Manish Pandey : युझवेंद्र चहलनंतर आता 'हा' क्रिकेटर घेणार संसारात काडीमोड; इंस्टाग्रामवरही केलं एकमेकांना अनफॉलो अन् ..(फोटो-सोशल मीडिया)
Manish Pandey-Ashrita Shetty : भारतीय क्रिकेटपटूंच्या खाजगी आयुष्याबाबत रोज काही नवीन घडताना दिसून येत आहे. कुणा ना कुणाच्या आयुष्यात काही तरी उलथापालथ घडून आल्याचे समोर येत आहे. माहिती समोर येऊल लागली आहे.. टीम इंडियाचा स्टार खेळाडू हार्दिक पांड्याचा घटस्फोट झाला. तसेच अलीकडे भारताचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी डान्सर धनश्री वर्मा यांच्यातील घटस्फोटाच्या बातम्या चर्चेचा विषय बनला आहे. अशातच आता अशीच एक बातमी समोर आली आहे. भारताचा क्रिकेटपटू मनीष पांडे आणि त्यांची पत्नी आश्रिता शेट्टी या दोघांमध्ये सर्वकाही ठीक नसल्याचे बोलले जात आहे. या दोघांनी डिसेंबर 2019 मध्ये लग्न केले होते. मिळालेल्या माहितीनुसार, दोघांनीही सोशल मीडिया अकाउंटवर एकमेकांना अनफॉलो केले आहे.
इंडिया डॉट कॉमच्या अलिकडच्या माहितीनुसार हे म्हटले आहे की, मनीष पांडे आणि त्यांची पत्नी आश्रिता त्यांच्या नात्यात सारं काही नीट नाहीये. मनीष पांडे आणि आश्रिता शेट्टी या दोघांनीही मोठा गाजावाजा करत धूमधडाक्यात लग्न केले होते. मात्र, आता ते एकमेकांपासून वेगळे होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मनीष भारतीय क्रिकेटपटू आहे. तो कोलकाता नाईट रायडर्ससोबत आयपीएलमध्ये इतर अनेक फ्रँचायझी संघांकडून खेळला आहे. तसेच त्याने भारतीय संघाकडून 2018 मध्ये आशिया कप देखील खेळला आहे.
समोर आलेल्या बातमीनुसार, मनीष आणि आश्रिता ही दोघे कुणा सामाजिक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांचे सार्वजनिक ठिकाणी सोबत दिसणे कमी झाले आहे. तसेच दोघांनीही एकमेकांना इंस्टाग्रामवर अनफॉलो केले असल्याची माहिती मिळत आहे.
इंस्टाग्राम प्रोफाइलकडे पाहिल्यावर आश्रिता शेट्टी ही एक अभिनेत्री असल्याचे समजते. तसेच तिला डोंगर-दऱ्यांत फिरायला आवडते. आश्रिता तिच्या आयुष्याचा पुरेपूर आनंद घेत असते. मनीष आणि आश्रिताने त्यांच्या लग्नाचे फोटो देखील डिलीट केले असल्याची माहिती मिळत आहे. दोघांनीही घटस्फोटाच्या बातमीवर दुजोरा अथवा कोणताही नकार दिलेला नाही.
हेही वाचा : IPL 2025 : दिल्ली कॅपिटल्सचे अखेर ठरले! KL Rahul नाही, तर ‘या’ बड्या खेळाडूकडे सोपवली संघाची धुरा!
आश्रिताने शेट्टीने बहुतेक तमिळ चित्रपटांमध्ये काम केले आहे. आश्रिताचे इंस्टाग्रामवर तब्बल 2,18,000 फॉलोअर्स आहेत. तर मनीष पांडे गेल्या काही वर्षांपासून क्रिकेट खेळलेला नाही. त्याने भारताकडून 29 एकदिवसीय आणि 39 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. मनीषसोबत लग्न केल्यानंतर अभिनेत्री आश्रिता शेट्टी चित्रपटांपासून दूर गेली आहे.