Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

SL vs AUS : ऑस्ट्रेलिया-श्रीलंका दुसऱ्या कसोटी सामन्यात हाईवोल्टेज ड्रामा, सोशल मीडियावर Video Viral

श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा कसोटी सामन्यादरम्यान, असे काही घडले की सर्वांनाच धक्का बसला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Feb 07, 2025 | 12:11 PM
फोटो सौजन्य - 7Cricket सोशल मीडिया

फोटो सौजन्य - 7Cricket सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा कसोटी सामना : श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सध्या मालिकेचा दुसरा कसोटी सामना सुरु आहे. यामध्ये पहिल्या इनिंगची श्रीलंकेची फलंदाजी झाली आहे. या सामन्यादरम्यान क्रिकेटच्या मैदानावर एक हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू आहे. या कसोटी सामन्यादरम्यान, असे काही घडले की सर्वांनाच धक्का बसला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

मॅथ्यू कुहनेमन हा सामन्यात गोलंदाजी करत होता. गोलंदाजी केल्यानंतर, गोलंदाजाने अचानक नॉन-स्ट्रायकर एंडवर उभ्या असलेल्या फलंदाजाला मारले. टक्कर इतकी जोरदार होती की फलंदाज काही वेळ जमिनीवर पडून राहिला. ही घटना सामन्यादरम्यान घडली या झालेल्या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

India vs England : कन्कशन सब्स्टीट्यूट वादावर हर्षित राणाने सोडले मौन, टीकाकारांना दिले चोख प्रत्युत्तर

नक्की प्रकरण काय? वाचा सविस्तर

खरंतर, ही घटना श्रीलंकेच्या पहिल्या डावातील ६१ व्या षटकात घडली. श्रीलंकेच्या पहिल्या डावात, ऑस्ट्रेलियाचा डावखुरा फिरकी गोलंदाज मॅथ्यू कुहनेमन ६१ व्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी आला. त्यावेळी श्रीलंकेचा फलंदाज कुसल मेंडिस स्ट्राईकवर होता. ६१ व्या षटकात, मॅथ्यू कुह्नेमनच्या पहिल्याच चेंडूवर कुसल मेंडिसने एक धाव घेतली आणि नॉन-स्ट्रायकर एंडवर उभा राहिला. त्यानंतर मॅथ्यू कुहनेमनने दिनेश चांदीमलला ७४ धावांवर बाद केले. दिनेश चांदीमल बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज रमेश मेंडिस स्ट्राईकवर आला.

Bit happening here between Kuhnemann and Kusal Mendis 😅🫣#SLvAUS pic.twitter.com/yDKW2Kiahf — 7Cricket (@7Cricket) February 6, 2025

६१ व्या षटकात, मॅथ्यू कुहनेमनच्या तिसऱ्या चेंडूवर, रमेश मेंडिसने बचावात्मक शॉट खेळून धाव चोरण्याचा प्रयत्न केला पण अचानक काहीतरी मोठे घडले. जेव्हा रमेश मेंडिसने ऑन साईडकडे शॉट मारला तेव्हा मॅथ्यू कुहनेमन लगेच चेंडूकडे वेगाने धावला. यादरम्यान, अचानक आणि नकळतपणे नॉन-स्ट्रायकर एंडवर उभे असलेले मॅथ्यू कुहनेमन आणि कुसल मेंडिस यांच्यात जोरदार टक्कर झाली. धडकेनंतर कुसल मेंडिस काही वेळ जमिनीवर पडून राहिला. धडकेनंतर, कुसल मेंडिसला खूप वेदना होत असल्याचे दिसून आले, परंतु त्याला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही.

कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलिया १-० ने आघाडीवर

श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियन संघ १-० ने आघाडीवर आहे. गॉलमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा एक डाव आणि २४२ ​​धावांनी पराभव केला होता. दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हे वृत्त लिहिताना, श्रीलंकेने पहिल्या डावात ९७ षटकांत ९ गडी गमावून २५७ धावा केल्या आहेत. कुसल मेंडिस सध्या ८५ धावा करून क्रीजवर आहे.

Web Title: Sl vs aus high voltage drama in australia sri lanka 2nd test video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2025 | 11:54 AM

Topics:  

  • cricket
  • Sri Lanka vs Australia

संबंधित बातम्या

IND vs WI highlight : भारताच्या संघाने वेस्ट इंडिजला चारली धूळ! WI चा पहिल्या सामन्यात 140 धावांनी केला पराभव
1

IND vs WI highlight : भारताच्या संघाने वेस्ट इंडिजला चारली धूळ! WI चा पहिल्या सामन्यात 140 धावांनी केला पराभव

IND vs WI : फ्लाईंग नितीश कुमार रेड्डी… हवेत उडून घेतला झेल तुम्ही पाहिला का हा Video?
2

IND vs WI : फ्लाईंग नितीश कुमार रेड्डी… हवेत उडून घेतला झेल तुम्ही पाहिला का हा Video?

IND vs WI 3rd Day : दुसऱ्या इनिंगमध्ये वेस्टइंडीजचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये! जडेजाने तीन फलंदाजांना दाखवला बाहेरचा रस्ता
3

IND vs WI 3rd Day : दुसऱ्या इनिंगमध्ये वेस्टइंडीजचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये! जडेजाने तीन फलंदाजांना दाखवला बाहेरचा रस्ता

India Squad Announcement : आज होणार ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी घोषणा! रोहित-विराटचे पुनरागमन जवळजवळ निश्चित
4

India Squad Announcement : आज होणार ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी घोषणा! रोहित-विराटचे पुनरागमन जवळजवळ निश्चित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.