
Safe to play in India...! ICC's ultimatum against Bangladesh cricket board revealed
BCB’s commentary on playing in India : बांगलादेश संघाला आता आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ साठी त्यांचे सर्व सामने भारतात खेळावे लागणार आहेत. बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडून सांगण्यात आले आहे की, बांगलादेश क्रिकेट संघाने भारतात टी२० विश्वचषक सामने न खेळण्याची आणि सुरक्षेच्या कारणास्तव सामने श्रीलंकेत हलवण्याची विनंती करण्यात आली होती, त्याला आयसीसीकडून प्रतिसाद देण्यात आला आहे. बोर्डाने असे देखील म्हटले आहे की, ७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या टी२० विश्वचषकात बांगलादेशचा सहभाग कोणत्याही व्यत्ययाशिवाय सुनिश्चित करेल आणि त्याला पूर्ण पाठिंबा देणार आहे.
बांगलादेश क्रिकेट बोर्डाने सांगितले आहे की, आवश्यक समस्या सोडवायच्या असतील आणि सुरक्षा व्यवस्थेचा भाग म्हणून त्यांच्या सूचनांचा विचार करण्यासाठी आयसीसीने बीसीबीसोबत जवळून काम करण्यास सहमती दर्शवलेली आहे. बीसीबीने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, “२०२६ च्या आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतात होणाऱ्या बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या सुरक्षेबाबत बोर्डाच्या चिंतांबद्दल आयसीसीने बांगलादेश क्रिकेट बोर्डाला उत्तर दिले आहे. ज्यामध्ये संघाचे सामने स्थलांतरित करण्याची विनंती देखील समाविष्ट करण्यात आली आहे.”
आयसीसीकडून विश्वचषक स्पर्धेत बांगलादेश संघाचा पूर्ण आणि अखंड सहभाग सुनिश्चित करण्यासाठी आपली वचनबद्धता पुन्हा एकदा व्यक्त करण्यात आली आहे. उपस्थित केलेल्या चिंता दूर करण्यासाठी बीसीबीसोबत जवळून काम करण्याची तयारी आयसीसीने व्यक्त करून आश्वासन दिले आहे की बोर्डाच्या सूचनांचे स्वागत करण्यात येईल आणि कार्यक्रमासाठी सविस्तर सुरक्षा योजनेत विचार देखील करण्यात येईल.”
आयसीसीने बीसीबीला दिलेल्या अल्टिमेटमच्या वृत्तांना बोर्डानकडून निराधार ठरवण्यात आले आहे. बीसीबीने म्हटले आहे की, “२०२६ च्या टी२० विश्वचषकात संघाचा सुरळीत आणि यशस्वी सहभाग सुनिश्चित करण्यासाठी बोर्ड आयसीसी आणि संबंधित आयोजकांशी व्यावसायिकरित्या संवाद साधत राहणार आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्ड बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या सुरक्षिततेसाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे.”
हेही वाचा : जखमी उपकर्णधाराची डरकाळी! श्रेयस अय्यरने केली 82 धावांची खेळी; मुंबई संघाचा 7 धावांनी विजयी
विश्वचषकासाठी बांगलादेश क्रिकेट संघाला वेस्ट इंडिज, इटली, इंग्लंड आणि नेपाळसह गट क मध्ये ठेवण्यात आले आहे. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार, बांगलादेश त्यांचे पहिले तीन गट टप्प्यातील सामने ७ फेब्रुवारी रोजी वेस्ट इंडिज, ९ फेब्रुवारी रोजी इटली आणि १४ फेब्रुवारी रोजी इंग्लंड विरुद्ध कोलकाता येथे खेळवण्यात येणार आहेत. चौथा आणि शेवटचा सामना १७ फेब्रुवारी रोजी नेपाळविरुद्ध मुंबईमध्ये खेळला जाणार आहे.