फोटो सौजन्य - ICC सोशल मीडिया
भारत विरुद्ध इंग्लंड : गुरुवारी इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताकडून यशस्वी जयस्वाल आणि वेगवान गोलंदाज हर्षित राणा यांनी पदार्पण केले. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली यामध्ये भारताच्या संघाने पहिल्या सामन्यांमध्ये विजय मिळवून १-० अशी आघाडी मालिकेमध्ये घेतली आहे. या सामन्यात सुरुवातीला काही षटकांमध्ये भारताच्या गोलंदाजांना इंग्लिश फलंदाजांनी धुतलं. पण त्यानंतर हार्दिक पंड्याने टीम इंडियाचा कमबॅक करत पहिला विकेट घेतला.
कालच्या सामन्यांमध्ये हर्षित राणाने संघासाठी पदार्पण केले पण त्याला एक ओव्हरमध्ये फलंदाजांनी भरपूर धावा ठोकल्या. पण त्याने दमदार कमबॅक करत संघासाठी सामन्यात तीन विकेट्स घेऊन कमालीची कामगिरी केली. यामध्ये राणाने जोरदार पुनरागमन केले आणि १० व्या षटकात २ बळी घेतले. राणाने बेन डकेट आणि हॅरी ब्रूक यांचे बळी घेतले.
𝙈𝙤𝙢𝙚𝙣𝙩𝙨 𝙡𝙞𝙠𝙚 𝙩𝙝𝙚𝙨𝙚, 𝙬𝙞𝙨𝙝𝙚𝙨 𝙡𝙞𝙠𝙚 𝙩𝙝𝙚𝙨𝙚!
ODI Debut Diaries, ft. Yashasvi Jaiswal & Harshit Rana 🧢
Follow The Match ▶️ https://t.co/lWBc7oPRcd#TeamIndia | #INDvENG | @ybj_19 | @ImRo45 | @MdShami11 | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/jK4mSksbnq
— BCCI (@BCCI) February 6, 2025
पहिल्या एकदिवसीय सामन्यात, हर्षित राणाने ७ षटके गोलंदाजी केली आणि ७.६० च्या इकॉनॉमीने ५३ धावा देत ३ बळी घेतले. सामन्यानंतर, हर्षित राणाने कन्कशन सबस्टिट्यूटच्या वादावर आपले मौन सोडले. तसेच टीकाकारांना चोख उत्तर दिले. पहिल्या एकदिवसीय सामन्यानंतर राणा म्हणाला, मला विश्वास आहे की लोक नेहमीच बोलत राहतील. मला फक्त खेळायचे आहे, ते चांगले असो वा वाईट. मला काळजी नाही, माझे लक्ष माझ्या देशासाठी चांगली कामगिरी करण्यावर आहे. कधीही काहीही घडू शकते, म्हणून मी नेहमीच स्वतःला तयार ठेवतो.
इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यात हर्षित राणाने आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये पदार्पण केले. या सामन्यात फलंदाजी करताना अष्टपैलू शिवम दुबेला दुखापत झाली. अशा परिस्थितीत, राणाने त्याचा कन्कशन पर्याय म्हणून गोलंदाजी केली. राणाने त्याच्या पदार्पणाच्या टी२० सामन्यातच प्रभावित केले. त्याने ४ षटके गोलंदाजी केली आणि ८.२० च्या इकॉनॉमीने ३३ धावा देत ३ बळी घेतले. सामन्यानंतर, इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरसह अनेक माजी खेळाडूंनी हर्षित राणाला कन्कशन पर्याय म्हणून निवडण्यास आक्षेप घेतला होता.
हर्षित राणानेही सामन्यात एक लाजिरवाणा विक्रम केला. इंग्लंडच्या डावाच्या दुसऱ्या षटकात त्याने ११ धावा दिल्या. राणाने पहिले चौथे षटक टाकले. यानंतर, हर्षितने सहाव्या षटकात २६ धावा दिल्या. राणाच्या या षटकात फिल साल्टने ३ षटकार आणि २ चौकार मारले. अशाप्रकारे, राणा त्याच्या पदार्पणाच्या एकदिवसीय सामन्यात एका षटकात सर्वाधिक धावा देणारा भारतीय गोलंदाज बनला.