इंग्लंड कसोटी संघ(फोटो-सोशल मीडिया)
England Test Squad Announcement : आयपीएल २०२५ नंतर भारत इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. इंग्लंडसोबत भारत ५ कसोटींची मालिका खेळणार आहे. त्या पार्श्वभूमीवर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने इंडिया अ विरुद्धच्या दोन अनधिकृत कसोटी सामन्यांसाठी इंग्लंड लायन्स संघाची घोषणा करण्यात आली आहे. इंग्लंड क्रिकेटने इंडिया अ विरुद्धच्या सामन्यासाठी १४ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. भारताविरुद्धच्या कर्णधारपदाची धुरा सोमरसेटच्या जेम्स रेव्हच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.
या इंग्लंड संघात काही वरिष्ठ खेळाडूंचा देखील समावेश करण्यात आला आहे. या संघात ख्रिस वोक्सचे पुनरागमन झाले आहे. वोक्सला घोट्याला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला परत येण्यास फार काळ झाला आहे. यासोबतच या संघात दोन भावांना देखील स्थान मिळाले आहे. रेहान अहमदसोबत फरहान अहमदलाही या संघात संधी दिली गेली आहे.दोन भावांना एकत्र संघात स्थान मिळण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे.
रेहानला केवळ पहिल्या सामन्यासाठी संघात स्थान देण्यात आले आहे. त्यानंतर तो वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी इंग्लंड संघात सामील होणार आहे. या अनधिकृत कसोटी मालिकेसाठी अँड्र्यू फ्लिंटॉफचा मुलगा रॉकी फ्लिंटॉफचाही समावेश केला गेला आहे.
१७ वर्षीय रॉकी फ्लिंटॉफने जानेवारी २०२५ मध्ये ब्रिस्बेन येथे क्रिकेट ऑस्ट्रेलिया इलेव्हन विरुद्ध शतक लगावले होते. रॉकीने पाच प्रथम श्रेणी सामने आणि सात लिस्ट-ए सामने देखील खेळलेले आहेत. पहिला सामना शुक्रवार ३० मे पासून स्पिटफायर ग्राउंड, सेंट लॉरेन्स, कॅन्टरबरी येथे खेळला जाणार आहे. तर दुसरा सामना हा शुक्रवार ६ जून पासून काउंटी ग्राउंड, नॉर्थम्प्टन येथे खेळला जाणार आहे.
जेम्स र्यू (सोमरसेट – कर्णधार), रेहान अहमद (लीसेस्टरशायर), फरहान अहमद (नॉटिंगहॅमशायर), सोनी बेकर (हॅम्पशायर), जॉर्डन कॉक्स (एसेक्स), रॉकी फ्लिंटॉफ (लँकेशायर), एमिलियो गे (डरहॅम), टॉम हेन्स (ससेक्स), जॉर्ज हिल (यॉर्कशायर), जोश हल (लीसेस्टरशायर), एडी जॅक (हॅम्पशायर), बेन मॅककिनी (डरहॅम), डॅन मौसले (वारविकशायर), अजित सिंग डेल (ग्लूस्टरशायर), ख्रिस वोक्स (वारविकशायर)
हेही वाचा : LSG vs GT : गुजरात टायटन्सची नजर आता टॉप २ वर, तर लखनौ आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी उतरणार मैदानात…
३० मे २०२५ (शुक्रवार) – भारत अ विरुद्ध ४ दिवसांचा सामना – कँटरबरी
६ जून २०२५ (शुक्रवार) – भारत अ विरुद्ध भारत ४ दिवसांचा सामना – नॉर्थम्प्टन