Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 21 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs NZ: अवघ्या २ धावांनी शतक हुकलं अन् Shubman Gill च्या नावार नकोसा विक्रम; धोनी-विराटच्या यादीत एन्ट्री

IND vs NZ Shubman gill out on 97 Runs Unwanted Record: वेलिंग्टन कसोटीच्या पहिल्या डावात भारतीय कर्णधार शुभमन गिल ९८ धावा करून तो पॅव्हेलियनमध्ये परतला. यासोबतच गिलने एक नकोसा विक्रमही आपल्या नावावर केला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 21, 2026 | 08:02 PM
Shubman gill out on 97 Runs

Shubman gill out on 97 Runs

Follow Us
Follow Us:
  • न्यूझीलंडविरुद्ध ९८ धावांवर डाव संपला
  • शुभमन गिलची धोनी-विराटच्या यादीत एन्ट्री
  • ९८ धावांवर बाद होणारा तिसरा भारतीय कर्णधार
IND vs NZ: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वेलिंग्टनमधील बेसिन रिझर्व्ह येथे पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. भारताच्या पहिल्या डावात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या कर्णधार शुभमन गिलचे अवघ्या २ धावांनी शतक हुकले. गिल उत्कृष्ट फलंदाजी करत होता आणि तिसऱ्या दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी तो शतकापासून फक्त दोन धावा दूर होता, पण न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज जेकब डफीने त्याला क्लीन बोल्ड केले. गिल ९८ धावा करून गिल पॅव्हेलियनमध्ये परतला. यासह, गिलने आपल्या नावावर एक असा विक्रम नोंदवला आहे. त्याचे नाव आता एम.एस. धोनी आणि विराट कोहली यांच्यासोबत एका नको असलेल्या यादीत सामील झाले आहे. (Shubman Gill)

IND vs PAK: पाकिस्तानला लोळवण्यासाठी टीम इंडिया सज्ज! आयुष बडोनी OUT प्रभसिमरन IN? पाहा भारताची संभाव्य प्लेइंग ११

शुभमन गिल ९८ धावांवर बाद होणारा तिसरा भारतीय कर्णधार

न्यूझीलंडविरुद्ध वेलिंग्टन कसोटीच्या पहिल्या डावात, भारतीय कर्णधार शुभमन गिलने १४६ चेंडूंमध्ये दोन षटकार आणि नऊ चौकारांसह ९८ धावा केल्या. ९८ धावांवर बाद झाल्याने, गिलने कसोटी क्रिकेटमध्ये ९० ते ९९ धावांच्या दरम्यान बाद होणाऱ्या भारतीय कर्णधारांच्या यादीत स्थान मिळवले. या यादीत नारी कॉन्ट्रॅक्टर, मन्सूर अली खान पतौडी, कपिल देव, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड, एम.एस. धोनी आणि विराट कोहली यांसारख्या दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे.

एवढेच नाही तर, गिल कसोटी क्रिकेटमध्ये ९८ धावांवर बाद होणारा तिसरा भारतीय कर्णधार ठरला आहे. त्याच्या आधी, १९८३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध सेंट जॉन्स कसोटीत कपिल देव ९८ धावांवर बाद झाले होते. त्यानंतर २०१० मध्ये एम.एस. धोनीने न्यूझीलंडविरुद्ध नागपूर कसोटीत ९८ धावा केल्या होत्या. आता या यादीत गिलच्या नावाची भर पडली आहे. या तिन्ही भारतीय कर्णधारांचे शतक केवळ दोन धावांनी हुकले.

हे भारतीय कर्णधार ९९ धावांवर तंबूत परतले

भारतीय कर्णधारांच्या या यादीत अशा दोन नावांचाही समावेश आहे, जे केवळ एका धावेने शतक पूर्ण करण्यापासून वंचित राहिले. या यादीत पहिले नाव सौरव गांगुलीचे आहे. जो २००२ मध्ये इंग्लंडविरुद्ध नॉटिंगहॅम कसोटीत ९९ धावांवर बाद झाला. तर, या यादीत दुसरे नाव एम.एस. धोनीचे आहे. जो २०१२ मध्ये इंग्लंडविरुद्ध नागपूर कसोटीत ९९ धावांवर बाद झाला.

या बाबतीत माजी कर्णधार धोनी हा सर्वात कसोटी क्रिकेटमध्ये ९०, ९२, ९८ आणि ९९ धावांवर चार वेळा बाद झाला आहे. तसेच, सचिन तेंडुलकरचे या यादीत दोनदा नाव सामील झाले. सचिन १९९७ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ब्रिजटाऊन कसोटीत ९२ धावांवर आणि २००० मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वानखेडे कसोटीत ९७ धावांवर बाद झाला होता.तर, विराट कोहली २०१८ मध्ये इंग्लंडविरुद्ध नॉटिंगहॅम कसोटीत ९७ धावांवर बाद झाला.

IND vs NZ: ना धोनी, ना गिलख्रिस्ट Rishabh Pant ठरला बॉस! एका खेळीत मोडले दोन रेकॉर्ड्स; WTC मध्येही रचला इतिहास

Web Title: Shubman gill 98 runs unwanted record india vs new zealand 1st test pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2026 | 08:02 PM

Topics:  

  • IND vs NZ
  • India Vs New Zealand
  • M.S. Dhoni
  • Shubhman Gill
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

IND vs NZ:  ना धोनी, ना गिलख्रिस्ट Rishabh Pant  ठरला बॉस! एका खेळीत मोडले दोन रेकॉर्ड्स; WTC मध्येही रचला इतिहास
1

IND vs NZ: ना धोनी, ना गिलख्रिस्ट Rishabh Pant ठरला बॉस! एका खेळीत मोडले दोन रेकॉर्ड्स; WTC मध्येही रचला इतिहास

IND Vs NZ: भारताच्या ‘या’ 5 वाघांची परदेशात मोठी डरकाळी; किवींना फोडला घाम; वर्ल्ड रेकॉर्ड पहाच
2

IND Vs NZ: भारताच्या ‘या’ 5 वाघांची परदेशात मोठी डरकाळी; किवींना फोडला घाम; वर्ल्ड रेकॉर्ड पहाच

IND vs NZ 3rd Day Score: 2 धावांनी शुभमनचे शतक हुकले, इतिहास रचायचा राहिला; तिसऱ्या दिवसाचा खेळ समाप्त
3

IND vs NZ 3rd Day Score: 2 धावांनी शुभमनचे शतक हुकले, इतिहास रचायचा राहिला; तिसऱ्या दिवसाचा खेळ समाप्त

KL Rahul: शतक एक अन् रेकॉर्ड अनेक! न्यूझीलंडमध्ये शतक झळकवत के एल राहुलने रचला इतिहास
4

KL Rahul: शतक एक अन् रेकॉर्ड अनेक! न्यूझीलंडमध्ये शतक झळकवत के एल राहुलने रचला इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.