Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shivaji Park Gymkhana देणार महिला क्रिकेटला नवी दिशा; १५ वर्षांवरील खेळाडूंसाठी निवड चाचणी

Shivaji Park Gymkhana : दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्यात 15 वर्षांवरील महिला क्रिकेटपटूंसाठी 5 आणि 6 नोव्हेंबरला निवड चाचणी होणार आहे. निवड झालेल्या खेळाडूंना मोफत प्रशिक्षण, शिष्यवृत्ती आणि ए डिव्हिजन क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Nov 02, 2026 | 09:33 PM
Shivaji Park Gymkhana देणार महिला क्रिकेटला नवी दिशा; १५ वर्षांवरील खेळाडूंसाठी निवड चाचणी

Shivaji Park Gymkhana देणार महिला क्रिकेटला नवी दिशा; १५ वर्षांवरील खेळाडूंसाठी निवड चाचणी

Follow Us
Follow Us:
  • खेळाडूंना मोफत प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती
  • ए डिव्हिजन क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी
  • एमसीएच्या कार्यक्षेत्रातील महिलांच पात्र
 

महिला क्रिकेटमधील नवोदित आणि गुणवंत खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळणार आहे. दादर येथील ऐतिहासिक शिवाजी पार्क जिमखाना (SPG) (Shivaji Park Gymkhana) तर्फे 15 वर्षांवरील महिलांसाठी विशेष क्रिकेट निवड चाचणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ही निवड चाचणी 5 आणि 6 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 7.30 वाजता शिवाजी पार्क जिमखान्याच्या मैदानावर होणार आहे.

शिवाजी पार्क जिमखान्याने भारतीय क्रिकेटला अनेक दिग्गज पुरुष क्रिकेटपटू दिले आहेत. या गौरवशाली परंपरेला पुढे नेत महिला क्रिकेटला नवी दिशा देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या माध्यमातून गुणवंत, होतकरू आणि प्रतिभावान महिला क्रिकेटपटूंचा शोध घेऊन त्यांना दर्जेदार प्रशिक्षण आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे.

खेळाडूंना मोफत प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती

या निवड चाचणीतून निवड झालेल्या खेळाडूंना आगामी क्रिकेट हंगामासाठी शिष्यवृत्ती तसेच मोफत आणि दर्जेदार क्रिकेट प्रशिक्षण दिले जाणार आहे. हा प्रशिक्षण हंगाम 16 नोव्हेंबर 2026 पासून सुरू होणार आहे. त्यामुळे महिला क्रिकेटपटूंना आपले कौशल्य विकसित करण्यासाठी आणि स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुढे जाण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.

Kho-Kho Championship : महाराष्ट्राच्या सुवर्णपदकासाठी खो-खोपटूंचे रणशिंग! मुलींचा धाराशिवमध्ये, तर कुमार संघाचा सांगलीत सराव

‘ए’ डिव्हिजन क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी

निवड झालेल्या आणि नियमानुसार पात्र असलेल्या खेळाडूंना शिवाजी पार्क जिमखान्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. त्यांना ए डिव्हिजन क्रिकेट सामन्यांमध्ये खेळता येईल. तसेच मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) लागू असलेल्या पात्रता निकष आणि नियमांनुसार पात्र खेळाडूंना MCA च्या स्पर्धांमध्येही सहभागी होता येणार आहे.

एमसीएच्या कार्यक्षेत्रातील महिलांच पात्र

या निवड चाचणीसाठी 15 वर्षांवरील महिला क्रिकेटपटू पात्र असतील. मात्र, सहभागी खेळाडूंनी मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA)च्या कार्यक्षेत्रात वास्तव्यास असणे आवश्यक आहे. निवड चाचणीसाठी येणाऱ्या खेळाडूंनी पांढरा क्रिकेट गणवेश परिधान करणे बंधनकारक आहे. तसेच वयाच्या पुराव्यासाठी जन्म दाखला किंवा आधार कार्डाची छायांकित प्रत सोबत आणावी लागणार आहे.

Badminton कोर्टवर चुरशीच्या लढती; मुलांमध्ये रायगड, तर मुलींमध्ये…; सेमीफायनलमध्ये कोणाचा प्रवेश?

 

महिला क्रिकेटमधील उदयोन्मुख प्रतिभा शोधणे, त्यांना योग्य प्रशिक्षण देणे आणि उच्चस्तरीय स्पर्धात्मक क्रिकेटसाठी तयार करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे शिवाजी पार्क जिमखान्याच्या वतीने सांगण्यात आले आहे.

क्रिकेट निवड चाचणीचे वेळापत्रक

निवड चाचणी : 15 वर्षांवरील महिला

5 आणि 6 नोव्हेंबर 2026

वेळ : सकाळी 7.30 वाजता

स्थळ : शिवाजी पार्क जिमखाना (SPG), दादर, मुंबई

पात्रता : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्यक्षेत्रातील 15 वर्षांवरील महिला

सोबत आणावयाची कागदपत्रे व साहित्य

– पांढरा क्रिकेट गणवेश अनिवार्य
– जन्म दाखला किंवा आधार कार्डाची छायांकित प्रत
– निवड चाचणीतून ए डिव्हिजन क्रिकेटसाठी खेळाडूंची निवड

💡

Frequently Asked Questions

  • Que: शिवाजी पार्क जिमखान्यात महिला क्रिकेट निवड चाचणी कधी होणार आहे?

    Ans: 5 आणि 6 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 7.30 वाजता निवड चाचणी होणार आहे.

  • Que: निवड झालेल्या खेळाडूंना ए डिव्हिजन क्रिकेटमध्ये खेळता येणार आहे का?

    Ans: होय. निवड झालेल्या आणि नियमानुसार पात्र असलेल्या खेळाडूंना शिवाजी पार्क जिमखान्याचे प्रतिनिधित्व करून ए डिव्हिजन क्रिकेट सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे.

  • Que: MCA स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी काय पात्रता आहे?

    Ans: मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या लागू असलेल्या पात्रता निकष आणि नियमांनुसार पात्र असलेल्या खेळाडूंना MCA च्या स्पर्धांमध्ये सहभागी होता येईल.

Web Title: Shivaji park gymkhana womens cricket selection trials mumbai rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2026 | 09:33 PM

Topics:  

  • dadar
  • Shivaji Park
  • Women Cricket

संबंधित बातम्या

Shivaji Park : ‘जब दीप जले आना’च्या सुरांनी रंगली दिवाळी संध्या; राज ठाकरे यांच्या हस्ते अशोक पत्कींचा सन्मान
1

Shivaji Park : ‘जब दीप जले आना’च्या सुरांनी रंगली दिवाळी संध्या; राज ठाकरे यांच्या हस्ते अशोक पत्कींचा सन्मान

Dadar Kabutarkhana Controversy: कबुतरखाना हवा की आरोग्याची काळजी? नागरिकांच्या संमिश्र प्रतिक्रिया
2

Dadar Kabutarkhana Controversy: कबुतरखाना हवा की आरोग्याची काळजी? नागरिकांच्या संमिश्र प्रतिक्रिया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.