Shubman Gill: 'This' young woman is dating India's star cricketer Shubman Gill..; Colorful discussion on social media..
Shubman Gill : नुकतीच भारताने चॅम्पियन ट्रॉफीचे विजेतेपद जिंकले आहे. भारताने न्यूझीलंडचा 4 विकेट्सने पराभव केला आहे. या संपूर्ण स्पर्धेत आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधणारा सालामीवर शुभमन गिल सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. शुभमन गिलला एक 23 वर्षीय तरुणी डेट करत असल्याची चर्चा रंगू लागली आहे. अवनीत कौर आणि शुभमन गिल यांच्या नात्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर होऊ लागली आहे.
23 वर्षीय टीव्ही स्टार अवनीत कौरने अनेक शोमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. कौर सध्या क्रिकेटर गिलसोबतच्या जवळकीमुळे चर्चेत आली असून याआधी राघव शर्मासोबत तिचे नाव जोडले जात होते. परंतु, आता शुभमनसोबत तिचे नाव चर्चेत येऊ लागले आहे. त्यामुळे या दोघांच्या नात्याची चर्चा सगळीकडे होताना दिसून येत आहे.
नुकतीच चॅम्पियीन ट्रॉफी स्पर्धा पार पडली. या स्पर्धेतील भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यात अवनीतच्या उपस्थितीने चर्चांना अधिकच उधाण आले होते. यादरम्यान, काही लोकांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली होती. या दोघांमध्ये नेमके काय चालले आहे? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही आणि मीडियाही त्यांच्याकडे लक्ष ठेवून आहे.
भारताच्या विजयानंतर अवनीत कौरकडून सोशल मीडियावर काही फोटो शेअर करण्यात आले होते. ज्यामध्ये ती क्रिकेटच्या मैदानाचा आनंद लुटत असताना दिसत आहे. मात्र, तिच्या चाहत्यांकडून शुभमन गिलला ‘जीजू’ म्हणत चिडवायला सुरुवात झालीय आहे. या प्रसंगी अवनीतने निळ्या रंगाच्या क्रॉप टॉप आणि बेज जीन्समध्ये स्टायलिश लूकमध्ये दिसून आली.
अवनीत कौरने भारताच्या विजयावर प्रतिक्रिया दिली होती, तसेच सोशल मीडियावर तिच्या व्हिडिओमुळे चाहत्यांमध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. काही लोक तिच्या उत्साहाचे कौतुक करत आहेत. तर अनेक यूजर्स तिला ट्रोल करत असल्याचे दिसत आहेत. विशेषत: शुभमन गिलसोबतच्या तिच्या नात्याच्या चर्चेने सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडाली असल्याचे दिसून येत आहे.
भारतीय संघाने न्यूझीलंडचा 4 विकेटने पराभव करून 12 वर्षांतर आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी 2025 चे विजेतेपद आपल्या नावावर केले आहे. भारताने 9 महिन्यांत सलग दुसऱ्यांदा ICC ट्रॉफी जिंकली आहे. भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धचा अंतिम सामना जिंकून ट्रॉफी आपल्या नावे केली. या संपूर्ण स्पर्धेत भारत अजिंक्य राहीला असून त्याने या स्पर्धेत एकही सामना गमावला नाही. शेवटच्या सामन्यात भारताने सर्वोच्च कामगिरी करत विजयी ट्रॉफी उंचावली आहे. तर न्यूझीलंडला उपविजेतपदावर समाधान मानावे लागले.