Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

SL vs AUS : स्टीव्ह स्मिथ ठरला ऑस्ट्रेलियाचा नंबर-१ खेळाडू, माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगचा मोडला मोठा विक्रम

ऑस्ट्रेलियाच्या संघाने पॅट कमिन्सच्या अनुपस्थित स्टीव्ह स्मिथने संघाची कमान हाती घेतली आहे. कॅप्टन स्टीव्ह स्मिथने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगचा विक्रम मोडला आहे आणि आता तो अव्वल स्थानावर पोहोचला आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Feb 07, 2025 | 04:02 PM
फोटो सौजन्य - ICC सोशल मीडिया

फोटो सौजन्य - ICC सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया : सध्या श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरू आहे. सध्या मालिकेचा दुसरा सामना सुरु आहे, ऑस्ट्रेलियाने पहिल्या सामन्यांमध्ये एकतर्फी सामना जिंकून मालिकेमध्ये १-० अशी आघाडी घेतली आहे. आता सुरु असलेल्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने पहिल्या डावांमध्ये श्रीलंकेला २५७ धावांवर रोखलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाने पॅट कमिन्सच्या अनुपस्थित स्टीव्ह स्मिथने संघाची कमान हाती घेतली आहे. गॅले इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्याच्या पहिल्याच दिवशी स्टीव्ह स्मिथने इतिहास रचला.

कॅप्टन स्टीव्ह स्मिथने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगचा विक्रम मोडला आहे आणि आता तो अव्वल स्थानावर पोहोचला आहे. श्रीलंकेच्या पहिल्या डावात स्टीव्ह स्मिथने २ झेल घेतले. यासह, तो कसोटीत सर्वाधिक झेल (यष्टीरक्षक वगळता) घेणारा ऑस्ट्रेलियन खेळाडू बनला.

SL vs AUS : ऑस्ट्रेलिया-श्रीलंका दुसऱ्या कसोटी सामन्यात हाईवोल्टेज ड्रामा, सोशल मीडियावर Video Viral

स्मिथचा ११६ वा कसोटी सामना

स्टीव्ह स्मिथ त्याच्या कारकिर्दीतील ११६ वा कसोटी सामना खेळत आहे. या काळात त्याने २२० डावांमध्ये १९७ झेल घेतले आहेत. तर रिकी पॉन्टिंगने त्याच्या कारकिर्दीत खेळलेल्या १६८ कसोटी सामन्यांपैकी ३२८ डावांमध्ये १९६ झेल घेतले. या यादीत मार्क वॉ तिसऱ्या, मार्क टेलर चौथ्या आणि अॅलन बॉर्डर पाचव्या स्थानावर आहेत. राहुल द्रविडने कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक झेल घेतले आहेत. या भारतीय दिग्गजाने १६४ कसोटी सामन्यांमध्ये २१० झेल घेतले.

ऑस्ट्रेलियाकडून कसोटीत सर्वाधिक झेल (विकेटकीपर नसलेले)

स्टीव्ह स्मिथ : १९७ विकेट्स
रिकी पॉन्टिंग : १९६ विकेट्स
मार्क वॉ : १८१ विकेट्स
मार्क टेलर : १५७ विकेट्स
अ‍ॅलन बॉर्डर : १५६ विकेट्स

स्टीव्ह स्मिथ यांच्या दमदार फॉर्ममध्ये पुन्हा परतला आहे. स्टीव्ह स्मिथ अलीकडेच कसोटी क्रिकेटमध्ये १०,००० धावा करणारा चौथा ऑस्ट्रेलियन खेळाडू बनला. एवढेच नाही तर स्मिथने युनूस खान, सुनील गावस्कर, ब्रायन लारा आणि महेला जयवर्धने यांना मागे टाकत त्याचे ३५ वे कसोटी शतकही झळकावले. या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा एक डाव आणि २४२ ​​धावांनी पराभव केला. मालिकेतील दुसरी कसोटीही गॅले येथे खेळली जात आहे. या सामन्यात कर्णधार स्मिथकडून मोठी खेळी अपेक्षित आहे.

– 141 runs in first Test.
– Fifty in Second Test.
CAPTAIN STEVE SMITH IN SRI LANKA IN TOUGH CONDITION – The Greatest in Modern Era in Test. 🐐 pic.twitter.com/nZWGmpDYHC — Johns. (@CricCrazyJohns) February 7, 2025

स्मिथच्या कसोटी कारकिर्दीवर एक नजर

स्टीव्ह स्मिथने आतापर्यंत त्याच्या कारकिर्दीत ११५ कसोटी सामने खेळले आहेत. या काळात त्याने २०५ डावांमध्ये ५६.३३ च्या सरासरीने आणि ५३.५८ च्या स्ट्राईक रेटने १०१४० धावा केल्या आहेत. स्मिथने कसोटी क्रिकेटमध्ये ४१ अर्धशतके आणि ३५ शतके झळकावली आहेत. तो कसोटी शतकांमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या फलंदाजांमध्ये ७ व्या क्रमांकावर आहे. स्मिथचा कसोटीतील सर्वोत्तम धावसंख्या २३९ धावा आहे.

Web Title: Sl vs aus steve smith becomes australias number 1 player breaking former captain ricky pontings record

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2025 | 04:02 PM

Topics:  

  • cricket
  • Sri Lanka vs Australia
  • Steve Smith

संबंधित बातम्या

हार्दिक-तिलक आणि अक्षर पटेलने पाडला विजय हजारे ट्राॅफीमध्ये शतकांचा पाऊस! भारतीय खेळाडूंच्या बॅटने केला कहर
1

हार्दिक-तिलक आणि अक्षर पटेलने पाडला विजय हजारे ट्राॅफीमध्ये शतकांचा पाऊस! भारतीय खेळाडूंच्या बॅटने केला कहर

IND vs NZ : एकदिवसीय संघ जाहीर होण्यापूर्वी कर्णधार शुभमन गिल पडला आजारी, या सामन्यातून पडला बाहेर
2

IND vs NZ : एकदिवसीय संघ जाहीर होण्यापूर्वी कर्णधार शुभमन गिल पडला आजारी, या सामन्यातून पडला बाहेर

T20 World Cup 2026 : स्टब्स आणि रिकेल्टनला दिला डच्चू! एडेन मार्करामच्या हातात कमान, 7 खेळाडूंना पहिल्यांदाच विश्वचषकाची तिकिटे
3

T20 World Cup 2026 : स्टब्स आणि रिकेल्टनला दिला डच्चू! एडेन मार्करामच्या हातात कमान, 7 खेळाडूंना पहिल्यांदाच विश्वचषकाची तिकिटे

मुस्तफिजूर रहमानचा आयपीएलमधून पत्ता कट! BCCI ने केकेआरला बांगलादेशी खेळाडूला सोडण्याचे दिले निर्देश
4

मुस्तफिजूर रहमानचा आयपीएलमधून पत्ता कट! BCCI ने केकेआरला बांगलादेशी खेळाडूला सोडण्याचे दिले निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.