
फोटो सौजन्य - सोशल मिडिया
England’s playing 11 against Sri Lanka : श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी इंग्लंडने त्यांच्या प्लेइंग ११ संघाची घोषणा केली आहे. जॅक क्रॉली दीर्घकाळानंतर इंग्लंड संघात परतला आहे. क्रॉलीने शेवटचा एकदिवसीय सामना २०२३ मध्ये खेळला होता. बेन डकेट क्रॉलीसोबत डावाची सुरुवात करेल. जो रूट तिसऱ्या क्रमांकावर खेळताना दिसेल. सॅम करनचाही अंतिम ११ मध्ये समावेश करण्यात आला आहे. लियाम डॉसनचाही दुसरा फिरकी गोलंदाज म्हणून समावेश करण्यात आला आहे.
इंग्लंडने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी त्यांच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. जॅक क्रॉली बऱ्याच काळानंतर इंग्लंड संघाकडून एकदिवसीय सामन्यात खेळताना दिसणार आहे. जेकब बेथेलचाही संघात समावेश करण्यात आला आहे. हॅरी ब्रुक कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारतील, तर जो बटलर यष्टीरक्षक असेल. विल जॅक्सचाही संघात समावेश करण्यात आला आहे. सॅम करन आणि जेमी ओव्हरटन यांच्याकडून फलंदाजी आणि चेंडू दोन्हीमध्ये स्फोटक कामगिरीची अपेक्षा संघाला असेल. लियाम डॉसन आणि आदिल रशीद त्यांच्या फिरकीने फलंदाजांना त्यांच्या तालावर नाचवताना दिसतील.
🚨 Team news from Colombo! 👊 — England Cricket (@englandcricket) January 21, 2026
श्रीलंका दौऱ्यात इंग्लंड संघ तीन सामन्यांची एकदिवसीय आणि टी-२० मालिका खेळणार आहे. ही एकदिवसीय मालिका २२ जानेवारीपासून सुरू होत आहे, पहिला सामना कोलंबोमधील आर. प्रेमदासा क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. मालिकेतील दुसरा सामना २४ जानेवारी रोजी खेळवला जाईल.
तिसरा एकदिवसीय सामना २७ जानेवारी रोजी खेळला जाईल. एकदिवसीय सामन्यांनंतर, ३० जानेवारी रोजी तीन सामन्यांची टी२० मालिका सुरू होईल, ज्याचा शेवटचा सामना ३ फेब्रुवारी रोजी होणार आहे. पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम सर्व टी२० सामने आयोजित करेल. टी20 विश्वचषकाआधी दोन्ही संघासाठी ही मालिका फार महत्वाची असणार आहे. विश्वचषक सुरू होण्याआधी संघाच्या मालिकेचे आयोजन केले आहे, हे त्यांना विश्वचषकाच्या सामन्यामध्ये नक्कीच मदत होईल.
इंग्लडचा पहिला सामना नेपाळ विरुद्ध खेळवला जाणार आहे. हा सामना 8 फेब्रुवारी रोजी खेळवला जाणार आहे. तर दुसरीकडे 8 फेब्रुवारी रोजी श्रीलंकेचाही सामना असणार आहे हा सामना आयर्लंडविरुद्ध खेळवला जाणार आहे.