Kho-Kho Championship : महाराष्ट्राच्या सुवर्णपदकासाठी खो-खोपटूंचे रणशिंग! मुलींचा धाराशिवमध्ये, तर कुमार संघाचा सांगलीत सराव
राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत (Kho-Kho Championship) महाराष्ट्राचा दबदबा कायम राखण्यासाठी राज्याच्या कुमार आणि मुलींच्या संघांनी कंबर कसली आहे. गुजरातमधील वडोदरा येथे होणाऱ्या 45 व्या कुमार-मुली राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत सुवर्णपदक पटकावण्याचे लक्ष्य ठेवून दोन्ही संघांची विशेष निवासी प्रशिक्षण शिबिरे सुरू झाली आहेत.
मुलींचा संघ धाराशिवमध्ये, तर कुमार संघ सांगली येथे सराव करत आहे. कौशल्य, वेग, तंदुरुस्ती आणि सांघिक समन्वयावर भर देत खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेसाठी सज्ज होत आहेत.
महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाचे प्रशिक्षण शिबिर 1 नोव्हेंबरपासून धाराशिव येथे सुरू झाले. धाराशिव नगरपालिकेच्या अध्यक्षा नेहाताई काकडे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नगरसेवक राहुल काकडे, नगरसेविका राजकन्या अडसूळ, महाराष्ट्र खो-खो संघटनेचे सरचिटणीस डॉ. चंद्रजीत जाधव, प्रशिक्षण विभागप्रमुख राजेंद्र साप्ते आणि अथर्व तापडिया उपस्थित होते.
शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त रोहिणी आवारे आणि शिवछत्रपती राज्य क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारप्राप्त प्रवीण बागल यांनी खेळाडूंशी संवाद साधला. राष्ट्रीय स्पर्धेतील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आत्मविश्वास, जिद्द आणि सातत्यपूर्ण मेहनत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाला स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
मुलींच्या संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून अभिजीत पाटील, तर सहाय्यक प्रशिक्षिका म्हणून समृद्धी पाटील जबाबदारी सांभाळणार आहेत. खेळाडूंची शारीरिक क्षमता, वेग, चपळाई, बचाव आणि आक्रमणातील अचूकता यावर प्रशिक्षण शिबिरात विशेष भर दिला जाणार आहे. यावेळी प्रभाकर काळे, विवेक कापसे यांच्यासह क्रीडाप्रेमी आणि पदाधिकारी उपस्थित होते.
Badminton कोर्टवर चुरशीच्या लढती; मुलांमध्ये रायगड, तर मुलींमध्ये…; सेमीफायनलमध्ये कोणाचा प्रवेश?
दुसरीकडे, महाराष्ट्राच्या कुमार संघाचे प्रशिक्षण शिबिर सांगली येथे सुरू झाले आहे. सांगलीचे जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी महाराष्ट्र खो-खो संघटनेच्या कोचिंग विंगचे गुरुदत्त चव्हाण, डॉ. अमित राव्हटे, प्रा. सचिन चव्हाण, तुकाराम माळी आणि अमोल देवकते उपस्थित होते. त्यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्राच्या कुमार संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून पंढरीनाथ बडगुजर काम पाहणार आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंच्या खेळातील सातत्य, आक्रमणातील वेग, बचावातील चपळाई, निर्णयक्षमता आणि सांघिक समन्वय यावर भर दिला जाणार आहे. राष्ट्रीय स्तरावरील प्रतिस्पर्ध्यांना आव्हान देण्यासाठी खेळाडूंना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम करण्याचे उद्दिष्ट प्रशिक्षण शिबिरातून ठेवण्यात आले आहे.
गुजरातमधील वडोदरा येथे 21 ते 25 नोव्हेंबर 2026 या कालावधीत 45 वी कुमार-मुली राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेच्या तयारीसाठी 1 ते 19 नोव्हेंबरदरम्यान दोन्ही संघांची विशेष निवासी प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत.
Ans: महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाचे निवासी प्रशिक्षण शिबिर धाराशिव येथे सुरू झाले आहे.
Ans: कुमार संघाचे प्रशिक्षण शिबिर सांगली येथे आयोजित करण्यात आले आहे.
Ans: राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करून सुवर्णपदक पटकावणे हे महाराष्ट्राच्या कुमार आणि मुलींच्या संघांचे प्रमुख लक्ष्य आहे.






