
photo- social media
महिला टी-२० विश्वचषक २०२६ च्या टेक्निकल कमिटीने श्रेयंका पाटीलच्या जागी प्रेमा रावतला भारतीय संघात स्थान देण्यास मंजुरी दिली आहे. २४ वर्षीय प्रेमा रावत सध्या इंडिया ‘अ’ संघाच्या इंग्लंड दौऱ्याचा भाग होती. आता तिचा थेट भारतीय महिला टी-२० विश्वचषक संघात समावेश करण्यात आला आहे.
🚨 News 🚨 Prema Rawat replaces the injured Shreyanka Patil in #TeamIndia‘s squad at ICC Women’s T20 World Cup 2026. Following Prema’s inclusion in the squad, Niki Prasad has been added to the India A T20 squad and Minnu Mani has been added to the India A One-Day squad. More… — BCCI Women (@BCCIWomen) June 19, 2026
प्रेमाने अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले नसले तरी, तिने अलीकडच्या काळात आपल्या उत्कृष्ट कामगिरीने निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. महिला प्रीमियर लीग (WPL) व्यतिरिक्त, तिने महिला आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेतही शानदार गोलंदाजी केली होती. या स्पर्धेत तिने इंडिया ‘अ’ संघासाठी ९.६२ च्या सरासरीने आठ विकेट्स घेतले होते.
प्रेमा रावतने गेल्या दोन हंगामात महिला प्रीमियर लीग (WPL) मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसाठी सहा सामने खेळून तीन विकेट्स घेतले. देशांतर्गत क्रिकेटमधील तिची कामगिरीही प्रभावी राहिली आहे. वरिष्ठ महिला देशांतर्गत चॅम्पियनशिपमध्ये उत्तराखंडच्या विजयात तिने महत्त्वाची भूमिका बजावली. गोलंदाजी व्यतिरिक्त, तिच्यामध्ये फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणानेही योगदान देण्याची क्षमता आहे.
श्रेयंका पाटील यावर्षी दुखापतीपतून सावलरल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले होते. टी-२० विश्वचषकात पाकिस्तानविरुद्धच्या भारताच्या विजयातही तिचा समावेश होता. त्या सामन्यात, ती तीन षटकांत १७ धावा दिल्या. तिच्या अनुपस्थितीमुळे भारतीय संघाच्या फिरकी गोलंदाजीला मोठा धक्का बसला आहे, तर दुसरीकडे युवा प्रेमा रावतला मोठ्या मंचावर स्वतःला सिद्ध करण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे.
भारताला पुढील सामना २१ जून रोजी ओल्ड ट्रॅफर्ड येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. उपांत्य फेरीच्या शर्यतीच्या दृष्टीने हा सामना अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
TG20 लीगवर मोठा वाद; विजय देवरकोंडा, सिराज आणि तिलक वर्माला कायदेशीर नोटीस