
फोटो सौजन्य - बीसीसीआय सोशल मिडिया
Smriti Mandhana Record : भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये पाच सामन्यांच्या मालिकेचा चौथा सामना पार पडला. या मालिकेच्या चौथ्या सामन्यामध्ये भारताच्या सलामीवीर फलंदाजी स्मृती मानधना हिने कमालीची फलंदाजी केली आणि रेकाॅर्ड ब्रेकिंग भागीदारी देखील केली. एवढेच नव्हे तर स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा यादोघींचेही शतके हुकली. पण भारताची उपकर्णधार स्मृती मानधना हिने आणखी एक रेकाॅर्ड नावावर केला आहे.
रविवारी श्रीलंकेविरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधनाने १०,००० आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण केल्या. महिला क्रिकेटमध्ये १०,००० धावा करणारी ती सर्वात जलद क्रिकेटपटू ठरली आहे. मानधनाने केवळ २८१ डावात हा विक्रम केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (कसोटी, एकदिवसीय आणि टी-२०) १०,००० धावा करणारी स्मृती मानधन दुसरी भारतीय आणि जगातील चौथी महिला खेळाडू ठरली आहे. मिताली राज १०,००० आंतरराष्ट्रीय धावा करणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू होती.
Mt. 1⃣0⃣,0⃣0⃣0⃣🏔️ Congratulations to #TeamIndia vice-captain Smriti Mandhana on a landmark milestone 👏👏 Updates ▶️ https://t.co/9lrjb3dMqU #INDvSL | @mandhana_smriti | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/bkqF2HwuDO — BCCI Women (@BCCIWomen) December 28, 2025
भारताची स्फोटक फलंदाज स्मृती मानधनाने तिच्या २८१ व्या आंतरराष्ट्रीय डावात १०,००० धावा पूर्ण केल्या, जे महिला क्रिकेट इतिहासातील सर्वात जलद आहे. तिने मिताली राज, सुझी बेट्स आणि चार्लोट एडवर्ड्स सारख्या दिग्गजांना मागे टाकले. मानधनाच्या आधी भारताची मिताली राज, इंग्लंडची चार्लोट एडवर्ड्स आणि न्यूझीलंडची सुझी बेट्स होती.
स्मृती मानधनाने हा जादुई आकडा गाठण्यासाठी फक्त २८१ डाव घेतले. येथील ग्रीनफील्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर निमाशा मीपेजच्या गोलंदाजीवर एका धावेने २७ धावा काढून स्मृतीने महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०,००० धावा पूर्ण केल्या. या खेळीसह तिने माजी भारतीय कर्णधार मिताली राजचा विक्रमही मोडला, ज्याने २९१ डावांमध्ये हा पराक्रम केला होता. मिताली राजच्या नावावर १०,८६८ आंतरराष्ट्रीय धावा आहेत. ती अजूनही महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी खेळाडू आहे.
सर्वात कमी डावांमध्ये १०,००० धावा पूर्ण करण्याचा विक्रम स्मृती मानधनाच्या नावावर आहे. तिने २८१ डावांमध्ये ही कामगिरी केली. मिताली २९१ डावांसह या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. चार्लोट आणि सुझी यांनी अनुक्रमे ३०८ आणि ३१४ डावांमध्ये हा टप्पा गाठला.