हरमनप्रीत कौर आणि एलिसा हीली(फोटो-सोशल मीडिया)
IND W vs AUS W Semi Final Live : आज महिला एकदिवसीय विश्वचषकात भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ आमनेसामने असणार आहे. हा सामना नवी मुंबई येथील डॉ. डी.वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. सामान्यायाधी ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत प्रथम गोलंदाजी करताना दिसणार आहे. दोन्ही संघासाठी हा सामना जिंकणे अपरिहार्य आहे. पहिल्या सेमीफायनल सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने इंग्लंडला पराभूत करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्यामुळे कर्णधार हरमनप्रीत कौर आपल्या संघाला फायनलचे तिकीट मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असेल तर दुसरीकडे जबरदस्त फॉर्म मध्ये असणारा बलाढ्य असुन ऑस्ट्रेलिया संघ विजयी रथ कायम ठेवत अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी उत्सुक असणार आहे.
हेही वाचा : ‘मला आधीच खलनायक बनवल…’ मोहम्मद शमीची BCCI सोबत टक्कर;पुनरागमनाबद्दलच्या विधानाने खळबळ
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत ६० एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये भारतीय संघाने ११ जिंकले आहेत आणि ४९ गमावले आहेत. भारतीय भूमीवर खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या बाबतीत, ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत खेळलेल्या २८ एकदिवसीय सामन्यांपैकी २३ सामने आपल्या नावे केले आहेत.
दक्षिण आफ्रिका २०२५ च्या महिला एकदिवसीय विश्वचषकासाठी पहिला अंतिम संघ बनला आहे. दुसरा अंतिम संघ आता नवी मुंबईत खेळल्या जाणाऱ्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्याद्वारे निश्चित होणार आहे. त्यामुळे या सामन्यात जो जिंकेल त्याला अंतिम सामन्याचे तिकीट मिळणार आहे.
आज सकाळी मुंबईत पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. तथापि, भारत-ऑस्ट्रेलिया सामना सुरू होईपर्यंत पावसाची शक्यता फक्त २०% असणार आहे. संध्याकाळी ही शक्यता आणखी कमी होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
भारत-ऑस्ट्रेलिया सेमीफायनल सामना डीवाय पाटील स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या मैदानावरील खेळपट्टी फलंदाजांसाठी चांगली मानण्यात येते. फलंदाजांना येथे मदत मिळत आली आहे. या खेळपट्टीचा फायदा फिरकीपटूंना देखील होतो. आज आपल्याला उच्च-स्कोअरिंग सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
ऑस्ट्रेलिया : फोबी लिचफिल्ड, एलिसा हीली (यष्टीरक्षक/कर्णधार), एलिस पेरी, बेथ मूनी, अॅनाबेल सदरलँड, अॅशले गार्डनर, ताहलिया मॅकग्रा, सोफी मोलिनेक्स, अलाना किंग, किम गार्थ, मेगन शट.
भारत :शफाली वर्मा, स्मृती मानधना, अमनजोत कौर, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, रिचा घोष (यष्टीरक्षक), राधा यादव, क्रांती गौर, श्री चरणी, रेणुका सिंग ठाकूर.






