वैभव सूर्यवंशी(फोटो-सोशल मीडिया)
IND Vs ENG : आयपीएल झाल्यानंतर भारत इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत शुभमन गिल, जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत अशी दिग्गज खेळाडू खेळताना दिसणार असल्याची शक्यता आहे. पण, दरम्यान, वैभव सूर्यवंशीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. सूर्यवंशी देखील इंग्लंड दौऱ्यावर जाणार अस्लयची माहिती मिळत आहे. बीसीसीआयच्या ज्युनियर निवड समितीने टीम इंडियाच्या अंडर-१९ संघ जाहीर केला आहे. यामध्ये १६ सदस्यांचा समावेश आहे. त्यामध्ये एक नाव हे वैभव सूर्यवंशी याचे देखील आहे.
बीसीसीआयच्या ज्युनियर निवड समितीने टीम इंडियाच्या अंडर-१९ संघ जाहीर केला आहे. भारताच्या १९ वर्षांखालील १६ सदस्यीय संघाची धुरा मुंबईकर आयुष म्हात्रे यांच्याकडे आहे. आयुष सद्या आयपीएलमध्ये चेन्नई सुरप किंग संघाकडून खेळत आहे. वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे दोघेही आयपीएल २०२५ मध्ये शानदार खेळ करत आहेत. आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर, वैभव आता इंग्लंडमध्ये भारतासाठी अंडर १९ क्रिकेट जिंकण्यावर लक्ष केंद्रित करत असल्याचे वैभव सूर्यवंशीने सांगितले आहे.
आयपीएल २०२५ मध्ये राजस्थान रॉयल्सचे आव्हान संपले आहे. त्यांनंतर वैभव सूर्यवंशीने राहुल द्रविडशी संवाद साधला, ज्याचा व्हिडिओ सद्या व्हायरल होत आहे. त्याच संभाषणादरम्यान, वैभव सूर्यवंशीने द्रविडला त्याच्या भविष्यातील योजनांबद्दल माहिती दिली. तो म्हणाला की आता त्याला भारताच्या १९ वर्षांखालील संघाच्या शिबिरात सामील व्हावे लागणारा आहे.
१९ वर्षांखालील संघाची मालिका २४ जूनपासून सुरू होणार असून २३ जुलैपर्यंत चालणार आहे. या काळात, इंग्लंडच्या १९ वर्षांखालील संघासोबत ५० षटकांचा सराव सामना खेळण्याव्यतिरिक्त, भारताचा १९ वर्षांखालील संघ ५ एकदिवसीय आणि २ बहु-दिवसीय सामन्यांची मालिका देखील खेळणार आहे.
दौऱ्याच्या वेळापत्रकानुसार, २४ जून रोजी ५० षटकांचा सराव सामना खेळणार आहे. तसेच २७ जून ते ७ जुलै दरम्यान ५ एकदिवसीय सामने खेळले जाणार आहेत. पहिला बहुदिवसीय सामना १२ ते १५ जुलै दरम्यान असणार आहे, तर दुसरा बहुदिवसीय सामना २० ते २३ जुलै दरम्यान खेळवणार आहे.
आयुष म्हात्रे (कर्णधार), विहान मल्होत्रा, वैभव सूर्यवंशी, राहुल कुमार, अभिज्ञान कुंडू (उपकर्णधार, यष्टिरक्षक), एम. चावडा, हरवंश सिंग (यष्टीरक्षक), आर.एस. अम्ब्रिस, खिलन पटेल, हेनिल पटेल, कनिष्क चौहान, युधजीत गुहा, मोहम्मद रावजीत गुहा, प्रणित राव, ॲड.