
shreyas iyer health update: 'I will be back on the field soon...' Shreyas Iyer himself gave information about his health
shreyas iyer health update : भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार श्रेयस अय्यरच्या आरोग्याबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे. श्रेयस अय्यरच्या चाहत्यांच्या चिंता आता कमी झाल्या आहेत. ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या अय्यरने सोशल मीडियाद्वारे त्याच्या आरोग्याबाबतची मोठी माहीती शेअर केली आहे. त्याने सांगितले की त्याच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली असून आणि डॉक्टरांच्या देखरेखीखाली तो वेगाने बरा होत आहे.
हेही वाचा : IND W vs AUS W Semi Final Live : ऑस्ट्रेलियाचा TOSS जिंकून फलंदाजीचा निर्णय; भारतीय गोलंदाजांची अग्निपरीक्षा
ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान श्रेयस अय्यरला ऑस्ट्रेलियाच्या डावावेळी दुखापत झाली होती. क्षेत्ररक्षण करताना त्याच्या पोटाच्या वरच्या भागात वेदना जाणवू लागल्या होत्या. त्यानंतर त्याला ताबडतोब मैदानाबाहेर नेण्यात आले. तपासणीत अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याचे उघड झाले आणि खबरदारी म्हणून त्याला आयसीयूमध्ये दाखल केले गेले आहे. या बातमीनंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांसह संपूर्ण क्रीडा जगत चिंतेत पडले होत. मात्र आता श्रेयसने दिलेल्या माहितीन ती चिंता आता थोडी कमी झाली आहे.
चाहत्यांसाठी आनंददायी बातमी आहे. अय्यरने स्वतः त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर त्याच्या प्रकृतीबद्दल अपडेट दिली आहे.त्याने लिहिले की, “तुमच्या सर्व प्रेम आणि शुभेच्छांसाठी धन्यवाद. मला आता बरे वाटत आहे आणि डॉक्टरांच्या देखरेखीखाली मी बरा होत असून मी लवकरच मैदानावर परत येणार.” बीसीसीआयकडून अय्यरच्या प्रकृतीबद्दल एक अपडेट देखील जारी करण्यात आली आहे, ज्यामध्ये म्हटले आहे की डॉक्टरांची टीम त्याच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून आहे आणि तो वेगाने बरा देखील होत आहे.
बीसीसीआयच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, त्याला पुढील काही दिवसांत रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाणार. टीम इंडियाचा कर्णधार आणि संघातील खेळाडूंनीही सोशल मीडियाद्वारे अय्यरला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत. विराट कोहलीने एक्सवर लिहिले की, “खंबीर राहा श्रेयस, संपूर्ण संघ तुझी वाट पाहत आहे.”
एक गोष्ट लक्षात घेण्यासारकही आहे की, श्रेयस अय्यर हा भारतासाठी मधल्या फळीतील एक महत्त्वाचा फलंदाज आहे आणि आगामी इंग्लंड मालिकेसाठी त्याची तंदुरुस्ती संघासाठी खूपच महत्त्वाची आहे. गेल्या काही महिन्यांपासून तो चांगलाच लयीत आहे. हे त्याने त्याच्या कामगिरीने दाखवून दिले आहे. रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अय्यरची प्रकृती आता स्थिर असून त्याला सामान्य कक्षात हलवले आहे.