर त्याचा आई-वडिलांचे आभार मानले. त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील भाषण केले. आजच्या भाषणामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांचे वानखेडेचा मैदानावर कौतुक केले. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांनी हा निर्णय घेतला हे खूपच अभिमानाची गोष्ट आहे. शरद पवार यांनी भारतीय क्रिकेटमध्ये त्याचबरोबर क्रिकेटच्या विकासासाठी त्यांनी खूप मोठे काम केलेलं आहे. भारतीय क्रिकेटमध्ये शरद पवार यांचा मोलाचा वाटा आहे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Mumbai | At the inauguration of four new spaces at the Wankhede stadium by the Mumbai Cricket Association (MCA), Maharashtra CM Devendra Fadnavis says, “Mumbai Cricket Association has taken an excellent decision. We are celebrating those who made us proud. The work he (Sharad… pic.twitter.com/pkjfSL2p6t
— ANI (@ANI) May 16, 2025
आजच्या या भाषणामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्या बद्दल कौतुकाचे पूल बांधले. त्याचबरोबर वानखेडेच्या मैदानावर जोरदार बॅटिंग सुरूच ठेवली होती. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष अमोल काळे यांच्या बद्दल देखील काही आठवणी देवेंद्र फडणवीस यांनी ताज्या केल्या. पुढे फडणवीस म्हणाले की शरद पवार यांचे नाव हे स्टॅन्ड ला असणं हा मुंबई क्रिकेट असोसिएशनचा योग्य निर्णय आहे.
गुजरातमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियम हे जगातील सर्वात मोठे स्टेडियम आहे. या मैदानावर म्हणजेच स्टेडियमवर एक लाखाहून अधिक प्रेक्षक सामना पाहण्यासाठी येतात. आज वानखेडेच्या मैदानावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमध्ये एक लाखाहून अधिक प्रेक्षक बसतील असे मोठे क्रिकेट स्टेडियम उभारण्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर यासंदर्भात मुंबई क्रिकेट असोसिएशनने प्रस्ताव दाखल करावा, या प्रस्तावाला महाराष्ट्र सरकार योग्य जागा देईल असेही त्यांनी सांगितले आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनला पुढील चार वर्षांमध्ये शंभर वर्षे पूर्ण होणार आहेत. त्यामुळे शंभर वर्षाच्या शुभ मुहूर्तावर नव्या क्रिकेट स्टेडियमचे अनावरण करण्यात यावा अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा त्यांनी बोलून दाखवली.