दक्षिण आफ्रिकेची अंतिम फेरीत दिमाखात एंट्री(फोटो-सोशल मीडिया)
ENG W vs SA W Semifinal Match : गुवाहाटी येथील बारसापारा स्टेडियमवर महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ च्या पहिल्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने इंग्लंडचा १२५ धावांनी पराभव केला. या विजयासह दक्षिण आफ्रिका संघ महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचला आहे. समान्याआधी इंग्लंड संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर दक्षिण आफ्रिका महिला संघाने कर्णधार लॉरा वोल्वार्डने १४३ चेंडूत १६९ धावांच्या शानदार खेळीच्या जोरावर इंग्लंडविरुद्ध सात बाद ३१९ धावांचा डोंगर उभारला. प्रतिऊतरात इंग्लंड संघ ४२.३ ओव्हरमध्ये सर्वबाद १९४ धावाच करू शकला. परिणामी दक्षिण आफ्रिकेने 125 धावांनी विजय मिळवला.
हेही वाचा : ‘या’ माजी क्रिकेटपटूच्या नव्या इनिंगला सुरुवात! माजी कर्णधार घेणार तेलंगण राज्याच्या मंत्रीपदाची शपथ
प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने आपल्या डावाची शानदार सुरवात केली. लॉरा वोल्वार्ड आणि तझमिन ब्रिट्स या सलामीवीर जोडीने पहिल्या विकेट्ससाठी ११६ भागीदारी रचली. तझमिन ब्रिट्स ४५ धावा करून बाद झाली. त्यानंतर लॉरा वोल्वार्डने शानदार १६९ धावांची खेळी केली. तिने १४३ चेंडूत १६९ धावा केल्या. यामध्ये तिने २० चौकार आणि ४ षटकार लगावले. तर मारिझान कॅपने ४२ धावा केल्या. तर क्लो ट्रायॉनन नाबाद ३३ धावांचे योगदान दिले. इतर खेळाडू मात्र मैदाननात टिकू शकले नाहीत. इंग्लंडकडून सोफी एक्लेस्टोनने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.
दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या ३२० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायला मैदान्त उतरणाऱ्या इंग्लंड महिला संघाची सुरुवात मात्र खूप खराब झाली. त्यांचे पहिल्या ३ विकेट्स १ धावा स्कोअरबोर्डवर असताना गेल्या. इंग्लंडकडून नॅट सायव्हर-ब्रंटने सर्वाधिक ६४ धावा केल्या. आणि ॲलिस कॅप्सीने ५० धावांचे योगदान दिले, परंतु या खेळाडू संघाला विजय मिळवून देऊ शकल्या नाही. दक्षिण आफ्रिकेकडून मारिझान कॅपने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. नादिन डी क्लर्क २, अयाबोंगा खाका, नॉनकुलुलेको म्लाबा आणि सुने लुस यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
दक्षिण आफ्रिकेने अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. आता ३० ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात दुसरा सेमीफायनल सामना होणार आहे. या सामन्यातील विजेता संघ अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भिडणार आहे.
इंग्लंड : ॲमी जोन्स (यष्टीरक्षक), टॅमी ब्युमाँट, हीदर नाइट, डॅनिएल व्याट-हॉज, नॅट सायव्हर-ब्रंट (कर्णधार), सोफिया डंकले, ॲलिस कॅप्सी, शार्लोट डीन, सोफी एक्लेस्टोन, लिन्से स्मिथ, लॉरेन बेल.
हेही वाचा : ‘मला आधीच खलनायक बनवल…’ मोहम्मद शमीची BCCI सोबत टक्कर;पुनरागमनाबद्दलच्या विधानाने खळबळ
दक्षिण आफ्रिका: लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), तझमिन ब्रिट्स, सुने लुस, ॲनेरी डेर्कसेन, ॲनेके बॉश, मारिझान कॅप, सिनालो जाफ्ता (यष्टीरक्षक), क्लो ट्रायॉन, नादिन डी क्लर्क, अयाबोंगा खाका, नॉनकुलुलेको म्लाबा.






