Shikhar Dhawan's bet for love! Buying a house worth crores for girlfriend Sophie Shine; Knowing the price will shock you!
Shikhar Dhawan-Sophie Shine : भारतीय संघाचा माजी स्टार सलामीवीर फलंदाज गेल्या काही काळापासून खूप चर्चेत येत आहे. त्याची ही चर्चा मैदानातील क्रिकेटमुळे नसून प्रमाच्या मैदानातील आहे. पहिल्या पत्नीशी घटस्फोट झाल्यानंतर शिखर धवन एकाकी जीवन जगत असल्याचे दिसून आला होता. त्यानंतर त्याचे नाव सोफी शाइनसोबत जोडल्या गेले. आता मात्र हे प्रेम गंभीर असल्याचे समोर आले आहे. त्याने आता आपली गर्लफ्रेंडसाठी एका आलीशान घराची खरेदी केली आहे.
शिखर आणि सोफीच्या नात्याबद्दल शक्यता वर्तवण्यात येत होते. त्यानंतर, अलीकडेच त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर एक पोस्ट करून सोफी शाइनसोबतच्या त्याच्या नात्याची कबुली दिली होती. या पोस्टमध्ये त्याने सोफीला त्याचे प्रेम म्हणून वर्णन केले होते.
आता शिखर धवनने एक काळ भारतीय क्रिकेटचे मैदान गाजवले आहे. तो आता प्रेमाचे मैदान गाजवत असल्याचे दिसत आहे. त्याने नवीन प्रेयसीसाठी करोडो रुपयांचे आलिशान घर खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शिखरने दिल्लीजवळील गुरुग्राममधील गोल्फ कोर्स रोडवर असलेल्या डीएलएफच्या सुपर लक्झरी हाऊसिंग प्रोजेक्टमध्ये ‘द डहलियास’ नावाचा एक अपार्टमेंट खरेदी केले आहे.
शिखर धवनकडून फेब्रुवारी महिन्यात रिअल इस्टेट अॅनालिटिक्स फर्म सीआरई मॅट्रिक्ससोबत एक करार करण्यात आले होते. फर्मच्या मते, हे अपार्टमेंट ६०४० चौरस फूट जागेत व्यापले आहे. या अपार्टमेंटची किंमत ६५.६१ कोटी रुपये असल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतर धवनने या घरासाठी ३.२८ कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी म्हणून देखील भरले आहे. त्यानंतर शिखर धवनला या अपार्टमेंटसाठी एकूण ६९ कोटी रुपये भरावे लागले आहे. गेल्या वर्षी, गुरुग्राममधील डीएलएफ फेज-५ मध्ये १७ एकरच्या सुपर लक्झरी गृहनिर्माण प्रकल्पामध्ये ‘द जाहलियाझ’ लाँच केले होते. या प्रकल्पात एकूण ४२० अपार्टमेंट आणि पेंटहाऊस समाविष्ट आहेत.
यावर्षी दुबईमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान शिखर धवन आणि त्याची मैत्रीण सोफी शाइन दिसून आले होते. त्यानंतर चाहत्यांनी दोघांबद्दल वेगवेगळे तर्क-वितर्क लावण्यास सुरवात केली होती. नंतर दोघे सुद्धा अनेक वेळा एकत्र दिसून आले होते. त्यानंतर या वर्षी मे महिन्यात शिखर धवनने संपूर्ण जगासमोर आपले प्रेम व्यक्त केले.