
Smriti Mandhana in front of the camera for the first time after her marriage breakup; Video from Delhi airport goes viral
Smriti Mandhana in front after marriage breakup : भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना अलीकडेच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. संगीतकार पलाश मुच्छलसोबत तिचे २३ नोव्हेंबर रोजी विवाह होणार होता. परंतु, त्याआधी अनेक घडामोडी घडल्या आणि पलाशसोबत लग्न मोडल्याच्या बातम्या आल्या. त्यानंतर मानधना पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या दिसून आली. काही दिवसांपासून तिला वैयक्तिक आव्हानांचा सामना करावा लागत होता, परंतु आता ती क्रिकेटवर लक्ष्य केंद्रित करण्यास सुरू करत आहे. सरावाला परतण्यापूर्वी पापाराझींनी तिला दिल्ली विमानतळावर आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केले आहे.
हेही वाचा : “ती माझ्या आयुष्यात आल्यापासून…”, हार्दिक पांड्याने पहिल्यांदाच गर्लफ्रेंड माहिका शर्माबद्दल केले मोठे विधान
दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्मृती मानधना साध्या आणि आरामदायी लूकमध्ये दिसून आली. यावेळी तिने पांढऱ्या डिझाइनसह हलक्या निळ्या रंगाचा स्वेटर किंवा पुलओव्हर घातला होता. तिने तिच्या चेहऱ्यावर काळा मास्क देखील घातलेला दिसला. ज्यामुळे तिची साधी शैली दिसली. तिने स्टीलच्या रंगाचे मनगटी घड्याळ घातलेली होती. सोबत काळ्या बॅगसह अॅक्सेसरीज देखील घातले होते. पापाराझींनी तिला या लुकमध्ये कॅमेऱ्यात कैद केले.
स्मृती मानधनाचे वैयक्तिक आयुष्य मागील काही आठवड्यांपासून सतत चर्चेत येत आहे. लग्न अचानक थांबल्याने आणि दोन्ही कुटुंबांकडून कोणताही प्रतिसाद देण्यात आला. त्यामुळे अनेक या अटकळी बाधल्या जाऊ लागल्या. त्यामुळे मानधनाने स्वतः ७ डिसेंबर रोजी पुढे येऊन तिने पलाश मुच्छलशी तिचे लग्न अधिकृतपणे संपल्याच्या बातमीला दुजोरा दिला. तिने जनतेला गोपनीयतेचे आवाहन देखील केले आहे.
स्मृती मानधनाने स्पष्ट केले की, सध्या तिची सर्वोच्च प्राथमिकता क्रिकेट असून भारतासाठी मैदानावर सर्वोत्तम कामगिरी करणे हे तिचे ध्येय असणार आहे. तिने असे देखील संकेत दिले की ती तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अडचणी मागे ठेवून तिच्या खेळावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करणार आहे.
दरम्यान, श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी स्मृती मानधना भारतीय संघाची उपकर्णधार असणार आहे. तिचा भाऊ श्रवण मानधनाने अलीकडेच तिच्या सरावाचे फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत.